Lokmat Sakhi >Beauty > ब्लॅकहेड्समुळे त्रस्त आहात? चेहऱ्याची शोभा जाते, हेअर पिनचा करा असा वापर, चेहरा होईल साफ - दिसेल सुंदर

ब्लॅकहेड्समुळे त्रस्त आहात? चेहऱ्याची शोभा जाते, हेअर पिनचा करा असा वापर, चेहरा होईल साफ - दिसेल सुंदर

Suffering from blackheads? Use of Homemade Scrub and Hair Pin will help you out चेहरा तेलकट असल्यामुळे नाकावर ब्लॅकहेड्स जमतात. यातून सुटका मिळवण्यासाठी एक स्क्रब आणि पिन कामी येईल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2023 04:29 PM2023-01-31T16:29:56+5:302023-01-31T16:30:45+5:30

Suffering from blackheads? Use of Homemade Scrub and Hair Pin will help you out चेहरा तेलकट असल्यामुळे नाकावर ब्लॅकहेड्स जमतात. यातून सुटका मिळवण्यासाठी एक स्क्रब आणि पिन कामी येईल..

Suffering from blackheads? The face is beautified, use hair pins like this, the face will be clean - it will look beautiful | ब्लॅकहेड्समुळे त्रस्त आहात? चेहऱ्याची शोभा जाते, हेअर पिनचा करा असा वापर, चेहरा होईल साफ - दिसेल सुंदर

ब्लॅकहेड्समुळे त्रस्त आहात? चेहऱ्याची शोभा जाते, हेअर पिनचा करा असा वापर, चेहरा होईल साफ - दिसेल सुंदर

अनेकदा चेहरा कितीही सुदंर असला तरी चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स लक्ष वेधून घेतात. काहींचा चेहरा कोरडा असतो तर काहींचा तेलकट. तर काहींचा चेहरा संपूर्ण साफ असतो मात्र, नाकावरचा भाग हा तेलकट असतो. ज्यावर ब्लॅकहेड्सने राज्य केले असते. चेहऱ्यावरील मृत पेशींखाली तेल साचते ज्यामुळे  त्वचेवर लहान दाण्यांच्या रूपात त्वचा निघू लागते. आणि ही त्वचा हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडायझेशन होऊन काळी पडते. हेच ते ब्लॅकहेड्स, जे बहुतेक नाकावर अथवा नाकाच्या बाजूला येतात.

कोणताही कार्यक्रम असो या प्रोग्राम नाकावरील ब्लॅकहेड्स आपल्या सौंदर्याचा निखार हिरावून घेतात. हे ब्लॅकहेड्स देखील सहजासहजी लवकर निघत नाही. त्यांना काढण्यासाठी आपल्याला पार्लर गाठावे लागते. दरम्यान, पार्लरमध्ये जाण्यापेक्षा आपण घरगुती पद्धतीने देखील ब्लॅकहेड्स काढू शकता. फक्त एक स्क्रब आणि  हेअर पिन आपल्याला नाकावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी मदत करतील. चला तर मग ही ट्रिक कोणती आहे पाहूयात.

स्क्रब बनवण्यासाठी लागणारं साहित्य

साखर

मध

लिंबू

सर्वप्रथम एका वाटीत साखर, मध आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण तयार झाल्यानंतर नाकावर आणि ओठांच्या खालील भागावर लावा. मिश्रण लावल्यानंतर हाताने स्क्रब करा. स्क्रब केल्यानंतर एक हेअर पिन घ्या. या हेअर पिनच्या उलट्या बाजूने नाक आणि हनुवटीवरील ब्लॅकहेड्स काढा.

स्क्रबमुळे ब्लॅकहेड्स बाहेर येतात. त्यांना मऊपणा येतो. यामुळे ब्लॅकहेड्स लवकर निघतात. ही घरगुती रेमिडी आठवड्यातून दोन वेळा करा, याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स निघून जातील, चेहरा साफ दिसेल.

Web Title: Suffering from blackheads? The face is beautified, use hair pins like this, the face will be clean - it will look beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.