केस गळणे ही केसांच्या बाबतीतली एक कॉमन समस्या आहे. खरंतर केस गळण्याची अनेक कारणं असू शकतात. या अनेक कारणांपैकी स्ट्रेस हे देखील एक मुख्य कारण असू शकते. आजकाल आपल्या सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा थोड्याफार प्रमाणात स्ट्रेस हा असतोच. स्ट्रेसमुळे आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचे भरपूर नुकसान होते. स्ट्रेसमुळे आपल्याला अनेक लहान मोठ्या आजारांना सामोरे जावे लागतेच, यासोबतच केसगळतीचा त्रास देखील सुरू होतो(Stress & Hair Loss Are They Related).
साधारणतः केस तुटणे किंवा केस गळणे ही सामान्य बाब आहे. पण तणावामुळे केसगळती होणे ही मोठी समस्या आहे. ताणतणावामुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. केस पातळ होणे, केस कोरडे तसेच कमकुवत होणे इत्यादी समस्या निर्माण होतात. याचबरोबर, केसांची योग्य वाढ देखील (How stress causes hair loss) होत नाही. हवामानातील बदल, धूळ, माती, प्रदूषणामुळे तर केसगळती होते. पण हार्मोन आणि शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या बदलामुळेही केसांचे आरोग्य आणि सौंदर्य हरवून जाते. खरंच स्ट्रेस घेतल्याने आपल्या केसांचे आरोग्य बिघडते का ? किंवा स्ट्रेसचा आपल्या केसांवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो ते पाहूयात. अहमदाबाद येथील न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सचे डॉक्टर आकाश शहा स्ट्रेस आणि केसांचा नेमका काय संबंध असतो याबद्दल अधिक माहिती देत आहेत(How Extreme Stress Causes Hair Loss).
स्ट्रेस घेतल्याने खरंच केस गळतात का ?
१. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, स्ट्रेस घेतल्याने खरंच केस गळतात. स्ट्रेसमुळे केसांच्या हेअर ग्रोथ सायकलवर परिणाम होऊन केस फार मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. केसांच्या हेअर ग्रोथ सायकलमध्ये हेअर ग्रोथ, हेअर रेस्ट आणि हेअर शेडिंग असे तीन टप्पे असतात.
२. जर आपण दीर्घकाळापासून खूप स्ट्रेस घेत असाल तर हेयर फॉलिकल्स हेअर ग्रोथ सायकलच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच हेअर शेडिंग टप्प्यात जातात. यामुळे केस फार मोठ्या प्रमाणात पातळ होऊन गळू लागतात. केसांच्या अशा स्थितीतील टेलोजन एफ्लुवियम असे म्हणतात.
पायांच्या घोट्यांचा काळपटपणा जात नाही? करा घरगुती असरदार उपाय, पार्लरला जायची गरजच नाही...
३. स्ट्रेसमुळे व्यक्तीच्या खाण्या - पिण्याच्या सवयींवर परिणाम होतो. त्यामुळे झोप येणे कठीण होते, पुरेशी झोप न झाल्याने देखील केसांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. याचबरोबर केस देखील गळू लागतात.
४. एलोपेशिया एरियाटा (Alopecia Areata) या प्रकारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती हेअर फॉलिकल्सचे नैसर्गिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरते. ज्यामुळे टक्कल पडू लागते. स्ट्रेसमुळे केसगळती सुरू होण्यापूर्वी केस पांढरे होऊ लागतात. अनेक कारणांमुळे बहुतांशजण खूप स्ट्रेस मध्ये असतात. दरम्यान तरुणवर्गामध्ये लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या जास्त प्रमाणात आढळून येत आहे.
सतत केस गळून विरळ झालेत ? टक्कल दिसतंय? 'या' ४ तेलांचे मिश्रण करेल जादू, केसांची होईल वाढ...
५. जेव्हा आपण फार स्ट्रेस मध्ये असतो, तेव्हा आपले शरीर आवश्यक पोषक घटक आणि ऊर्जा शरीरातील कमी महत्त्वाच्या कार्यांमधून वापरते, जसे की केसांची वाढ. त्यामुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात.
६. शक्यतो स्ट्रेसमुळे केस गळणे तात्पुरते असते. परंतु, तणावाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
७. योग, ध्यान आणि इतर अनेक गोष्टी स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मदत करू शकतात. याचा वापर करुन स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करा, यामुळे आपोआप केसगळतीची समस्या देखील कमी होईल.