सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात आधी स्वतःचं चेहरा पाहतो (Tamannnah Bhatia). नंतर दिवसाची सुरुवात करतो. काहींचा सकाळी चेहरा सुजलेला दिसतो. तर काहींचा काळपट (Beauty Tips). सहसा आपण सकाळी उठल्यानंतर चेहरा धुतो, आणि काही ब्यूटी उत्पादनांचा वापर करतो (Skin Care Tips). पण सकाळी चेहरा धुण्याऐवजी आपण चेहऱ्यावर लाळेचा वापर करू शकता.
एका मुलाखतीत अभिनेत्री भाटीयाने देखील त्वचेवर लाळ लावण्याचे फायदे सांगितले. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना म्हणते, 'आपल्या चेहऱ्यासाठी लाळ अत्यंत फायदेशीर ठरते. लाळेचा वापर आपण चेहऱ्यावर औषध म्हणूनही करू शकता. यामुळे पुरळ, मुरुमांचे डाग, आणि जखमही बरी होण्यास मदत होते'(Tamannaah Bhatia applies ‘morning saliva’ to cure skin problems).
चेहऱ्यावर लाळ लावण्याचे फायदे
यासंदर्भात, आयुर्वेदाचार्य डॉ. सिद्धार्थ सिंह सांगतात, 'सकाळची शिळी लाळ त्वचेच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरते. मुरुमांचे डाग काही केल्या निघत नसेल तर, शिळी लाळ चेहऱ्यावर लावल्याने ही समस्या दूर होईल.'
वजन कमी करायचं? आहारातून तेल वगळावं की भात? नक्की काय खाणं बंद केल्यानं वजन घटतं?
लाळेबाबत तमन्ना पुढे म्हणते, 'रात्रभर आपले तोंड बंद असते. ज्यामुळे अनेक बॅक्टेरिया तयार होतात. हे बॅक्टेरिया तोंडातील लाळेमुळे नष्ट होतात. ज्यामुळे आपल्याला आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. आपण सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर लावू शकता.'
पोटाच्या समस्यांपासून आराम
बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट
पोटाच्या संबंधित समस्या सोडवण्यासाठी लाळ मदत करते. पोटदुखी, पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लाळ खूप उपयुक्त आहे. सकाळी उठल्याबरोबर रोज एक ग्लास पाणी प्यायल्याने लाळेमध्ये असलेले एंजाइम पोटात जातात आणि पचनाच्या समस्या दूर होतात.