Lokmat Sakhi >Beauty > Tanning Due To Footwear: चप्पल बुटांमुळे पायांवर उमटलेले घट्टे कमी करण्यासाठी ५ घरगुती उपाय.. पायाची त्वचा होईल छान

Tanning Due To Footwear: चप्पल बुटांमुळे पायांवर उमटलेले घट्टे कमी करण्यासाठी ५ घरगुती उपाय.. पायाची त्वचा होईल छान

Skin Care: हा अनुभव आपण सगळ्यांनीच कधी ना कधी घेतलेला असतो. म्हणूनच पायांवर उमटलेले असे डाग काढून टाकण्यासाठी आणि पुन्हा पायांची त्वचा एकसारखी होण्यासाठी करून बघा हे काही उपाय..( home remedies)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 04:24 PM2022-04-28T16:24:45+5:302022-04-28T16:25:24+5:30

Skin Care: हा अनुभव आपण सगळ्यांनीच कधी ना कधी घेतलेला असतो. म्हणूनच पायांवर उमटलेले असे डाग काढून टाकण्यासाठी आणि पुन्हा पायांची त्वचा एकसारखी होण्यासाठी करून बघा हे काही उपाय..( home remedies)

Tanning due to tight footwear? 5 Home Remedies To Reduce The Scars On The Feet Due To Slippers | Tanning Due To Footwear: चप्पल बुटांमुळे पायांवर उमटलेले घट्टे कमी करण्यासाठी ५ घरगुती उपाय.. पायाची त्वचा होईल छान

Tanning Due To Footwear: चप्पल बुटांमुळे पायांवर उमटलेले घट्टे कमी करण्यासाठी ५ घरगुती उपाय.. पायाची त्वचा होईल छान

Highlightsपायांवर पडलेले वळ किंवा टॅनिंग काढून टाकण्यासाठी खालील घरगुती उपाय करून बघा. 

काही काही चपला पायाला अगदी फिट येत असतात. अर्थात आपलं चालणं आरामदायी असावं, म्हणून त्या तेवढ्या फिट असणं गरजेचंच असतं. अशा चपलांचा वापर आपण दिवसातले ७ ते ८ तास सलग करत असू तर त्यामुळे पायांवर टॅनिंग होतं. म्हणजेच चपलांचा बेल्ट ज्या ठिकाणी असतो तेवढा भाग गोरा आणि मग बाकीचा पाय काळा दिसू लागतो. म्हणूनच त्यावर काही घरगुती उपाय (home remedies for tanning) करा जेणेकरून चपलांचे वळ नाहीसे होतील आणि पायाची त्वचा एकसमान रंगाची दिसू लागेल. (how to remove tanning from feet?)

 

बुट घालत असू तर पायाची बोटं आणि त्यांच्या खालचा थोडा भाग पायाच्या इतर त्वचेपेक्षा थोडा अधिक उजळ दिसू लागते. कधी कधी तर काही जणांच्या पायांवरचं टॅनिंग इतकं गडद झालेलं असतं की त्यांच्या पायाच्या टॅनिंगवरून ते कशा पद्धतीची चप्पल, सॅण्डल घालत असावेत, याचा अचूक अंदाज समोरच्या व्यक्तीला येतो. अशा पद्धतीने पायावर वळ उमटले असतील तर ते कधीकधी चारचौघात खूपच वाईट दिसतं. एकच एक चप्पल किंवा बूट किंवा सॅण्डल वारंवार वापरण्यापेक्षा आज एक उद्या एक अशी वेगवेगळी फुटवेअर वापरली तर असे वळ पडणार नाहीत. पण अशा पद्धतीने चपलांचा वापर करणे शक्य नसेल तर पायांवर पडलेले वळ किंवा टॅनिंग काढून टाकण्यासाठी खालील घरगुती उपाय करून बघा. 

 

पायांचे टॅनिंग कमी करण्यासाठी
१. मध आणि लिंबू

एक टेबलस्पून मध घ्या आणि त्यात तेवढाच लिंबाचा रस टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. हे मिश्रण लावण्यापुर्वी पाय ओले करून घ्या. आता लिंबाच्या सालावर हे मिश्रण घ्या आणि ते साल पायांवर घासा. १० ते १२ मिनिटे पायांवर घासल्यानंतर आणखी १० मिनिटे थांबा आणि त्यानंतर पाय धुवा. दर एकदिवसा आड हा उपाय केल्यास पाय लवकरच स्वच्छ होतील.

 

२. संत्री
संत्रीची सालं मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टमध्ये थोडा लिंबाचा रस टाका आणि अर्धा टी स्पून बेकींग सोडा टाका. या मिश्रणाने पायांवर मसाज केल्यास टॅनिंग कमी होते.

 

३. बटाट्याचा रस
बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बटाट्याच्या रसाचा वापर आपण पायांवरचे टॅनिंग कमी करण्यासाठी नक्कीच करू शकतो. हा उपाय करण्यासाठी बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या. या रसामध्ये ४ ते ५ थेंब लिंबाचा रस टाका. हे मिश्रण पायांवर चोळा.

 

४. राईस वॉटर
हा उपाय करण्यासाठी तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्यात दूध घालून त्याची मिक्सरमध्ये फिरवून बारीक पेस्ट करून घ्या. त्यात अर्धा टीस्पून हळद टाका. हे मिश्रण स्क्रबप्रमाणे पायांवर चोळा आणि त्यांनतर १५ ते २० मिनिटांनी पाय धुवून टाका. 

 

५. दही आणि बेसन 
हा सगळ्यात पारंपरिक उपाय. एक चमचा बेसन घ्या. त्यात चिमुटभर हळद टाका. दही टाकून या मिश्रणाची पेस्ट तयार करा. तळपाय आधी ओले करून घ्या आणि त्यावर हा लेप लावून चोळा. त्यानंतर पाय धुवून टाका.

 

Web Title: Tanning due to tight footwear? 5 Home Remedies To Reduce The Scars On The Feet Due To Slippers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.