लग्नात सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलीची इच्छा असते की ती फंक्शनमध्ये सर्वात खास दिसावी. तुमचा लूक युनिक करण्यासाठी तुम्ही काही प्रयोग देखील करू शकता, पण प्रत्येक वेळी तुमचा प्रयोग यशस्वी होतोच, असे नाही. (Styling Tips for wedding) कधी-कधी असंही पाहायला मिळतं की वेगळं दिसण्यासाठी तुम्ही फॅशनची घोडचूक करता. लग्नात लेहेंगा किंवा साडी नेसणं मुली पसंत करतात. याशिवाय तुम्ही वेगवेगळे स्टाईल्सही करू शकता. (Things you should never wear to wedding)
तुम्ही इंडियन आणि वेस्टर्न पोशाख मिक्स आणि मॅच करून परिधान करू शकता. पण कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या लुककडे विशेष लक्ष दिले पाहिजे. फॅशनच्या नावाखाली काहीही घालणं योग्य दिसत नाही. पार्टी किंवा लग्नातला तुमचा लूक अधिक खुलून दिसावा यासाठी काही टिप्स सुचवणार आहोत.
व्हाईट किंवा ब्लॅक घालणं
ही सगळ्यात कॉमन चूक मुली करतात. पार्टीला जाताना किंवा कोणत्याही कार्यक्रमााला जाताना ब्लॅक किंवा व्हाईट रंगाचं काहीही घातल्यानं तुम्ही चांगलेच दिसाल. पण वरून खालपर्यत याच रंगाचे कपडे घालणं हे खास दिसत नाही. आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही ब्राईट, सोबर कलर्स ट्राय करायला हवेत. जर आऊटफिटचा एकच रंग असेल तर ज्वेलरी किंवा फुटवेअर्समध्ये वेगवेगळे कलर्स ट्राय करू शकता.
डेनिम घालू नका
जर तुम्ही लग्नाच्या फंक्शनसाठी जात असाल तर चुकूनही डेनिमला तुमच्या लुकचा भाग बनवू नका. जरी डेनिम जॅकेट इत्यादी मुलींना छान लुक देतात, परंतु जेव्हा तुम्ही लग्नाच्या कार्यक्रमासाठी तयार होत असाल, तेव्हा फेमिनाइन लूक अधिक मुलींना आणि स्त्रियांना शोभून दिसतो. अशा कार्यक्रमांना शक्यतो डेनिम जॅकेट किंवा जीन्स वगैरे टाळले पाहिजे.
हॅण्डबॅग किंवा टियारा
हेडबँड किंवा टिआरा खूप सुंदर दिसतो आणि कोणत्याही मुलीचं सौदर्यं वाढवतो यात शंका नाही. पण जर तुम्ही ते लग्नात घालण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. ही खास बॅग, टियारा वधूवर छान दिसते आणि जर तुमचे स्वतःचे लग्न असेल तर लग्नाच्या फंक्शनमध्ये अशा प्रकारचे दागिने कॅरी करू शकता. पण नातेवाईकांच्या लग्नात अशा प्रकारचा लूक करू नका.
हेवी ज्वेलरी टाळा
लग्नाची फंक्शन्स हा नक्कीच एक मोठा प्रसंग आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या दागिन्यांसह गेटअप करू शकता. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व प्रकारचे भारी दागिने घालायचे यामुळे तुमचा लूक खराब आणि खूप जड होईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही जड नेकपीस घातला असेल तर जड कानातले, मांगटीका आणि हातातील दागिने घालू नका. तुमच्या पोशाखानुसार दागिने मॅच करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही सूटसोबत हेवी लूकचे कानातले घालत असाल तर तुम्ही नेकपीस वगळू शकता किंवा हलके नेकपीस घालू शकता.