वाढत्या उन्हाचा परिणाम सगळ्यात आधी आपल्या त्वचेवर होऊ लागतो. सतत घाम येणे आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाने आपली चिडचिड होणं हे काही नवीन नाही.(Summer Skin Care Tips) उन्हाळ्या घामामुळे आपल्याला खाज येणे, घामाचा वास, रॅशेस, पुरळ येणे अशा अनेक समस्या येतात. (How to Treat Pimples Naturally in Summer)
जर आपली त्वचा अतिसंवेदनशील असेल तर आपल्याला याचा त्रास अधिक होतो. त्वचेचवर लाल चट्टे येणे, त्वचा टॅन होणे यांसारख्या तक्रारी अधिक वाढतात. (Effective Remedies for Summer Skin Itching) त्वचा लाल होणे याचे कारण सनबर्न किंवा ॲलर्जीचे कारण असू शकते. अनेकांना उन्हाळ्यात त्वचेवर जळजळ होते. घाम साचल्यामुळे आपल्याला घामोळ्यांना सामोरे जावे लागते. घाम आल्यानंतर आपण पाण्याने स्वच्छ केल्यास घाम निघून जाण्यास मदत होते. (Natural Solutions for Skin Irritation in Summer) त्यासाठी उन्हाळ्यात आपल्याला त्वचेची काळजी घ्यायला हवी. त्वचेवर रॅश किंवा फंगल इनफेक्शनची समस्या देखील वाढते. जर आपणही काही सोपे घरगुती उपाय केले तर हा त्रास कमी होण्यास मदत होईल.
कमी वयातच त्वचा लूज पडली?; त्वचा घट्ट करण्यासाठी ५ प्रभावी उपाय, दिसाल अधिक तरुण
1. गुलाब पाणी
उन्हाळ्यात त्वचेवर गुलाबपाणी लावून त्वचेवरील लालसरपणा कमी करु शकता. गुलाबपाणी त्वचेला थंडावा देण्यासोबतच त्वचेला झालेले नुकसान भरुन काढण्यास मदत करते. त्वचेचा लालसरपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस गुलाब पाण्यात मिसळा आणि चेहऱ्यावर १० मिनिटे ठेवा. यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
2. कोरफड जेल
कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. यात असणारे दाहक-विरोधी आणि उपचारात्मक गुणधर्म त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. त्वचा लालसर होणे आणि पुरळांची समस्या दूर करण्यास मदत करते. यासाठी कोरफड जेल अर्धातास चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा उपाय दिवसातून दोन वेळा केल्याने आराम मिळेल.
3. बर्फ
उन्हामुळे आपली त्वचा लाल पडते. यासाठी बर्फ फायदेशीर ठरु शकतो. एका सुती कापडात बर्फ गुंडाळा आणि त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्यावर होणारी जळजळ आणि खाज कमी होईल. तसेच बर्फाच्या पाण्याने चेहरा धुवू शकता.
4. सनस्क्रीन लावा
उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन उन्हाच्या अतिनिल किरणांपासून आपले संरक्षण करते. तसेच त्वचेच्या लालसरपणापासून सुटका करते. यामुळे त्वचा टॅन होण्याची समस्या देखील दूर करता येते.
5. तेलकट आणि मसालेदार पदार्थ नको
अनेकांना चमचमीत आणि झणझणीत पदार्थ खाण्यास आवडतात. परंतु, याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. हे पदार्थ खाल्ल्याने आपल्या त्वचेची जळजळ, खाज सुटणे किंवा लालसरपणा येणे यासारख्या समस्या उद्भवतात. तसेच शरीराला हायड्रेट करण्यासाठी ८ ग्लास किमान पाणी प्या. ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल.