Join us  

आंघोळीच्या पाण्यात 'ही' पावडर मिसळा; संपूर्ण शरीराचं टॅनिंग निघेल; नितळ- सॉफ्ट त्वचेचं सिक्रेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 12:58 PM

Sun Tan Removal Tips : त्वचा टॅन होऊ नये यासाठी काही सोप्या टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. आंघोळीच्या पाण्यात एक होममेड पावडर मिसळली तर तुमचं हे काम अधिकच सोपं होऊ शकतं. 

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा टॅन होणं खूपच कॉमन आहे.  सुर्याच्या अतिनिल किरणांमुळे त्वचेचं नुकसान होऊन त्वचा खूपच काळपट दिसते. काहीजणांना फक्त चेहरा आणि मानेच टॅन होते तर काहीचं पूर्ण शरीर काळपट होतं. सनबर्न निघून जाण्यासाठी २ ते ३ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. ब्लिच, फेशियल केल्यानंतरही टॅनिंग पूर्णपणे निघत नाही. (Sun Tan Removal Tips) डीटॅन पॅक लावल्यास त्याचा प्रभाव तात्पुरता असतो. त्वचा टॅन होऊ नये यासाठी काही सोप्या टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. आंघोळीच्यापाण्यात एक होममेड पावडर मिसळली तर तुमचं हे काम अधिकच सोपं होऊ शकतं. (How To Remove Tan Using Simple Home Remedies)

घरगुती स्किन ब्राईटनिंग पावडर तयार करण्यासाठी सगळ्यात आधी संत्र्याची सालं सुकवून घ्या ही सुकलेली सालं मिक्सरच्या भांड्यात घाला, त्यात ओट्स, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, मूठभर बदाम घाला. अंघोळ करताना २ ते ३ चमचे पेस्टमध्ये पाणी मिसळून ही पेस्ट चेहरा आणि संपूर्ण अंगाला लावा ५ ते ७ मिनिटांनी स्वच्छ पाण्यानं आंघोळ करा. यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होईल आणि टॅनिंगही निघून जाईल.

केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? १ चमचा मेथीचा हेअर स्प्रे वापरा; भराभर वाढ होईल 

संत्र्याच्या सालीपासून त्वचेला अनेक फायदे मिळतात. संत्र्याची साले वाळवून आणि बारीक करून पावडर बनवू शकता. या पावडरमध्ये मध घालून फेस मास्क बनवा. 15 मिनिटे चेहरा धुतल्यानंतर तुमची त्वचा चमकदार दिसेल. याशिवाय संत्र्याची साल ब्लॅकहेड्स, काळे डाग आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी देखील प्रभावी आहे. संत्र्याच्या सालीची पावडर दुधात मिसळूनही फेस पॅक बनवता येतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्सत्वचेची काळजी