इतर कोणत्याही स्टार किडच्या तुलनेत शाहरुखची मुलगी सुहाना ही जबरदस्त लक्ष वेधून घेत आहे. तिच्या कोणत्याही गोष्टीची चर्चा सोशल मिडियावर चांगलीच रंगते. मध्यंतरी सुहानाने आयपीएल ऑक्शन (Suhana in IPL auction) कार्यक्रमाला लावलेली उपस्थितीही चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती. सुहानासोबत त्यावेळी तिचाच भाऊ आर्यन आणि जुहीची लेक जान्हवी हे देखील उपस्थित होते. पण असं असतानाही सगळ्यात जास्त ॲट्रॅक्शन सिकर ठरली ती सुहाना...
आता पुन्हा एकदा सोशल मिडियावर सुहानाची जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे. यावेळी या चर्चेचे कारण आहे सुहानाचे सौंदर्य.. सुहानाने तिचे काही फोटो सोशल मिडियावर अपलोड केले असून अल्पावधीतच हे फोटो जबरदस्त व्हायरल झाले आहेत. सुहानाने नेसलेली ब्राईट रेड रंगाची साडी सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्रा (Manish Malhotra collection) यांनी डिझाईन केली असून त्यांच्या नव्या कलेक्शनमधली ही साडी लेडिज विंगमध्ये चांगलीच हिट ठरली आहे..
सिक्विन साडी ही मनिषा मल्होत्रा यांचं सिग्नेचर कलेक्शन.. त्यांनीच सिक्विन साड्यांचा ट्रेण्ड जबरदस्त पॉप्युलर केला. आता यामध्ये त्यांनी आणखी व्हेरिएशन आणलं आहे, त्यात त्यांनी जाॅर्जेट साडीवर सिक्विन वर्क केलं आहे. सुहानाची लाल साडी याच प्रकारची आहे. तिच्या या संपूर्ण साडीवर सिक्विन लावलेल्या आडव्या रेषा असून त्या एकमेकींना समांतर आहेत. तसेच साडीच्या काठाला आणि पदरावर लाल रंगाचे चमकदार बीड्स लावले असून त्यामुळे साडीचे काठ आणखीनच उठून दिसत आहेत.
या साडीवर सुहानाने स्लिव्हलेस ब्लाऊज घातलं असून त्यावरही पुर्णपणे सिक्विन वर्क केलेलं आहे. कानात झुमके आणि मोठी काळी टिकली एवढ्याच ॲक्सेसरीज तिने घातल्या असून त्यातही तिला परफेक्ट कॅची लूक मिळाला आहे. सुहाना फक्त २१ वर्षांची असून ती नुकतीच परदेशातले तिचे शिक्षण पुर्ण करून भारतात परतली आहे...