Lokmat Sakhi >Beauty > केसांत कोंडा, केस गळतात, राठ झालेत ? शहनाज हुसेन सांगतात ६ टिप्स, केसांच्या समस्या विसरा...

केसांत कोंडा, केस गळतात, राठ झालेत ? शहनाज हुसेन सांगतात ६ टिप्स, केसांच्या समस्या विसरा...

6 Best Shahnaz Hussain Hair Care Tips for Hair Fall : केसांच्या समस्यांनी छळलेलं नाही असं आपल्या अवतीभोवती कुणी नसेल, केसांसाठी म्हणूनच ६ खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2023 07:35 PM2023-07-15T19:35:03+5:302023-07-15T19:54:46+5:30

6 Best Shahnaz Hussain Hair Care Tips for Hair Fall : केसांच्या समस्यांनी छळलेलं नाही असं आपल्या अवतीभोवती कुणी नसेल, केसांसाठी म्हणूनच ६ खास उपाय

Struggling With Hair Fall? Shahnaz Husain Shares Home Remedies For Hair Growth | केसांत कोंडा, केस गळतात, राठ झालेत ? शहनाज हुसेन सांगतात ६ टिप्स, केसांच्या समस्या विसरा...

केसांत कोंडा, केस गळतात, राठ झालेत ? शहनाज हुसेन सांगतात ६ टिप्स, केसांच्या समस्या विसरा...

आपले केस सुद्धा लांबसडक व घनदाट, काळेभोर असावेत असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. लांबसडक केस हे आपला लुक सुद्धा अजून भन्नाट करतात. आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असते की आपलेसुद्धा केस कंबरेपर्यंत लांब व्हावेत आणि त्यासाठी आपण अनेक उपाय सुद्धा ट्राय करून पाहतो. चुकीची जीवनशैली आणि प्रदूषणामुळे आपल्याला केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सर्वात मोठी समस्या ही आहे की कधी कधी कोणतेही कारण नसतानाही आपले केस पातळ आणि कमकुवत होऊन गळू लागतात. 

आपल्यापैकी काहीजणी केसांच्या वाढीबद्दल खूप चिंतीत असतात. तेल लावल्यानंतर आणि विविध केमिकलयुक्त उत्पादने वापरल्यानंतरही केसांची लांबी सारखीच राहते. खराब झालेले केस हे देखील याचे एक कारण असू शकते, कारण त्यामुळे केसांना फाटे फुटतात व ते दुतोंडी बनतात ज्यामुळे केस मुळापासून तुटू लागतात. लांब केस कोणाला नको असतात? सगळ्यांनाच हवे असतात. पण होतं काय की, केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काय वापरायचे, काय नाही वापरायचे याचे योग्य ज्ञान आणि माहिती नसते त्यामुळे अनेकदा नको त्या उपायांवर आपला वेळ व मेहेनत खर्च होते. आपल्याला सुद्धा असा अनुभव आला असेलच की आपण अनेक उपाय करून पहिले पण त्याचा तुमच्या केसांवर परिणामच झाला नाही. पण आता काळजी करू नका. सुप्रसिद्ध ब्यूटी एक्स्पर्ट शहनाज हुसेन यांनी केसांच्या वाढीसाठी व सौंदर्यात भर घालण्यासाठी नेमके काय उपाय करावेत, ते काय आहेत हे पाहूयात(Struggling With Hair Fall? Shahnaz Husain Shares Home Remedies For Hair Growth).

केस काळेभोर, घनदाट, लांबसडक होण्यासाठी शहनाज हुसेन यांच्या खास टिप्स.... 

१. भाज्यां - डाळींमध्ये फोडणीसाठी म्हणून वापरण्यात येणारा लसूण हा स्वयंपाक घरातील एक महत्वाचा पदार्थ आहे. पदार्थांना चव येण्यासाठी म्हणून वापरल्या जाणार्‍या लसणात केसगळती रोखणारे गुणधर्म असतात. अशावेळी केसांना तेल लावताना, नेहमीच्या तेलात लसणाच्या पाकळ्या किंवा लसूण किसून घालावा व हे तेल थोडे गरम करून घ्यावे, या तेलाने केसांना मसाज केल्यास केसांच्या अनेक समस्या दूर होतात. 

मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...

२. नेहमी केसांना तेल लावताना, थंड तेल लावण्याऐवजी, कोणतेही तेल थोडे कोमट करून केसांच्या मुळांना लावून हलक्या हातांनी मसाज करावा. ही हॉट ऑईल थेरपी टाळूची छिद्रे उघडण्याचे काम करते. यामुळे आपले केस व स्कॅल्प यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.

आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...

 ३. कडुलिंब त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. त्यात कोंडा आणि केसगळती रोखण्यासाठीचे मुख्य गुणधर्म देखील असतात. कडुलिंबाच्या पानांचा वापर करण्यासाठी, कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा आणि त्या पाण्याने आपले केस आठवड्यातून २ ते ३ वेळा धुवा.

४. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तसेच केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण ताज्या नारळाच्या दुधाचा देखील वापर करू शकता. केसांसाठी नारळाच्या दुधाचा वापर केल्यास आपले केस चमकदार व मऊ होतात. केसांचा चमकदारपणा वाढवण्यासाठी ताज्या नारळाचे छोटे छोटे तुकडे कापून ते मिक्सरमधून फिरवून त्यांची बारीक पेस्ट बनवून घ्या. आता ही पेस्ट गाळून या नारळातील दूध काढून घ्यावे. हे नारळाचे दूध केसांना व केसांच्या मुळांना लावून घ्यावे. यामुळे रुक्ष झालेल्या केसांचा चमकदारपणा परत आणण्यास मदत मिळत.

५. केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक प्रोटिन्स हे अतिशय महत्वाचे असतात. पण बाजारातून विकतचे प्रोटीन आणून केसांना लावण्याऐवजी आणि केराटिन ट्रिटमेंट  घेण्यापेक्षा आठवड्यातून एकदा केसांना अवाकाडो, दही, नारळाचे दूध यासारखे नैसर्गिक प्रोटीनने समृद्ध असणाऱ्या घटकांपासून तयार केलेला हेअर मास्क लावावा. 

जास्वंद-मोगरा घालून केलेलं तेल लावा, विसरा केसाच्या समस्या! ऋजुता दिवेकरच्या आईने शेअर केला खास उपाय...

६. रोजच्या वापरातील कांदा हा देखील केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरतो. एक छोटासा कांदा घेऊन तो किसून त्याचा रस टाळूवर लावल्यास केस लवकर वाढतात आणि टक्कलही पडत नाही.

शेवग्याच्या पानांचा असा करा वापर, केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय..केस होतील मजबूत व दाट...

Web Title: Struggling With Hair Fall? Shahnaz Husain Shares Home Remedies For Hair Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.