Join us  

Summer Hair Care Tips : कडक उन्हाळ्यामुळे केसांची रया झाली? भर उन्हातही केस मुलायम, चमकदार ठेवायचे तर करा फक्त ४ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 12:27 PM

Summer Hair Care Tips : उन्हाळ्यातही केस गळू नयेत आणि वाढावेत असे वाटत असेल तर काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात.

ठळक मुद्देगार पाण्यामुळे केसांत नैसर्गिकरित्या तेलाची निर्मिती होते आणि केस जास्त मजबूत होण्यास त्याचा उपयोग होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत स्टायलिंग टूल्स वापरणे योग्य नाही. त्यामुळे केसांचा पोत आणखी खराब होण्याची शक्यता असते.

उकाडा दिवसेंदिवस इतका वाढला आहे की अक्षरश: जीव हैराण झाला आहे. शरीराबरोबरच अनेकदा केसांतूनही घामाच्या धारा वाहतात. यामुळे केसांची पार रया होऊन जाते. एकीकडे हवेतील कोरडेपणामुळे केस रखरखीत होतात तर दुसरीकडे घामामुळे चिकट होतात. उन्हाळ्यात केस कोरडे झाल्याने एकतर खूप गळतात आणि त्यांची वाढही थांबते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत लग्नसराईचा काळ असतो. अशावेळी आपले केस चमकदार मुलायम दिसायला हवेत असे आपल्याला वाटते. (Summer Hair Care Tips) मात्र अशावेळीच केस इतके खराब होतात की आपला सगळा लूकच खराब होतो. त्यामुळे उन्हाळ्यातही केस गळू नयेत आणि वाढावेत असे वाटत असेल तर काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. केसांचे सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याविषयी...

(Image : Google)

१. केसांचा पोत लक्षात घेऊन शाम्पूची निवड करा 

उन्हाळ्याच्या दिवसांत केसांना खूप घाम येतो. त्यामुळे आठवड्यातून किमान दोन वेळा तरी केस धुवायला हवेत. आपले केस आणि त्याखालची त्वचा ड्राय असेल तर आपण सल्फेटचा शाम्पू वापरु शकतो. तसेच उन्हाळ्यात डेड सेल्स, हेअर स्टायलिंग प्रॉडक्ट्स आणि कोंडा यांपासून दूर राहायचे असेल तर क्लेरिफाईंग शाम्पूचा वापर करायला हवा. 

२. कंड़िशनर निवडताना 

केसांचे पोषण होण्यासाठी कंडिशनर अतिशय उपयुक्त असतो. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कंडीशनर मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या केसांना जो कंडिशनर सूट होतो तोच वापलेला चांगला. कंडीशनर आपल्या केसांच्या प्रमाणात घेऊन तो केसांच्या मुळांशी न लावता केसांना लावायला हवा. तसेच १० मिनीटे कंडिशनर केसांवर तसाच ठेवून मग केस पाण्याने स्वच्छ धुवावेत. 

३. स्टायलिंग टूल्सचा वापर

उन्हाळ्याच्या दिवसांत स्टायलिंग टूल्स वापरणे योग्य नाही. त्यामुळे केसांचा पोत आणखी खराब होण्याची शक्यता असते. केस सरळ करणे, वाळवणे, केस कुरळे करणे यासाठी आपण अनेकदा वेगवेगळी उपकरणे वापरतो पण अशी उपकरणे वापरणे केसांसाठी धोक्याचे ठरु शकते. यामुळे केस गळतात तसेच त्यांची वाढही खुंटते. त्यामुळे मुख्यत्वे उन्हाळ्यात ही उपकरणे वापरणे टाळावे. 

(Image : Google)

४. गार पाणी वापरा

उन्हाळ्याच्या दिवसांत आधीच आपल्याला खूप गरम होत असते. सतत घाम येत असल्याने अंगावर गार पाणी घेण्याची इच्छा होते. अशावेळी केसही गार पाण्याने धुतले तर केसांचा पोत चांगला राहण्यास मदत होते. हेअर क्यूटीकल बंद करुन केसांना शायनी करण्यासाठी गार पाणी उपयुक्त ठरते. गार पाण्यामुळे केसांत नैसर्गिकरित्या तेलाची निर्मिती होते आणि केस जास्त मजबूत होण्यास त्याचा उपयोग होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीसमर स्पेशल