उन्हाळ्यात घराबाहेर पडणे खूप कठीण झालंय. कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर काळपटपणा येतो आणि नंतर आपल्याला सनबर्न आणि चिडचिड होण्याची समस्या येते. (Sunburn) सनबर्नमध्ये, त्वचेचा वरचा थर खराब दिसू लागतो. चेहऱ्याचा संवेदनशील भाग उन्हात जळण्याची शक्यता असते. जसे की डोळे आणि ओठांच्या आसपासची त्वचा. (Summer Skin Care Tips ) बहुतेक लोक उन्हात आपला चेहरा झाकतात, जरी झाकलेला भाग सूर्यापासून संरक्षित असला तरी उघडा असलेला भाग मात्र काळपट पडतो. ही सनबर्नची लक्षणे आहेत, ज्याला स्पर्श केल्यावर जळजळ देखील होते. (4 Best home remedies to get rid of a sunburn overnight) ही समस्या काही दिवसातच बरी होते, परंतु जर तुम्हाला यापासून त्वरित सुटका हवी असेल तर काही घरगुती उपायांनी यापासून सुटका मिळू शकते. यामुळे त्वचेवरील सन टॅन देखील दूर होईल. त्याचप्रमाणे या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील काम करतील. (Home remedies for sun tan)
एलोवेराचा लेप लावा
त्वचेला आराम मिळण्यासाठी थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर टिश्यू पेपरच्या साहाय्याने टॅप करून पुसून टाका. नंतर एलोवेरा जेल लावा. यासाठी कोरफडीची ताजी पाने वापरा. प्रथम पानांचे जेल बारीक करून फ्रीजमध्ये ठेवा. थोड्या वेळाने पेस्ट म्हणून चेहऱ्यावर लावा. उन्हाळ्यात कोरफड बारीक करून फ्रीजमध्ये ठेवा. याचा तुम्हाला अनेकदा उपयोग होऊ शकतो.
नसांमध्ये साचलेलं घातक कोलेस्ट्रॉल कमी करतात ५ पदार्थ; गंभीर आजारदूर ठेवण्यासाठी आजपासूनच खा
आईस क्यूब
सनबर्नपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी बर्फाचे पॅक लावा. यासाठी कपडामध्ये बर्फाचा क्यूब ठेवा आणि त्याने चेहरा कंप्रेस करा. केवळ चेहराच नाही तर उन्हामुळे प्रभावित झालेल्या इतर ठिकाणीही तुम्ही ही युक्ती वापरून पाहू शकता. एका भांड्यात पाणी आणि बर्फाचे तुकडे मिसळा. पाण्यात थोडा बर्फ वितळू द्या आणि आता त्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे काही मिनिटांत तुमची समस्या दूर होईल.
जास्तीत जास्त पाणी प्या
कडक उन्हात हायड्रेशनच्या कमतरतेमुळे त्वचेवर जास्त परिणाम होतो, त्यामुळे उन्हाळ्यात द्रवपदार्थ आणि पाणी मुबलक प्रमाणात प्यावे. यामध्ये तुमच्या त्वचेशी संबंधित निम्मे आजार दूर करण्याची क्षमता आहे. उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी जितके जास्त पाणी प्याल तितकी त्वचा अधिक ग्लोइंग राहील.
शरीर मेटेंन पण पोटच जास्त सुटलंय? Belly Fat घटवण्यासाठी फक्त ४ पदार्थ खा, अन् नेहमी मेटेंन राहा
काकडीचा रस
काकडीचा रसही लावल्यास उन्हापासून आराम मिळतो. सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून सोलून घ्या. त्याचे लहान तुकडे करा आणि नंतर बारीक करा. आता त्याची पेस्ट फ्रीजमध्ये 20 मिनिटे ठेवा आणि नंतर उन्हामुळे काळपट झालेल्या भागावर लावा. यामुळे तुम्हालाही मस्त वाटेल. उन्हामुळे त्वचेवर जास्त जळजळ होत असेल तर काकडीचा रस लावणे टाळा.