हिवाळ्यात थंड हवा आणि वातावरणामुळे ओठ अनेकदा फाटतात, सुखतात आणि भेगा पडतात. हिवाळ्यात त्वचा, विशेषतः ओठांची त्वचा कोरडी पडते. ही समस्या टाळण्यासाठी अनेक घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय उपलब्ध आहेत. या उपायांचा अवलंब करून या समस्येपासून सुटका होऊ शकते आणि आपले ओठ मुलायम राहू शकतात. घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊया...
घरगुती उपाय
तूप किंवा लोणी : तूप आणि लोणी दोन्ही त्वचेसाठी खूप पोषक असतात. हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी थोडं तूप किंवा लोणी ओठांवर लावा. हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतं.
मध : मध एक नैसर्गिक हायड्रेटिंग एजंट आहे आणि त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील असतो. मध ओठांवर लावा आणि काही वेळाने धुवा. यामुळे ओठ मुलायम आणि निरोगी राहतात.
खोबरेल तेल : खोबरेल तेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे कोरडे आणि फाटलेले ओठ बरे करण्यास मदत करतात. हिवाळ्यात खोबरेल तेल वापरा.
एलोवेरा जेल : ओठांची सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर केला जाऊ शकतो. त्यात थंड करण्याचे गुणधर्म आहेत, जे ओठांना आराम देतात आणि फाटण्यापासून बचाव करतात.
पाणी : दिवसभरात पुरेसे पाणी प्यायल्याने संपूर्ण शरीरात आर्द्रता टिकून राहते आणि फाटलेल्या ओठांची समस्या कमी होते.
आयुर्वेदिक उपाय
तिळाचे तेल : आयुर्वेदात तिळाचे तेल अतिशय उपयुक्त मानले जाते. हे ओठांना ओलावा देतं आणि फाटलेली त्वचा बरी करतं. हिवाळ्यात नियमितपणे ओठांवर तिळाचं तेल लावल्याने कोरडे आणि फुटलेले ओठ टाळू शकता.
बदामाचं तेल : बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात जे ओठ मुलायम करतात आणि थंड हवामानापासून त्यांचं संरक्षण करतात. रात्री झोपण्यापूर्वी बदामाचं तेल लावा.
गुलाबपाणी : गुलाबपाण्यात त्वचेला थंडपणा आणि आर्द्रता देण्याचे गुणधर्म आहेत. ते ओठांवर लावा, यामुळे ओठ हायड्रेट राहतील आणि त्यांच्यावरील सूज देखील कमी होईल.
कडुलिंबाचं तेल : कडुलिंबाचं तेल अँटीबॅक्टीरियल आणि अंटीफंगल आहे, ज्यामुळे फाटलेल्या ओठांमध्ये संसर्गाचा धोका कमी होतो. हे ओठांना निरोगी आणि मुलायम ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.