Join us  

काखेत खूप डिओ मारल्यानं त्वचा काळी पडली आहे ? १ सोपा उपाय, काळेपणासह दुर्गंधीही होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2023 7:29 PM

Home remedies to get rid of smelly armpits : काखेत खूप घाम येतो म्हणून अनेकजण खूप स्प्रे-डिओ मारतात, पण त्यानं त्रास कमी न होता वाढतो कारण..

घामामुळे काखेतून येणारी दुर्गंधी ही सगळ्यांची एक कॉमन समस्या आहे. सतत घामाने ओलंचिंब होणारं अंग आणि त्यामुळे येणारा घामाचा वास नकोसा होतो. बऱ्याच वेळा मान, गळा, काख अशा ठिकाणी सारखा घाम येत राहतो. त्यातच काखेत म्हणजे अंडरआर्म्समधील घामाची तीव्र दुर्गंधी येते. हा घामाचा दुर्गंध कधी कधी इतका तीव्र असतो की त्या वासाने आपल्यालाच नकोसे होते. कित्येक स्त्रियांना यामुळे स्लीव्हलेस ड्रेस किंवा ब्लाऊजही घालता येत नाहीत. पार्टी ड्रेस निवडतानाही पंचाईत होते. चारचौघांत गेल्यावर जर घामामुळे अंडरआर्म्स ओले दिसत असतील किंवा दुर्गंध येत असेल तर विचित्र किंवा लाजिरवाणं वाटतं. कोणाच्या जवळ जाऊन बोलायचंही टेन्शन येतं. ऑफिसला जाता - येताना बस, लोकलच्या गर्दीमध्ये हातही वर करता येत नाहीत. घरातली कामं करताना अशी दुर्गंधी येत असेल तर चिडचिड होते(TRICKS TO GET RID OF ARMPIT ODOR PERMANENTLY).

अंडरआर्म्स मधून येणारी ही दुर्गंधी कमी करण्यासाठी खास स्त्रियांसाठी म्हणून रोल ऑन स्प्रे, डिओड्रंट्सही उपलब्ध आहेत. परंतु ही दुर्गंधी घालवण्यासाठी (How To Get Rid Of Underarm Odor (Smelly Armpits) Naturally) रोल ऑन स्प्रे, डिओड्रंट्स यांचा कितीही वापर केला तरीही एका ठराविक वेळेनंतर त्यांचाही काही उपयोग होत नाही. हे स्प्रे, डिओड्रंट्स काही तासांपुरतेच (Natural Deodorant Alternatives for Happy, Healthy Pits) काम करतात. याचबरोबर जर आपण वर्षानुवर्षे हेच रोल ऑन स्प्रे, डिओड्रंट्स वापरत राहिलो तर कालांतराने आपली अंडरआर्म्समधील त्वचा काळी पडू लागते. यासाठी अंडरआर्म्समध्ये येणाऱ्या घामापासून कायमची सुटका  करुन घेण्यासाठी आपण घरगुती नैसर्गिकरित्या बनवलेल्या स्प्रेचा वापर करु शकतो(Struggling with Armpit Odor? Here’s How to Get Rid of It). 

अंडरआर्म्समध्ये येणाऱ्या घामापासून सुटका करण्यासाठी स्प्रे... 

साहित्य :- 

१. तुरटीची पावडर - १ टेबलस्पून २. गुलाबपाणी - १ कप ३. इसेन्शियल ऑईल - ४ ते ५ थेंब 

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...

कृती :-

अंडरआर्म्समध्ये येणाऱ्या घामापासून सुटका करण्यासाठी घरगुती नैसर्गिक स्प्रे बनवताना काही घरगुती गोष्टींची गरज लागेल. या गोष्टी आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात. सर्वप्रथम हा स्प्रे बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून तुरटीची बारीक केलेली पावडर घ्यावी. त्यानंतर त्या पावडरमध्ये १ कप गुलाबपाणी घालावे. सर्वात शेवटी यात आपल्या आवडीच्या इसेन्शियल ऑईलचे ४ ते ५ थेंब घालूंन हे सगळे मिश्रण चमच्याने ढवळून घ्यावे. त्यानंतर एक स्प्रे बॉटल घेऊन त्यात हे तयार लिक्विड भरुन घ्यावे.

काळेभोर केस हवे ? तुळशीचा करा 'असा' वापर, केस होतील मऊ मुलायम सुंदर... 

फेशियल तर करतोच पण हे मेडी फेशियल नेमकं काय आहे, फेशियलचा नवा ट्रेंड...

या स्प्रेचा वापर नेमका कसा करावा ? 

अंडरआर्म्स मधील दुर्गंधी घालवण्यासाठी तयार करण्यात आलेला हा लिक्विड स्प्रे आपण दिवसभरातून २ ते ३ वेळा वापरु शकता. सकाळी आंघोळ झाल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी आपण हा लिक्विड स्प्रे काखेत स्प्रे करु शकता. असे केल्याने महिन्याभरातच आपल्याला याचा फरक जाणवेल. या स्प्रेच्या वापराने आपल्याला अंडरआर्म्समध्ये येणाऱ्या घामाचे प्रमाण कमी होईल तसेच घामामुळे येणारी दुर्गंधीही नाहीशी होईल. हा स्प्रे घरगुती व नैसर्गिक गोष्टींचा बनवला असल्यामुळे याच्या वापराने आपल्याला कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत तसेच काळ्या झालेल्या अंडरआर्म्सचा रंग देखीलउजळण्यास मदत होईल. 

दिवसभर ए.सी मध्ये बसता, ५ टिप्स - कोरडी - निस्तेज तर नाही झाली तुमची त्वचा ?

स्वयंपाक घरांतील ४ गोष्टी वापरून बनवा नैसर्गिक हेअर सिरम...केस होतील मुलायम, चमकदार, घनदाट...

हा नैसर्गिक घरगुती स्प्रे वापरण्याचे फायदे :- 

१. तुरटी पावडर शरीरात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करण्याचे मुख्य काम करते.

२. दिवसभर सतत अंडरआर्म्समध्ये येणाऱ्या घामांपासून सुटका करण्याचे काम करते. 

३. गुलाबपाणी त्वचेवर असलेल्या छिद्रांचा आकार लहान करण्यास फायदेशीर ठरते, यामुळे घामाचे उत्पादन कमी होते. 

४. अंडरआर्म्समधील काळ्या पडलेल्या त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मदत करते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी