Join us  

केस गळतीची समस्या कायमची संपवायची ? करा कढीपत्त्याच्या एक परफेक्ट उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2023 9:46 PM

Homemade Curry Leaves Hair Oil for Double Hair Growth : केस गळत असतील तर कढीपत्ता हा अत्यंत गुणकारी पर्याय आहे.

रोजच्या जेवणातील फोडणी ही कढीपत्त्याशिवाय अधुरीच आहे. आपल्याकडे प्रत्येक भाजीत, डाळीत, आमटीत कढीपत्त्याची खमंग फोडणी देऊन जेवणाची चव वाढवली जाते. असा हा सुगंधाने समृद्ध कढीपत्ता केवळ स्वयंपाकासाठीच नाही तर त्याचा वापर केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर मानला जातो. कढीपत्त्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स, बीटा कॅरोटीन आणि प्रथिने हे केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यात भर पाडण्यात मदत करतात. यासोबतच केस गळणे, अकाली पांढरे होणे, केसांत कोंडा होणे यांसारख्या केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरते. कढीपत्त्यामध्ये अमीनो अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते. जे केस निरोगी आणि मजबूत ठेवण्यास उपयोगी येते. तसेच याच्या नियमित वापराने लांब, दाट आणि काळेभोर केस येण्यास मदत होते.    

 काहीवेळा आपण कितीही महागड्या स्वरुपातील उपचार केले तरीही केसांच्या समस्या दूर होत नाहीत. उलट त्या अधिकच वाढत जातात, यासाठीच आपण  केसांसंबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी कढीपत्त्याच्या तेलाचा वापर करू शकता. लांब, घनदाट आणि निरोगी केस हवे असतील तर रोजच्या जेवणात  कढीपत्ता तर वापराच, पण त्याचसोबतच कढीपत्त्याच्या तेलाने (Curry leaf oil) हेअर मसाजही करणे फायदेशीर ठरेल(Struggling with hair loss? This curry-leaf hair oil can help to reduce hair fall).

कढीपत्त्याचे तेल नेमके बनवायचे कसे ? 

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात एरंडेल तेल ओतून घ्यावे. आत हे एरंडेल तेल हलकेसे गरम करून घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात कढीपत्त्याची २० ते २५ पाने घालावीत. आता उभा तेलाला एक हलकीशी उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून हे तेल थोडे थंड होण्यासाठी बाजूंला ठेवून द्यावे. तेल संपूर्णपणे थंड झाल्यावर हे तेल गाळणीने गाळून एका स्वच्छ काचेच्या बॉटलमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे. 

१ कांदा- १ कप खोबरेल तेल- पाहा या तेलाची जादू; केस गळती ते कोंडा- केसांच्या समस्या गायब!

आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...

कढीपत्त्याच्या तेलाचा केसांवर कसा वापर करावा ? 

हे तेल हातावर घेऊन आपण हलक्या हातानी टाळूवर लावून मसाज करू शकता. यासोबतच बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांना तेल लावून मसाज करून घ्यावा. हे तेल आपण स्कॅल्पला लावतो त्याचप्रमाणे संपूर्ण केसांना लावून घ्यावे. त्यानंतर हे तेल केसांवर २ ते ३ तास किंवा संपूर्ण रात्रभर तसेच राहू द्यावे. दुसऱ्या दिवशी सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. 

जास्वंद-मोगरा घालून केलेलं तेल लावा, विसरा केसाच्या समस्या! ऋजुता दिवेकरच्या आईने शेअर केला खास उपाय...

कढीपत्त्याचे तेल केसांना लावण्याचे फायदे :- 

१. केसातील कोंडा नियंत्रित करता येतो. 

२. केसांना चमक येते.

३. केस काळेभोर, घनदाट होण्यास मदत मिळते. 

४. केसांचे डिप कंडिशनिंग केले जाते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स