हिवाळ्यात आपल्याला त्वचेची काळजी अधिक घ्यावी लागते. कारण या दिवसात त्वचा कोरडी, निस्तेज आणि काळपट पडते. आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतो. मात्र, काही प्रोडक्ट्स आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात. आपल्याला जर घरच्या घरी चमकदार त्वचा हवी असेल तर, कापराचे वापर करून पाहा.
कॉस्मेटिक उत्पादनांपेक्षा कापराचा चांगला वापर करून घेता येईल. कापराचे फायदे अनेक आहेत. कापूर हा असा पदार्थ आहे ज्यामध्ये अँटीबायोटिक आणि अँटीफंगल घटक असतात आणि हे त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी मदत करतील.
कापूर आणि खोबरेल तेल
खोबरेल तेल आणि कापूर या दोन्हीमध्ये अँटीबैक्टीरियल गुणधर्म आढळतात. खोबरेल तेल आणि कापूर एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावल्यास, त्वचेमधील घाण सहज निघून जाते यासह डागांची समस्या दूर होते. दोन चमचे कापूर बारीक करून त्यात एक चमचा खोबरेल तेल मिसळा, आणि चेहऱ्यावर लावा. याने चेहऱ्यावरील समस्या दूर होईल.
मुलतानी माती आणि कापूर
कापूर आणि मुलतानी माती चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास तसेच त्वचा चमकदार बनविण्यात मदत करतात. कापराचा वापर करण्यासाठी दोन चमचे मुलतानी मातीमध्ये कापूर पावडर टाका. आता त्यात गुलाबजल टाकून पेस्ट तयार करा. हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. या पॅकमुळे काळे डाग कमी होतील आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार होईल.
कापूर आणि बेसन
कापूर आणि बेसन चेहऱ्यावर लावल्याने डाग सहज दूर होतात. कापूर आणि बेसन लावण्यासाठी एक चमचा बेसनमध्ये कापूर मिसळा, हवे असल्यास आपण बेसनमध्ये कापराचे तेलही मिसळू शकता. त्यानंतर गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे ठेवा, चेहऱ्यावर लावल्याने काळ्या डागांची समस्या सहज दूर होईल.
कापूर आणि एरंडेल तेल
कापूर आणि एरंडेल तेलाचे मिश्रण लावल्याने चेहरा चमकदार होतो, यासाठी एका भांड्यात एक चमचा कापूर पावडर घ्या आणि त्यात दोन चमचे एरंडेल तेल मिसळा. आता हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून दोन वेळा लावा.