Join us  

कियारा अडवाणी ते आलिया भट: विंटर फॅशन 'हॉट' लूक; गरम कपड्यांची खरेदी करताना पाहा नव्या स्टाइल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 2:45 PM

Fashion trends: थंडी म्हणजे घट्ट लपेटलेली शाल आणि जाडं भरडं स्वेटर.. हा ट्रेण्ड कधीच मागे पडला आहे... थंडीतही मस्त स्टायलिश कपडे कसे घालायचे ते या अभिनेत्रींकडे बघून ठरवा...

ठळक मुद्देथंडीत बाहेर जायचं तर तुमच्या कपाटात जरा बऱ्यापैकी विंटर कलेक्शन (winter collection) असायला हवं.

सध्या गुलाबी थंडीचा बहर उलटून कधीच बोचरी थंडी सुरू झाली आहे. अशा थंडीत बाहेर जायचं तर तुमच्या कपाटात जरा बऱ्यापैकी विंटर कलेक्शन (winter collection) असायला हवं. हल्ली विंटर कलेक्शनच्याही अफलातून व्हराईटी मार्केटमध्ये आल्या आहेत. पण बऱ्याचदा हे कपडे घालायचे कसे, असा प्रश्न आपल्याला पडतो. किंवा या कपड्यांचं योग्य, परफेक्ट कॉम्बिनेशन कसं करायचं, हे समजत नाही. म्हणूनच या काही ट्रेण्डी विंटर फॅशन (trendy fashion in winter)  बघा..

 

१. ज्यूट जॅकेट्स (jackets)साधारण मांडीपर्यंत येणारे हे ज्यूट जॅकेट्स एखाद्या ओव्हरकोटप्रमाणे दिसतात. सध्या अशा जॅकेट्सच्या अनेक व्हराईटी बाजारात आणि ऑनलाईन उपलब्ध आहेत. ७००- ८०० रूपयांपासून हे जॅकेट्स बाजारात मिळत आहेत. जीन्स, शर्ट आणि त्यावर हे स्टायलिश जॅकेट घातलं की झाला तुमचा विंटर लूक कम्प्लिट... 

 

2. शालींचा नवा ट्रेण्ड.. (shall and scarf)पुर्वी कसं थंडीत शाल अंगावर घ्यायची म्हटली की सगळ्या अंगावर ती लपेटून घ्यावी लागायची. शिवाय दोन्ही हात सतत शालच्या खाली किंवा मग शाल सावरण्यात अडकलेले. म्हणूनच त आता या नविन प्रकारच्या शाली वापरा. सुटसुटीत आणि स्टायलिश. या शाली तुम्हाला अंगावर लपेटायच्या नाहीत. तर एखादा शर्ट घातल्याप्रमाणे गळ्यातून सरळ अंगावर टाकायच्या आहेत. वेस्टर्न लूकवर या शाली अगदी परफेक्ट ठरतात.

 

३. विंटर शूज (winter shoes)सध्या कपडेच नाही तर फुटवेअरमधेही जबरदस्त विंटर कलेक्शन आलं आहे. लो कट बुटीज, अँकल बूट्स, गुडघ्यापर्यंत येणारे नी हाय बूट्स फॅशन म्हणून वापरले जातात. हे शूज खूपच स्टायलिश आणि स्टनिंग लूक देतात, हे मात्र खरं.

 

४. श्रग आणि स्वेटशर्ट्स..(shrug and sweat shirts)थंडीच्या दिवसातला हा सगळ्यात आरामदायी आणि रिलॅक्स मामला... एखादी जीन्स आणि त्यावर श्रग किंवा स्वेटशर्ट घातला की झालात तुम्ही तयार... अगदी थर्टीफस्टच्या पार्टीपासून ते मुव्ही, शाॅपिंग असं कुठेही जाताना तुम्ही हा लूक अगदी सोप्या पद्धतीने कॅरी करू शकता. श्रग आणि स्वेटशर्ट तर अगदी ५००- ६०० रूपयांपासून ऑनलाईन तसेच लोकल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनथंडीत त्वचेची काळजी