Lokmat Sakhi >Beauty > Tanning Due To Swimming: स्विमिंग पूल उघडले, पण पोहायला जाऊन त्वचा काळी पडण्याची भीती वाटते? करा ५ उपाय, जा पोहायला बिंधास्त!

Tanning Due To Swimming: स्विमिंग पूल उघडले, पण पोहायला जाऊन त्वचा काळी पडण्याची भीती वाटते? करा ५ उपाय, जा पोहायला बिंधास्त!

Skin Care For Summer: टॅनिंग होतं, त्वचा काळी पडते, म्हणून स्विमिंग करायचं सोडू नका.. फक्त त्वचेची थोडीशी काळजी घ्या.. स्विमिंग करूनही त्वचा काळवंडणार नाही... (tanned skin due to swimming)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 04:41 PM2022-04-11T16:41:12+5:302022-04-11T16:51:23+5:30

Skin Care For Summer: टॅनिंग होतं, त्वचा काळी पडते, म्हणून स्विमिंग करायचं सोडू नका.. फक्त त्वचेची थोडीशी काळजी घ्या.. स्विमिंग करूनही त्वचा काळवंडणार नाही... (tanned skin due to swimming)

Tanning Due To Swimming: Are you worried about getting tanned skin after swimming? 5 simple remedies, go for a swim and enjoy summer | Tanning Due To Swimming: स्विमिंग पूल उघडले, पण पोहायला जाऊन त्वचा काळी पडण्याची भीती वाटते? करा ५ उपाय, जा पोहायला बिंधास्त!

Tanning Due To Swimming: स्विमिंग पूल उघडले, पण पोहायला जाऊन त्वचा काळी पडण्याची भीती वाटते? करा ५ उपाय, जा पोहायला बिंधास्त!

Highlightsआवडत असेल तर मनसोक्त स्विमिंग करा.. त्वचेची काळजी घेण्याची जबाबदारी या काही साध्या- सोप्या उपायांवर साेपवून द्या..

उन्हाळ्यात स्विमिंगसारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही... उन्हामुळे सगळे अंग भाजून निघत असताना  थंड- थंड, गार- गार पाण्यात पाेहणे म्हणजे निव्वळ सुख... कारण उन्हाळ्यात स्विमिंग (swimming in summer) सोडून दुसरा कोणताही व्यायाम करायचा म्हटलं की आधी घामाच्या धारा सुरू होतात.. घाम, गरमी आणि उष्णतेमुळे मग व्यायाम  करण्याचीही इच्छा राहत नाही.. म्हणूनच तर उन्हाळ्यात स्विमिंग हा सगळ्यात चांगला व्यायाम मानला जातो..(tanned skin due to swimming?)

 

पण स्विमिंग केल्यानंतर अनेक जणींना त्वचा काळी पडण्याची भीती वाटते. त्यामुळेच मग कितीही आवडत असले तरी त्यांना स्विमिंग करणे नकोसे वाटते.. त्वचा काळवंडेल, टॅनिंग होईल एवढ्या एका कारणासाठी उन्हाळ्यातल्या या छानशा आनंदापासून वंचित राहू नका.. आवडत असेल तर मनसोक्त स्विमिंग करा.. त्वचेची काळजी घेण्याची जबाबदारी या काही साध्या- सोप्या उपायांवर साेपवून द्या.. (home remedies for tanned skin due to swimming)

 

स्विमिंगमुळे त्वचा काळवंडू नये यासाठी उपाय...
१. स्विमिंग करण्याच्या २ ते ३ तास आधी सगळ्या अंगाला खोबरेल तेल चोळून लावा. यामुळे पाण्यात राहूनही त्वचा कोरडी पडणार नाही. स्विमिंग पुलच्या पाण्यात असलेले केमिकल्स कोरड्या त्वचेवर लवकर परिणाम करतात. यामुळे त्वचा टॅन होते. तेल लावल्याने त्वचेतील मॉईश्चर टिकून राहते आणि पुलमध्ये असणाऱ्या केमिकल्सचा त्वचेवर थेट परिणाम होत नाही.

 

२. स्विमिंगला प्रत्यक्ष सुरुवात करण्याच्या १० ते १५ मिनिटे आधी सगळ्या अंगाला सनस्क्रिन लोशन लावून घ्या. पाण्यातील केमिकल्स आणि अंगावर थेट येणारे सुर्यकिरण यामुळे त्वचा जास्त प्रमाणात काळवंडते.. त्यामुळे सुर्यकिरणांचा त्वचेवर थेट मारा होऊन त्वचेचे टॅनिंग टाळण्यासाठी सनस्किन अवश्य लावा.

३. स्विमिंग झाल्यावर व्यवस्थित, शांतपणे शॉवर घ्या.. शॉवर घेताना अंग चोळून काढा.. वेळ नाही म्हणून घाईघाईने शाॅवर घेणे किंवा मग शॉवरच न घेणे असं करू नका. शॉवर झाल्यानंतर अंग व्यवस्थित कोरडे करून मॉईश्चरायझर लावा. 


४. स्विमिंग करत असाल तर दर दोन दिवसांनी संपूर्ण शरीराचे घरच्याघरी स्क्रबिंग करा. स्क्रब करण्यासाठी हरबरा डाळीचे पीठ, हळद आणि दूध असे साहित्य वापरू लेप तयार करा. हा लेप अंगावर लावा आणि काही मिनिटांनी तो सुकत आल्यानंतर चोळून चोळून काढा.. यानंतर स्वच्छ अंग धुवा. अंग धुतल्यानंतर मॉईश्चरायझर लावायला विसरू नका. टॅनिंग निघून जाईल आणि त्वचा फ्रेश, टवटवीत दिसू लागेल. 

 

Web Title: Tanning Due To Swimming: Are you worried about getting tanned skin after swimming? 5 simple remedies, go for a swim and enjoy summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.