Join us  

१ चमचा मेथीचे दाणे आणि ३ उपाय -केसातला कोंडा-पांढरे केस-समस्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2023 3:18 PM

Struggling With Hair Fall and Dandruff? 3 Ways How Fenugreek May Help केसांच्या समस्या कायम छळतात, चमचाभर मेथ्यांचा वापर करतो त्रास कमी

हल्ली अनेकांना केसगळती आणि टक्कल पडणे ही समस्या असल्याचे दिसून येते. केस गळतीमुळे केसांची वाढ तर, खुंटतेच, यासह संपूर्ण लूक देखील खराब होतो. हेअर ग्रोथसाठी लोकं अनेक ट्रिटमेंट घेतात. काही उपाय फेल तर काही उपयुक्त ठरतात. केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक उपाय प्रभावी ठरतात. ज्यात मेथी दाण्यांचा समावेश आहे.

मेथी दाण्यांमध्ये असणारे प्रोटीन, विटामिन सी हे स्काल्प हेल्दी ठेवतात. ज्यामुळे केसांची रिग्रोथ होते. मेथी दाण्यात असणाऱ्या लोहामुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थितरित्या होते. ज्यामुळे केसांना मजबुती मिळते. केसांवर मेथी दाण्यांचा वापर कसा करावा हे पाहूयात(Struggling With Hair Fall and Dandruff? 3 Ways How Fenugreek May Help).

दह्यात मिसळा मेथी दाणे

मेथी दाण्यांचा वापर आपण दह्यात मिसळून करू शकता. यासाठी मेथी दाण्यांची गुळगुळीत पेस्ट तयार करा. त्यात दही मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्या स्काल्पवर लावा. व हलक्या हाताने मसाज करा. ३० मिनिटानंतर केस धुवा. यामुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन वाढेल, यासह पांढरे केसांची समस्या देखील सुटेल.

चेहऱ्यासाठी कच्चे दूध म्हणजे वरदान, २ चमचे दुधात मिसळा ३ गोष्टी, चेहरा करेल ग्लो

मेथी दाणे आणि खोबरेल तेल

केसांचा विकास होण्यासाठी ऑईलिंग करणं गरजेचे आहे. केसांना फक्त खोबरेल तेल लावू नका. त्यात मेथी दाणे मिक्स करा. यामुळे मेथी दाण्यातील गुणधर्म तेलात उतरतील. यासाठी मेथी दाणे खोबरेल तेलात लाल होईपर्यंत गरम करून घ्या. तेल कोमट झाल्यानंतर केसांवर आणि स्काल्पवर लावा. यामुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन वाढेल, ज्यामुळे केस गळती थांबते.

१ चमचा तांदूळ- १ वाटीभर पाणी, चेहऱ्यावरचे डाग - पिंपल्सचा त्रास कमी करणारा सोपा उपाय

मेथी दाणे आणि लिंबू

मेथी दाण्यांचा आपण हेअर मास्क करू शकता. यासाठी रात्री ४ चमचे मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा, व सकाळी मेथी दाण्यांची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये ४ टेबलस्पून लिंबाचा रस मिक्स करा. व ही पेस्ट टाळूला ४५ मिनिटं लावून ठेवा. नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे कोंड्याची समस्या कमी होईल. आपण या हेअर मास्कचा वापर आठवड्यातून एक वेळा करू शकता.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स