Join us  

सनस्क्रिन लावल्याने पिंपल्स येतात? चेहऱ्यावर घाम आल्यासारखा वाटतो? त्याची 6 कारणं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 6:34 PM

तीव्र सुर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण करायचं असेल, टॅनिंग होऊ द्यायचं नसेल तर सनस्क्रिन लावणं अत्यंत आवश्यक आहे, हे आपण सगळेच ...

ठळक मुद्देसनस्क्रिन लोशन खरेदी करताना आपल्या त्वचेचा प्रकार कसा आहे आणि त्यानुसार आपल्याला कोणतं सनस्क्रिन चालू शकेल, हे तपासून घ्यायला हवं.

तीव्र सुर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण करायचं असेल, टॅनिंग होऊ द्यायचं नसेल तर सनस्क्रिन लावणं अत्यंत आवश्यक आहे, हे आपण सगळेच जाणतो. उन्हाळ्यातच नाही तर अगदी हिवाळ्यात आणि पावसाळ्यातही सनस्क्रिन लावणं गरजेचं असतं. पण काही जणींना मात्र सनस्क्रिन लोशन लावलं की चेहऱ्यावर पिंपल्स येतात (pimples due to sunscreen). किंवा चेहऱ्यावर खूप घाम येऊन चेहरा ओलसर झाल्यासारखा जाणवतो. वारंवार हा त्रास होत असेल तर साहजिकच सनस्क्रिन (feeling sewaty after applying sunscreen?) लावणं मग जिवावर येतं. म्हणूनच असा त्रास होऊ नये म्हणून काही गोष्टींची खबरदारी घ्या, सनस्क्रिन लावणं सोडू नका. (how to choose perfect sunscreen)

 

सनस्क्रिन त्वचेला सूट व्हावं म्हणून...१. बाजारात सनस्क्रिनचे अनेक प्रकार मिळतात. त्यामुळेच सनस्क्रिन लोशन खरेदी करताना आपल्या त्वचेचा प्रकार कसा आहे आणि त्यानुसार आपल्याला कोणतं सनस्क्रिन चालू शकेल, हे तपासून घ्यायला हवं. त्यात कोणकोणते घटक आहेत, हे तपासून बघायला हवं. ज्या सनस्क्रिनमध्ये अव्होबेंझॉन, ऑक्सीबेन्झोन, ऑक्टिसलेट, ऑक्टोक्रायलीन, होमोसॅलेट आणि ऑक्टिनॉक्सेट असे घटक असतील, ते सनस्क्रिन घेणं टाळा. २.ज्या सनस्क्रिन लोशनमध्ये झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम डायऑक्साइड आहे, असं सनस्क्रिन लोशन खरेदी करा.

 

३. केमिकल आणि फिजिकल असे सनस्क्रिन लोशनचे प्रकार आहेत. जर तुम्हाला सनस्क्रिन लावल्याने पिंपल्स येत असतील तर तुम्ही फिजिकल सनस्क्रिन लावण्यास प्राधान्य द्यावे.४. जर तुम्ही सनस्क्रिनची बॉटल गाडीच्या डिक्कीमध्ये, कारमध्ये किंवा पर्समध्ये टाकून उन्हात घेऊन जात असाल, तर उष्णतेमुळे सनस्क्रिनमधील घटकांची आपापसात रिॲक्शन होते आणि मग ते त्वचेसाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे सनस्क्रिन लोशनची बाटली कधीही तिव्र उन्हात घेऊन जाऊ नका. 

५. ज्या सनस्क्रिन लोशनमध्ये सूर्यफूल, जोजोबा, सी बकथॉर्न, रोझशीप सीड आणि द्राक्षाचे तेल असेल असे सनस्क्रिन घेण्यास प्राधान्य द्या.६. वॉटर बेस सनस्क्रिनमध्ये पॅरा- एमिनोबेन्झोइक ऍसिड (PABA) आणि मेथॉक्सिसिनामेट असे घटक आढळतात. संवेदनशील त्वचेसाठी हे घटक त्रासदायक ठरतात.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी