पनीर हा सगळ्यांचाच आवडता पदार्थ. पनीरपासून बनवलेले सर्वच पदार्थ प्रत्येक जण आवडीने खातात. पनीर हा फक्त खाण्यापुरता पदार्थ नसून, आपल्या चेहऱ्याला देखील ग्लो करण्यास मदत करतो. या गुलाबी थंडीत अनेक जणांची स्किन ही ड्राय आणि निस्तेज होते. महागड्या प्रोडक्ट्सचा वापर न करता, आपण घरच्या घरी पनीरपासून फेसपॅक बनवू शकता. पनीरमध्ये असलेले गुणधर्म आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
मुख्यतः तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी पनीर फेस पॅक खुपच उपयुक्त आहे. तेलकट त्वचेमुळे अनेकदा पिंपल्सचा त्रास होतो. यामुळे ऑईली स्किन असणाऱ्यांसाठी पनीर फेस पॅक निश्चितच फायदेशीर ठरला आहे. पनीरमुळे आपला चेहरा ग्लो तर करतोच. यासह डेड स्किन निघून एक कोमल त्वचा दिसून येते.
पनीर फेसपॅक बनवण्यासाठी साहित्य
पनीरचे १ ते २ तुकडे
एक चमचा लिंबाचा रस
१ चमचा मध
२ व्हिटॅमिन ई कॅप्सूल
कृती
सर्वप्रथम, एका भांड्यात संपूर्ण साहित्य घ्या. आता सर्व साहित्य चांगले मॅश करा. त्यानंतर चेहरा पूर्णपणे पाण्याने स्वच्छ करा, आणि पुसून घ्या. यानंतर, पॅक चेहऱ्यापासून ते मानेपर्यंत लावा. आता हा पॅक 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू ठेवून द्या. हे पॅक कोरडे झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
लवकर रिझल्ट दिसण्यासाठी ही प्रक्रिया महिन्यातून चार ते पाच वेळा करावी. जेणेकरून एक कोमल आणि सुंदर त्वचा मिळेल. आणि या हिवाळ्यात सुद्धा आपली ग्लोविंग त्वचा अधिक चमकेल.
हा पॅक लावल्याने त्वचेवर चमक तर येतेच, त्यासोबतच चेहऱ्यावरील डागही निघून जातात. याशिवाय चेहऱ्यावर असलेले बारीक रेषाही दिसत नाहीत. यासह सुरकुत्याही कमी होऊ लागतात.