Lokmat Sakhi >Beauty > आला जवळ पावसाळा, चेहरा आणि केसांसाठी खास डेली रुटीन, आताच बदला 7 गोष्टी

आला जवळ पावसाळा, चेहरा आणि केसांसाठी खास डेली रुटीन, आताच बदला 7 गोष्टी

Beauty Tips: उन्हाळा आता अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे.. त्यामुळेच तर आता त्यानुसार आपले स्किन केअर रुटीनही (skin care) बदलायला हवेच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 09:11 PM2022-06-01T21:11:13+5:302022-06-01T21:11:46+5:30

Beauty Tips: उन्हाळा आता अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे.. त्यामुळेच तर आता त्यानुसार आपले स्किन केअर रुटीनही (skin care) बदलायला हवेच..

Summer to Monsoon.. The season is changing ... accordingly the skin care routine should be changed now ... special tips for that | आला जवळ पावसाळा, चेहरा आणि केसांसाठी खास डेली रुटीन, आताच बदला 7 गोष्टी

आला जवळ पावसाळा, चेहरा आणि केसांसाठी खास डेली रुटीन, आताच बदला 7 गोष्टी

Highlights ऋतू बदलतोय.. म्हणूनच तर आता केसांची आणि त्वचेची काळजी घेण्याची पद्धतही बदलायला हवी...

मान्सून इथपर्यंत आला... मान्सून आता लवकरच धडकणार अशा वार्ता कानावर यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता घरोघरी उन्हाळी कामं संपवण्याची लगबग सुरु झाली असून पावसाळ्यात लागणाऱ्या गोष्टींची खरेदी होत आहे. पावसाळ्यासाठी छत्री, रेनकोट, पावसाळी चपला, वॉटरप्रुफ पर्स अशा सगळ्या वस्तू घेऊन जय्यत तयारी केली जाते. त्याचप्रमाणे आता थोडी खरेदी आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी करणं गरजेचं आहे. ऋतू बदलतोय.. म्हणूनच तर आता केसांची आणि त्वचेची काळजी घेण्याची पद्धतही बदलायला हवी...

 

स्किन केअर रुटीनमध्ये करा ४ बदल
१. मान्सूनसाठी जे मॉईश्चरायझर वापराल ते लाईट टोनचं हवं आणि अगदी पातळ असावं.
२. पावसाळा आला की सनस्क्रिन वापरणं सोडू नका. ते तर लावायचंच आहे, पण त्यात थोडा बदल करा. पावसाळ्यात हवेतला दमटपणा वाढलेला असतो. त्यामुळे जे सनस्क्रिन वापराल ते वॉटरप्रुफ आणि जेल बेस असावं.
३. सनस्क्रिनप्रमाणेच लिपस्टिक, काजळ, मस्कारा, आय लायनर हे सगळेच प्रोडक्ट वॉटरप्रुफ निवडा. 
४. पावसाळी हवा दमट असते. त्यामुळे या काळात स्किन इन्फेक्शन होऊ नये, त्वचा कोरडी रहावी, यासाठी चेहऱ्यावर साध्या पावडर ऐवजी blotting sheets वापरा. अंडरआर्म्स, गळा, मान या भागासाठी तुम्ही पावडर वापरू शकता. 

 

पावसाळ्यात असं असावं हेअर केअर रुटीन (hair care routine in monsoon)
- पावसाळ्यात दमट हवेमुळे केस खूप चिकट होतात. त्यामुळे पावसाळ्यात केस धुतल्यानंतर त्यावर ॲण्टी फ्रिज सिरम लावा. 
- पावसाळ्यात वारंवार पावसात भिजलात तर केसांचा रंग लवकर निघून जातो किंवा डल पडतो. त्यामुळे या दिवसांत आवर्जून हेअर कलर प्रोटेक्शन शाम्पू वापरायला हवा.
- पावसात केस सारखे सारखे ओले झाले तर त्यात केसांचं नुकसान आहे. त्यामुळे पावसात जाण्याची वेळ आलीच तर छत्री, रुमाल, रेनकोट घालायला विसरू नका. जेणेकरून केसांना सुरक्षा मिळेल.  


 

Web Title: Summer to Monsoon.. The season is changing ... accordingly the skin care routine should be changed now ... special tips for that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.