Lokmat Sakhi >Beauty > सनस्क्रीन लोशन तर लावताय, पण वाईट परिणाम झाला तर? सनस्क्रीन लोशन लावण्याचे 10 नियम

सनस्क्रीन लोशन तर लावताय, पण वाईट परिणाम झाला तर? सनस्क्रीन लोशन लावण्याचे 10 नियम

सनस्क्रीन लोशन त्वचेसाठी गरजेचं.. पण ते लावताना नियम माहिती असणं गरजेचं. सनस्क्रीन लोशन लावताना चुकल्यास त्वचेसाठी त्याचे परिणाम आणि फायदे शून्यच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 05:55 PM2022-03-23T17:55:43+5:302022-03-23T18:01:34+5:30

सनस्क्रीन लोशन त्वचेसाठी गरजेचं.. पण ते लावताना नियम माहिती असणं गरजेचं. सनस्क्रीन लोशन लावताना चुकल्यास त्वचेसाठी त्याचे परिणाम आणि फायदे शून्यच!

Sunscreen lotion is applied, but what if it has a bad effect? 10 rules for applying sunscreen lotion | सनस्क्रीन लोशन तर लावताय, पण वाईट परिणाम झाला तर? सनस्क्रीन लोशन लावण्याचे 10 नियम

सनस्क्रीन लोशन तर लावताय, पण वाईट परिणाम झाला तर? सनस्क्रीन लोशन लावण्याचे 10 नियम

Highlightsसनस्क्रीन लोशन लावण्याआधी चेहऱ्यास माॅश्चरायझर लावणं गरजेचं. सनस्क्रीन लोशन चेहऱ्यावर रगडून लावणं ही चुकीची पध्दत आहे. घरात असतानाही चेहऱ्यास सनस्क्रीन लोशन लावणं आवश्यकच !

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेताना त्वचेला सनस्क्रीन लोशन लावणं महत्वाचं. चेहऱ्याला सनस्क्रीन लोशन लावण्यामागे शास्त्रीय कारण आहे.  ज्यावेळी आपण सूर्याच्या अति नील किरणांच्या संपर्कात येतो  त्यावेळेला त्वचा खराब होते, काळवंडते, त्वचेला कोरडेपणा येतो. मुरुम, पुटकुळ्या होतात, त्वचेवर तेलाची अतिरिक्त तेल निर्मिती होवून त्वचा खराब होते. सनस्क्रीन लावल्यानं उन्हाच्या तीव्र झळांतही चेहऱ्याची त्वचा सुरक्षित राहाते. सूर्याचे अति नील किरणांचा धोका हा फक्त उन्हाळ्यातच असतो असं नाही तर एरवीही असतो. फक्त उन्हाळ्यात या धोक्याची तीव्रता वाढते इतकंच. त्यामुळे सौंदर्यतज्ज्ञ सनस्क्रीनला नित्यनेमाच्या सौंदर्योपचाराचा महत्वाचा भाग मानतात. 

Image: Google

त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लोशन महत्वाचं हे खरंच. पण सनस्क्रीन लोशन लावण्याचीही विशेष पध्दत आहे, सनस्क्रीन लोशन चेहऱ्यास लावण्याचे काही नियम आहेत. ते पाळले नाहीत तर सनस्क्रीन लावूनही चेहऱ्यावर काहीच परिणाम होत नाही. चुकीच्या पध्दतीनं सनस्क्रीन लावल्यानं चेहरा खराब होण्याचाच धोका असतो. जी बाब आपल्या त्वचेसाठी, त्वचेच्या काळजीसाठी अत्यावश्यक आहे ती वापरताना काय काळजी घेणं हे समजून घेणं म्हणूनच महत्वाचं.

Image: Google

सनस्क्रीन लावण्याचे नियम 

1. सनस्क्रीन लावताना चेहरा धुतलेला असणं आवश्यक. चेहरा सौम्य क्लीन्जरनं स्वच्छ धुवावा. मऊ रुमालानं चेहरा टिपून घ्यावा. 

2. चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर लगेच माॅश्चरायझर लावणं महत्वाचं. चेहरा ओलसर ठेवण्यासाठी माॅश्चरायझर लावावं. उन्हाळ्यात कशाला हवं माॅश्चरायझर? माॅश्चरायझरनं चेहरा खराब होईल, तेलकट होईल अशी शंका अनेकांच्या मनात असते. ही शंका चुकीची आहे. उन्हाळा असो की पावसाळा माॅश्चरायझर लावणं त्वचेची गरज असते. माॅश्चरायझर बोटावर घेऊन दोन्ही हाताची बोटं एकमेकांवर हलकी घासून माॅश्चरायझर नाकापासून गालापर्यंत पसरुन हळूवार लावावं. माॅश्चराझर लावताना ते चेहऱ्यास रगडून लावू नये. रगडल्यास माॅश्चरायझर चेहऱ्याला न लागता हाताला लागून खराब होतं. 

3. माॅश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लोशन लावायचं असतं. पण माॅश्चरायझरनंतर लगेचच सनस्क्रीन लावू नये. अर्धा मिनिटं थांबून मग सनस्क्रीन लोशन लावावं. सौंदर्योत्पादनं चेहऱ्यास लावताना ते एकामागोमाग एक लावू नये. यामुळे ती त्वचेत नीट शोषली जात नाही. माॅश्चरायझर लावल्यानंतर अर्ध्या मिनिटानंतर ते त्वचेत शोषलं जातं. त्यानंतर सनस्क्रीन लोशन लावणं योग्य. 

Image: Google

4. सनस्क्रीन लोशन लावताना आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे ते निवडावं. जर त्वचेच्या प्रकाराप्रमाणे ते निवडायचं नसेल तर किमान आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक घटकांचा उपयोग केलेलं सनस्क्रीन लोशन वापरावं. याप्रकारच्या सनस्क्रीन लोशन त्वचेस हानी न होता फायदाच होतो. 

5. माॅश्चराझर त्वचेत शोषलं गेल्यानंतर हातावर सनस्क्रीन लोशन घ्यावं. सनस्क्रीन लोशन थेट चेहऱ्यावर लावून रगडू नये. ते आधी हातावर चोळून घ्यावं आणि मग चेहऱ्यावर हळुवार लावावं. ते हळुवार लावल्यानं त्वचेत लगेच शोषलं जातं. पण सनस्क्रीन जर चेहऱ्यावर मसाज करत लावल्यास ते हातावरच खराब होतं. अशा पध्दतीनं सनस्क्रीन लावण्याचा काहीच फायदा होत नाही. 

6. सनस्क्रीन लोशन हळूवार पध्दतीनं चेहऱ्यास लावल्यानंतर हातानं चेहरा ह्ळूवार थोपावा. यामुळे सनस्क्रीन त्वचेत शोषलं जाण्यास मदत होते. 

7. सनस्क्रीन लोशन दिवसातून किमान 3 वेळा लावावं. सकाळी उठल्यानंतर , दुपारी आणि नंतर आपल्याला जेव्हा आवश्यक असेल तेव्हा लावावं.

Image: Google

8. सनस्क्रीन लोशन लावल्यानंतर किमान 15 मिनिटांनी घराबाहेर पडावं. सनस्क्रीन लावून लगेच घराबाहेर पडल्यास त्वचा तेलकट होते. 

9. चेहऱ्यास सनस्क्रीन लावल्यानंतर  बाहेर पडताना चेहरा सुरक्षित राहाण्यासाठी चेहऱ्याभोवती रुमाल/ स्कार्फ गुंडाळावा.

10. बाहेर पडायचं नसलं तरी घरात असतानाही सनस्क्रीन लोशन लावणं आवश्यक असतं. कारण घरातल्या लाइटचाही परिणाम चेहऱ्यावर होवून त्वचा खराब होते. ते होवू नये यासाठी घरात असलं तरी चेहऱ्याला किमान तीन वेळा सनस्क्रीन लोशन लावणं आवश्यक  असतं. 
 


 

Web Title: Sunscreen lotion is applied, but what if it has a bad effect? 10 rules for applying sunscreen lotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.