वाढलेल्या स्क्रीन टायमिंगमुळे सध्या डोळ्यांना चष्मा (Eye Care Tips) लागण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शिवाय डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांमुळे सौंदर्यात बाधा निर्माण होते, ते वेगळंच. आजकाल प्रत्येक जण डोळ्यांखालील काळ्या वर्तुळामुळे त्रस्त आहे. डार्क सर्कल लपवण्यासाठी बरेच जण मेकअपचा आधार घेतात. शिवाय डार्क सर्कल घालवण्यासाठी विविध सौंदर्य उत्पादनांची मदत घेतात. पण त्यात केमिकल रसायनांचा वापर होतो, ज्यामुळे डोळ्यांना इजा पोहचण्याची दाट शक्यता असते (Potato for Dark Circle).
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी व्हावी असे वाटत असेल तर, आपण बटाट्याचा वापर करून पाहू शकता (Beauty Tips). बटाटा हा एक नैसर्गिक ‘ब्लीचिंग एजंट’म्हणून काम करते. बटाट्याचा वापर फक्त भाजी करण्यासाठी न करता, आपण याचा वापर काळी वर्तुळे घालवण्यासाठीही करू शकता(Surprising Results of Potatoes for Dark Circles).
डार्क सर्कल घालवण्यासाठी बटाट्याचा वापर कसा करावा?
लागणारं साहित्य
४ भेंड्या चिरा-पाण्यात उकळवा- केस गळतीवर घ्या स्वस्तात सोपा उपाय- केस चमकतील
बेसन
हळद
अशा पद्धतीने तयार करा मास्क
- सर्वप्रथम, बटाट्याचे साल काढून, त्याचे सुरीने मोठे तुकडे करा. बटाट्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका कापडात काढून घ्या, व पिळून त्यातील रस एका बाऊलमध्ये काढून घ्या. बटाट्याच्या रसामध्ये २ चमचे बेसन आणि एक चमचा हळद घालून मिक्स करा. अशा प्रकारे बटाट्याचा वापर करून डार्क सर्कल घालवणारा मास्क तयार.
बटाट्याचा मास्क लावण्याची योग्य पद्धत
हिवाळ्यात स्किन ड्राय-टॅन झाली? २ चमचे हळदीचा सुपरडुपर उपाय; १० मिनिटात चेहरा फ्रेश
- मास्क लावण्यासाठी आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. नंतर बटाट्याची पेस्ट डोळ्यांखाली लावा. २० मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून ३ वेळा करू शकता. यामुळे काही दिवसात डार्क सर्कल कमी होतील. आपण या पेस्टचा वापर मानेवरील काळपट डाग आणि चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग घालवण्यासाठीही करू शकता.
चेहऱ्यावर बटाटा कसे काम करते?
बटाट्यामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असते. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. शिवाय बटाट्यामध्ये ‘क’ जीवनसत्व असते. ज्यामुळे स्किनमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारते. यासह त्यात नियासिन हे पोषणतत्व देखील असते. ज्यामुळे मुरुमांचे डाग गायब होतात.