Join us  

तमन्ना भाटियाच्या सुंदर त्वचेचं सिक्रेट आहे 'हा' होममेड स्क्रब, डेडस्किन निघून त्वचा होईल मऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2024 11:45 AM

Home Made Scrub By Tamanna Bhatiya For Glowing Skin: दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिच्या साध्या- सोप्या ब्यूटी टिप्स चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. (beauty tips by Tamanna Bhatiya)

ठळक मुद्देहा होममेड पॅक वापरल्यामुळे डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. टॅनिंग कमी होतं आणि त्वचेवर छान चमक येते. त्यामुळे सध्या उन्हाळ्यात तर हा स्क्रब आवर्जून ट्राय करून पाहिलाच पाहिजे. 

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाची नितळ, स्वच्छ आणि मुलायम त्वचा तिच्या महिला चाहत्यांसाठी नेहमीच कौतूकाचा विषय असतो. या अभिनेत्री त्वचेची काळजी घेण्यासाठी नेमकं करतात काय, हा प्रश्न त्यांनाही बऱ्याचदा विचारला जातो. तमन्ना भाटियाने याच प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी ती नेमकं काय करते हे थेट प्रात्यक्षिकातून दाखवून दिलं आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून यामध्ये तिने तिच्या आवडीच्या एका होममेड स्क्रबविषयी माहिती दिली आहे (home made scrub by tamanna bhatiya for glowing skin). हा स्क्रब नियमितपणे लावल्यास डेडस्किन निघून जाते आणि त्वचेवरील चमक, त्वचेचा मऊपणा कायम राहण्यास मदत होते. (beauty tips by Tamanna Bhatiya)

 

तमन्ना भाटियाचा होममेड स्क्रब

डेड स्किन काढून टाकण्यासाठी तमन्ना कोणता होममेड स्क्रब वापरते याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ anupriyaa_srivastavaa and anlovedrama या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 

दोडक्याची भाजी आवडत नसेलही पण खाऊन पाहा दोडक्यांच्या सालींची चटणी, रेसिपी सोपी- चव चमचमीत

यामध्ये तमन्नाने चंदन, कॉफी आणि मध हे ३ पदार्थ प्रामुख्याने वापरले आहेत.

त्यासाठी सगळ्यात आधी तर एका वाटीमध्ये २ टीस्पून चंदन पावडर घ्या. त्यामध्ये १ टीस्पून कॉफी पावडर आणि १ टीस्पून मध घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या. हे मिश्रण खूप घट्ट झालं तर त्यात थोडं कच्चं दूध घाला.

 

यानंतर हा लेप तुमच्या चेहऱ्यावर लावा. आणि साधारणपणे १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर तसाच राहू द्या. लेप अर्धवट सुकला की हलक्या हाताने चोळून तो काढून टाका. 

बघा टॅनिंग घालविण्यासाठी कसा करायचा आंब्याचा उपयोग- उन्हामुळे रापलेला चेहरा चटकन उजळेल

नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या आणि चेहरा धुतल्यानंतर आठवणीने मॉईश्चराईज करा. 

हा होममेड पॅक वापरल्यामुळे डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. टॅनिंग कमी होतं आणि त्वचेवर छान चमक येते. त्यामुळे सध्या उन्हाळ्यात तर हा स्क्रब आवर्जून ट्राय करून पाहिलाच पाहिजे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीतमन्ना भाटिया