Lokmat Sakhi >Beauty > उन्हाळ्यात घामाने पायांना येतो घाणेरडा वास; 4 उपाय- दुर्गंधी टाळा

उन्हाळ्यात घामाने पायांना येतो घाणेरडा वास; 4 उपाय- दुर्गंधी टाळा

कितीही स्वच्छ आंघोळ केली तरी उन्हाळ्यात पायांना येणारी असह्य दुर्गंधी न्यूनगंड निर्माण करण्यासही कारणीभूत ठरते.  पण यावरचे उपाय अगदी सहज करता येतील इतके सोपे आहेत.  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 02:31 PM2022-03-05T14:31:40+5:302022-03-05T14:40:07+5:30

कितीही स्वच्छ आंघोळ केली तरी उन्हाळ्यात पायांना येणारी असह्य दुर्गंधी न्यूनगंड निर्माण करण्यासही कारणीभूत ठरते.  पण यावरचे उपाय अगदी सहज करता येतील इतके सोपे आहेत.  

Sweaty odor on feet in summer; 4 Remedy- Avoid bad smell | उन्हाळ्यात घामाने पायांना येतो घाणेरडा वास; 4 उपाय- दुर्गंधी टाळा

उन्हाळ्यात घामाने पायांना येतो घाणेरडा वास; 4 उपाय- दुर्गंधी टाळा

Highlightsपायाची घामाची दुर्गंधी जाण्यासाठी मीठाचं पाणी हा प्रभावी उपाय मानला जातो.गुलाबपाण्याच्या वापरानंही पायांना येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते.पायाला येणाऱ्या दुर्गंधावर बेकिंग सोड्याचा उते.पाय प्रभावी ठरतो. 

उन्हाळा सुरु झाला, की घाम येण्याचं प्रमाण वाढतं. ज्यांना मुळातच घामाची समस्या आहे त्यांच्याबाबतीत तर ही समस्या आणखीनच तीव्र बनते. केसात, काखेत घाम येतो. हात घामाने ओले होतात. पायांना सतत घाम येतो. घामामुळे पायांना येणारी दुर्गंधी अस्वस्थ करणारी असते. शरीराला इतर ठिकाणी आलेला घाम रुमालानं पुसता येतो. मात्र पायांना येणारा घाम पुसता येत नाही. त्यात पायात मोजे. चपला. शूज असतात. ते काढले की पाय मोकळे होतात पण पायांना दुर्गंधी येते. पायाच्या दुर्ग्ंधीने आपण स्वत: तर अस्वस्थ होतोच सोबतच इतरांची आपल्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. ही बाब तर आणखीनच शरम आणते. कितीही स्वच्छ आंघोळ केली तरी उन्हाळ्यात पायांना येणारी असह्य दुर्गंधी न्यूनगंड निर्माण करण्यासही कारणीभूत ठरते. हे सर्व  टाळण्यासाठी पायांना घामाची दुर्गंधी येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. यासाठीचे उपाय अगदी सोपे आहेत.

Image: Google

पायांना का येतो दुर्गंध?

उन्हाळ्यामुळे पायांना जास्त घाम येतो. घामामुळे पाय सतत ओलसर राहतात. जर पायात सतत मोज/ बूट/ चप्पल असेल  तर पायासोबतच घामाने तेही ओलसर राहातात. पायातील बूट/ सॅण्डल्स जास्तच घट्ट असतील तर हवा येण्या जाण्याला जागाच राहात नाही. घामाच्या या ओलसरपणामुळे , तसेच पायावर वाढणाऱ्या जिवाणुंमुळे पायांना घाणेरडा वास येतो. केवळ आंघोळीच्या वेळेस पाय धुतले म्हणजे पाय स्वच्छ होतात, घामाची दुर्गंधी दिवसभर येत नाही असं नाही त्यासाठी खास उपाय मुद्दाम करावे लागतात. 

Image: Google

1. पायाची घामाची दुर्गंधी जाण्यासाठी मीठाचं पाणी हा प्रभावी उपाय मानला जतो. त्यासाठी एका टबात कोमट पाणी घ्यावं. पाण्यात 2 चमचे मीठ टाकावं. पाण्यात मीठ घातल्यानंतर दोन मिनिटांनी  टबातल्या पाण्यात पाय बुडवून बसावं. साधारणत: 15 मिनिटं पाय मिठाच्या पाण्यात ठेवावेत. आठवड्यातून किमान दोन वेळा हा मिठाच्या पाण्याचा उपाय केल्यास पायावर घामाने वाढणारे जिवाणुंचा नायनाट होतो आणि पायांना दुर्गंधी येत नाही. 

Image: Google

2. गुलाबपाण्याच्या वापरानंही पायांना येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते. यासाठी पाय आधी साबणानं किंवा बाॅडी वाॅशनं स्वच्छ धुवावेत. पाय रुमालानं हलकेसे टिपून घ्यावेत. पायावर गुलाबपाणी शिंपडावं. गुलाबपाणी शिंपडल्यानंतर 10 मिनिटांनी पायांना माॅश्चरायझर लावावं.

Image: Google

3. पायाला दुर्गंध केवळ घामाने येतो असं नाही. तर पायांना कसला संसर्ग झाल्यास किंवा जिवाणुंच्या वाढीमुळेही दुर्गंध येतो. यावर बेकिंग सोड्याचा उपाय फायदेशीर ठरतो. यासाठी टबामधे कोमट पाणी घ्यावं. त्यात 1 ते 2 चमचे बेकिंग सोडा घालावा.  या पाण्यात 10-15 मिनिटं पाय बुडवून बसावं. या उपायाने पायाला झालेला संसर्ग, जिवाणु वाढीची समस्या दूर होते आणि पायांना दुर्गंध येत नाही. 

4. पाण्यानं किंवा घामानं ओलसर झालेले मोजे परत घालणं, मोजे किंवा बूट अस्वच्छ असणं यामुळे पायांना दुर्गंधी येते. हे टाळल्यास पायांना संसर्ग होत नाही, जिवाणुंची वाढ होत नाही. कोरडे आणि स्वच्छ मोजे, चपला , बूट यामुळे पायही कोरडे राहातात.
 

Web Title: Sweaty odor on feet in summer; 4 Remedy- Avoid bad smell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.