धावपळीचे जीवन फक्त शरीराला नाही तर, आरोग्य, केस, त्वचेला देखील नुकसान पोहचवते. धकाधकीच्या जीवनामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ नसतो. ज्याचा थेट परिणाम केसांवर होतो. केस निर्जीव होतात, यासह केस गळणे, कोंडा, केसांना फाटे फुटणे अशा समस्या उद्भवतात. मुख्य म्हणजे केसांची वाढ खुंटते. केसांची वाढ का होत नाही? केसांच्या वाढीसाठी काय करावे? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये उद्भवतात.
अशा स्थितीत महिला महागडे शॅम्पू व इतर घरगुती उपाय करून पाहतात. पण काही प्रॉडक्ट्स केसांवर सूट करतात तर काही नाही. जर आपल्या केसांची ग्रोथ थांबली असेल, किंवा केस वाढतच नसतील तर, असे का होते याचे कारण पाहा(Stop making these 5 hair care mistakes right now).
ड्राय स्काल्प
कोरड्या स्काल्पमुळे केसांची वाढ होत नाही. टाळू कोरडी राहिल्यास केसांमध्ये आर्द्रतेची कमतरता होते, ज्यामुळे केस वाढत नाहीत. अशा स्थितीत टाळूची विशेष काळजी घेतली पाहिजे. स्काल्प निरोगी ठेवण्यासाठी केसांमध्ये एलोवेरा जेलचा वापर करा. एलोवेरा जेलमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे ओलावा टिकवून ठेवण्याचे काम करतात.
अती पिकलेली केळी फेकून न देता ४ प्रकारे वापरा, चेहरा दिसेल तुकतुकीत-चमकदार
चुकीचे प्रोडक्ट्सचा वापर करणे
आजकाल बाजारात केसांची निगा राखणारे प्रॉडक्ट्सची वाढ झाली आहे. अनेक प्रकारचे उत्पादने बाजारात मिळतात. पण त्यातील कोणते प्रोडक्ट आपल्या केसांसाठी योग्य ठरेल हे सांगणे कठीण आहे. चुकीच्या प्रोडक्ट्समुळे केसांची वाढ थांबू शकते. त्यामुळे केसांचा पोत लक्षात घेऊनच शॅम्पू किंवा कंडिशनरचा वापर करा. यासह डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही प्रॉडक्ट्स वापरू नये.
हेअर ट्रीटमेंट
स्मूदनिंगपासून ते कलरिंगपर्यंत अनेक ट्रीटमेंट केसांवर केले जातात. या सर्व ट्रीटमेंटमध्ये रसायनांचा वापर केला जातो, ज्यामुळे केस काही काळ सुंदर दिसतात. परंतु, त्यानंतर केस कमकुवत होतात. काही काळानंतर केस गळणे सुरू होते, ज्यामुळे केसांची वाढ खुंटते. म्हणूनच हेअर ट्रीटमेंट करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पिंपल्स-दुखरे फोड-निस्तेज चेहरा? तुळशीची मुठभर पानं घ्या करा ४ उपाय, चेहरा उजळेल चटकन
हे देखील असू शकतं कारण
तणावामुळेही ही समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे केस गळू लागतात. अशा स्थितीत जास्त टेन्शन घेऊ नका.
आपल्या सर्वांना माहित आहे की, केसांची वाढ स्प्लिट एन्ड्समुळे होत नाही. म्हणूनच वेळोवेळी केस ट्रिम केले पाहिजेत.
शरीरातील हार्मोनल बदलांमुळे केस वाढत नाहीत.
परफ्यूम भसाभसा अंगावर फवारताय? शरीरावर ७ ठिकाणी हलकासा लावा- राहाल दिवसभर फ्रेश-दुर्गंधी गायब
जर आपण योग्य केसांची निगा राखली नाही तर, त्यामुळे केसांची वाढही थांबते.
आपल्या आहाराचीही विशेष काळजी घ्या. चुकीच्या आहारामुळेही केसांची वाढ होत नाही.