उन्हाळ्यात त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कारण नाजूक त्वचेला उन्हाची तिव्रता सहन होत नाही. त्यामुळे अनेकांना सनबर्नसारखा त्रासही होतो. त्वचा जळजळणे, खाज येणे, पुरळ येणे असे त्रासही अनेकांना होतात. शिवाय उन्हामुळे त्वचा टॅन झाली म्हणजेच काळवंडली ही देखील बहुसंख्य लोकांची समस्या असते (Summer special skin care tips). उन्हामुळे तुम्हालाही टॅनिंग झालं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. बेसन म्हणजेच हरबरा डाळीचं पीठ त्वचेसाठी जसं फायदेशीर ठरतं (how to get soft glowing skin in just 10 minutes), तसंच मसूर डाळीचा हा फेसपॅकही त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी नक्कीच मदत करेल. (Home made masoor dal face pack for tanned skin)
टॅनिंग कमी करण्यासाठी मसूर डाळीचा फेसपॅक
टॅनिंग कमी करून काही मिनिटांतच त्वचेवर छान चमक कशी आणायची, त्वचा स्वच्छ कशी करायची, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ indianbeautysecrets या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
उन्हाळ्यासाठी हा खास स्किन ब्राईटनिंग फेसपॅक तयार करण्यासाठी ४ टेबलस्पून मसूर डाळ घ्या. दोन ते तीन वेळा ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
‘ही’ नाजूक मिठाई तुम्ही कधी खाल्ली आहे का? पाहा रेसिपीचा व्हिडिओ, नजाकत इतकी की..
यानंतर त्यामध्ये डाळ बुडेल एवढं कच्च दूध टाका आणि रात्रभर ती झाकून ठेवा.
दुसऱ्यादिवशी सकाळी दुधात भिजवलेली मसूर डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका. त्यातच पपईच्या ३ ते ४ फोडी टाका आणि या मिश्रणाची बारीक पेस्ट करून घ्या.
त्यानंतर ती पेस्ट एका भांड्यात काढा आणि त्यामध्ये १ टेबलस्पून तांदळाचं पीठ, १ टेबलस्पून मध घाला. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की तुमचा स्किन ब्राईटनिंग फेसपॅक झाला तयार.
अस्सल हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा? फसवणूक टाळण्यासाठी ४ गोष्टी तपासा
हा फेसपॅक चेहऱ्याला, मानेला, गळ्याला किंवा टॅनिंग झालेल्या भागाला लावा आणि १०- १५ मिनिटांनी धुवून टाका.
यानंतर चेहऱ्याला मॉईश्चराईज करा. टॅनिंग निघून गेल्यामुळे त्वचा उजळ, चमकदार वाटेल. तसेच त्वचेला छान मऊपणा मिळेल.