Lokmat Sakhi >Beauty > स्ट्रेस घेताय, मग चेहऱ्यावर पुरळ आणि डोळ्याखाली काळं याचं कोडं सुटणं अवघड!

स्ट्रेस घेताय, मग चेहऱ्यावर पुरळ आणि डोळ्याखाली काळं याचं कोडं सुटणं अवघड!

ताण जितका मनात वागवाल तितका तो चेहेऱ्यावर दिसतो. त्यामूळे ताणावर काम केल्यास त्याचा परिणाम चेहेऱ्यावरही दिसतोच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 05:49 PM2021-03-24T17:49:32+5:302021-03-24T18:52:12+5:30

ताण जितका मनात वागवाल तितका तो चेहेऱ्यावर दिसतो. त्यामूळे ताणावर काम केल्यास त्याचा परिणाम चेहेऱ्यावरही दिसतोच.

Stress destroys the beauty of the face. Remedy stress first to look beautiful! | स्ट्रेस घेताय, मग चेहऱ्यावर पुरळ आणि डोळ्याखाली काळं याचं कोडं सुटणं अवघड!

स्ट्रेस घेताय, मग चेहऱ्यावर पुरळ आणि डोळ्याखाली काळं याचं कोडं सुटणं अवघड!

Highlightsजेव्हा ताण असतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन जास्त स्त्रवतं. या हार्मोनमुळे त्वचेवर जास्त तेल निर्माण होतं.ताणामूळे त्वचेतील प्रथिनांच्या साखळीत बदल होतो. या बदलाने त्वचेमधील लवचकिता नाहिशी होते.चेहेरा सूंदर दिसण्यासाठी ताण नीट हाताळायला शिकायला हवं.


ताण हा आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भागच झाला आहे. या ताणामुळे आपण रोजची काम नीट करु शकत नाही. ताण आपल्या आरोग्यावर परिणाम करत आहे. तसेच या ताणाचा परिणाम आपल्या चेहेऱ्यावर , आपल्या दिसण्यावरही होत आहे. ताणामुळे त्वचेशी संबंधित अनेक आजार उद्भवतात.
- जेव्हा ताण असतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन जास्त स्त्रवतं. या हार्मोनमुळे त्वचेवर जास्त तेल निर्माण होतं. त्यामूळे त्वचा तेलकट होते. तेलामूळेत्वचेवरील रंध्रंही बंद होतात. अ‍ॅक्नेचा त्रास त्यामुळे वाढतो.
- ताणामूळे डोळ्याखाली सूज येते. डोळ्याखाली सुरकुत्या दिसतात.
- आपली त्वचा ओलसर राहिल्यास ती निरोगी राहाते. त्वचा ओलसर ठेवण्याची एक यंत्रणा त्वचेखाली काम करत असते. पण ताणामुळे या यंत्रणेच्या कामात अडथळे निर्माण होतात. त्वचा ओलसर राहात नाही. त्वचा कोरडी पडते.
- आपली त्वचा निरोगी ठेवण्यात डिसबॉयसिस हे जीवाणू महत्त्वाची भूमिका पार पाडतात. पण त्यांच्यात समतोल असणं कायम महत्त्वाचं असतं. हा समतोल ताणामूळे ढासळतो. आणि तो ढासळल्यास त्वचेवर लालसर चट्टे आणि रॅश येते.
- ताणामूळे त्वचेतील प्रथिनांच्या साखळीत बदल होतो. या बदलाने त्वचेमधील लवचकिता नाहिशी होते. आणि चेहेऱ्यावर सूरकूत्या दिसायला लागतात.
- अति ताण हा  केस पांढरे करतो. ताणामूळे केस गळतात.
असा हा ताण आपल्या दिसण्यावर परिणाम करतो. ताणामूळे आपण आपल्या त्वचेची , स्वत:ची काळजी नीट घेत नाही. रोजच्या आयुष्यातला हा ताण आपल्या सौंदर्यास बाधा आणत आहे. त्यामुळे केवळ ताणामूळै निर्माण झालेल्या त्वचा विकारांवर उपचार करुन भागणार नाही. तर चेहेरा सुंदर दिसण्यासाठी हा ताण नीट हाताळायला शिकायला हवं. ताणाने चेहेऱ्यावर दिसणारे परिणाम घालवण्याचे मार्गही आहेत.

 

सौंदर्यावरचा ताण इफेक्ट कसा कमी कराल?

- आपण किती थकलेलो असलो किंवा कितीही ताण असला तरी त्वचेची आवश्यक काळजी घ्यायलाच हवी.

- रोज व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायामानं ताण कमी होतो. आणि ताण कमी झाला की त्याचा परिणाम म्हणून त्वचाही चांगली राहाते.

- ताणातून बाहेर पडण्याठी दिवसातून काही काळ तरी आपल्या आवडीचं काम करावं. किंंवा ताण आल्यास आंघोळ करावी किंवा आवडीचं पस्तक वाचण्यात मन रमवावं.

- कामातून थोडा वेळ मिळाला की चालून यावं.

- ताण व्यवस्थापनाचे तंत्र शिकून घ्यावं. त्यासाठी श्वसनाचे व्यायम, योग, ध्यान शिकावं.

- पूरेशी झोप घ्यावी. सात ते आठ तासांची झोप ताण नाहीसा करण्यासाठी आवश्यक आहे.

 

- आपण स्वत:च्या सीमा निश्चित कराव्यात. एकदा आपल्याला त्या माहित असल्या की आपण इथपर्यंतच काम करु शकतो याची जाणीव आपल्याला होते. या सीमा खेचणाऱ्या कोणत्याही गोष्टींना नकार देता यायला हवा. हा जाणीवपूर्वक नकार ताण कमी करण्यास खूप मदत करतो.

- ताण आला असेल तर तो मनात न ठेवता त्याबद्दल आपल्या जवळच्या माणसांशी बोला. बोलण्याने ताण हलका होतो.
ताण जितका मनात वागवाल तितका तो चेहेऱ्यावर दिसतो. त्यामूळे ताणावर काम केल्यास त्याचा परिणाम चेहेऱ्यावरही दिसतोच.

Web Title: Stress destroys the beauty of the face. Remedy stress first to look beautiful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.