Join us  

१ कांदा- १ कप खोबरेल तेल- पाहा या तेलाची जादू; केस गळती ते कोंडा- केसांच्या समस्या गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2023 8:49 PM

Onion Oil For Hair Benefits How To Use & Make At Home : केस गळतात या समस्येनं अनेकांना छळले आहे, त्यासाठीच हा सोपा आणि असरदार इलाज...

आपले केस काळे, दाट आणि लांब असावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. साधारणपणे बऱ्याचजणांना वाटते की, ही इच्छा पूर्ण करणे म्हणजे अशक्य गोष्ट आहे. परंतु असा काही गैरसमज करून न घेता, आपण देखील आपल्याला हवे तसे दाट, लांब केस करू शकतो. अनेक वेळा प्रदूषण, लाइफस्टाइलशी संबंधित समस्या, टेंशन, स्ट्रेस वा डिप्रेशनच्या कारणामुळे केस फक्त गळतच नाहीत, तर वेळेआधीच पांढरेही होत असतात. एवढेच नाही तर केस गळती, केस तुटणे, केसांची वाढ खुंटणे, केस रुक्ष निस्तेज दिसणे यांसारख्या असंख्य समस्यांचा सामना करावा लागतो. या केसांच्या अनेक तक्रारींपासून सुटका करून घेण्यासाठी आपण अनेक घरगुती किंवा महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्स करून घेण्याच्या तयारीत असतो. 

भारतीय स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे मसाले आणि भाज्या केवळ जेवणाची चवच वाढवत नाहीत तर आरोग्य आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात. कांदा ही या भाज्यांपैकीच एक आहे, जी आरोग्य आणि त्वचेसाठी तसेच आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे. आपले केस मजबूत बनवण्यासोबतच ते केस गळणे थांबवते आणि केसांच्या इतर समस्यांपासून मुक्त होण्यास खूप मदत करते. कांद्याच्या या फायद्यांमुळे लोक अनेकदा कांद्याचे तेल वापरण्याला प्राधान्य देतात.  कांदा तेलाचे अनेक ब्रँड बाजारात सहज उपलब्ध आहेत, परंतु त्यांची किंमत खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत बाजारात उपलब्ध असलेले हे तेल घेणे महागात पडते. जर आपल्यालाही केसांना कांद्याचे तेल लावायचे असेल तर या सोप्या पद्धतीने आपण ते घरीच तयार करू शकता(Suffering From Hair Loss? Try This Homemade Onion Oil For Stronger And Thicker Hair).

कांद्याचे तेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. कांदा - १ मोठा २. खोबरेल तेल - १ कप 

१ चमचा मेथी दाणे आणि चमचाभर कोरफड जेल, केसातला कोंडा होईल कमी- खास उपाय...

कांद्याचे तेल कसे बनवायचे याची कृती :- 

१. कांद्याचे तेल बनवण्यासाठी प्रथम कांद्याचा रस तयार करून घ्या.२. कांद्याचा रस नसेल तर कांदा मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा.३. आता एका भांड्यात खोबरेल तेल ओतून नंतर त्यात कांद्याचा रस किंवा पेस्ट घाला व हे मिश्रण गॅसच्या मंद आचेवर ठेवून गरम करून घ्या.  ४. दोन्ही साहित्य नीट मिक्स झाल्यावर गॅसवरून उतरवा आणि थंड होऊ द्या.५. यानंतर चाळणीने तेल गाळून एका बरणीत भरून ठेवा.६. घरगुती कांद्याचे तेल तयार आहे. हे तेल तुम्ही किमान ६ महिने वापरू शकता.

जास्वंद-मोगरा घालून केलेलं तेल लावा, विसरा केसाच्या समस्या! ऋजुता दिवेकरच्या आईने शेअर केला खास उपाय...

आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...

कांद्याचे तेल वापरण्याचे फायदे :- 

१. कांद्याचे तेल वापरल्याने केस गळण्याची समस्या दूर होते. कोरड्या केसांसाठीही ते फायदेशीर ठरते. २. कोरडेपणामुळे होणार्‍या कोंड्याच्या समस्येने तुम्ही हैराण असाल तर कांद्याचे तेलही वापरू शकता.३. कांद्याचे तेल केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करेल आणि केसांना गुळगुळीत करेल.४. कांद्याचे तेल केस मजबूत आणि घट्ट करण्यास मदत करते.५. निस्तेज केसांसाठीही कांद्याचे तेल वापरता येते. यामुळे केस गुळगुळीत आणि चमकदार होतील.६. कांद्याचे तेल नियमित वापरल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स