चेहरा काळवंडण्याची म्हणजेच टॅनिंगची समस्या ही केवळ उन्हाळ्यातच होते असं नाही. तर हिवाळ्यातही चेहरा काळवंडतो. थंडी वाजते म्हणून चेहऱ्याची काळजी न घेता उन्हात जाऊन बसल्याने चेहरा काळवंडण्याची समस्या निर्माण होते. हा काळवंडलेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरु शकतो. टमाट्याचं 5 स्टेप्स फेशियल करुन टॅनिंगची समस्या घालवून् चेहऱ्यावर तेज आणता येतं.
Image: Google
टमाट्याचा ब्यूटी इफेक्ट
1. टमाटा हा आरोग्यासाठी , डोळे नीट ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. तसेच टमाट्यातील गुणधर्म हे सौंदर्यास फायदेशीर असून टमाट्याचा उपयोग त्वचेचा पोत सुधारण्यासाठी होतो.
Image: Google
2. टमाट्यात ॲसिडिक गुणधर्म असतात. टमाट्यात क जीवनसत्त्वं आणि पोटॅशियम हे त्वचेसाठी महत्त्वाचे घटक असतात. हे दोन घटक खराब त्वचेचं रुपांतर सुंदर, ताज्या तवान्या त्वचेमध्ये करतात. टमाटयात लायकोपिन नावाचा महत्त्वाचा घटक असतो. हा ॲण्टिऑक्सिडण्ट म्हणून ओळखला जातो. या घटकामुळे उन्हापासून त्वचेचं होणार्ं नुकसान टाळता येतं. हा घटक त्वचेचं मुक्त मूलकांच्या हल्ल्यापासून त्वचेचं संरक्षण करतं. त्यामुळेच एजिंग, टॅनिंग या त्वचेच्या समस्यांचा धोका टाळला जातो.
3. टमाट्यात ॲस्ट्रिजेण्ट हा घटक असतो. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावरील अतिरिक्त तेल ( सीबम) निघून जाऊन त्वचा स्वच्छ राहाण्यास मदत होते. टमाट्यातील ॲस्ट्र्रिजेण्टमुळे त्वचेवरील ब्लॅकहेडस, व्हाइट हेडस टाळले जातात. त्वचेवरीची रंध्रं स्वच्छ होवून त्याचा आकार लहान होतो. यामुळे मुरुम पुटकुळ्यांचा धोका टळतो. तसेच टमाट्याचा वापर चेहऱ्यावा केल्यास त्वचा घट्ट होते. तरुण दिसण्यास मदत होते. टमाट्यातील त्वचेस उपकारक गुणांचा त्वचेसाठी फायदा करुन घेण्यासाठी आणि चेहऱ्याच्या काळवंडलेपणा घालवण्यासाठी 4 स्टेप्सचं टमाट्याचं फेशियल करणं फायदेशीर ठरतं.
Image: Google
स्टेप 1 टमाट्याचं क्लीन्जर
टमाटा क्लीन्जर वापरुन चेहरा स्वच्छ करावा. टमाटा क्लीन्जर तयार करण्यासाठी एका पिकलेल्या टमाट्यचा रसा काढावा. टमाट्याच्या रसात एक छोटा चमचा कडुलिंबाच्या पानांची पावडर घालावी. नीट एकत्र करुन हे मिश्रण चेहऱ्यास हलका मसाज करत लावावं. मसाज केल्यानंतर 2-3 मिनिटं ते चेहऱ्यावर राहू द्यावं. नंतर चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. टमाट्याच्या क्लीन्जरमुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते.
Image: Google
स्टेप 2 टमाट्याचा स्क्रब
टमाट्याचा स्क्रब तयार करण्यासाठी एक ताजा लालसर टमाटा घ्यावा. तो देठाच्या बाजुने कापावा. नंतर या टमाट्यात थोडं तांदळाचं पीठ घालावं. हा टमाटा मग चेहेऱ्यावर हलक्या हातानं घासावा. चेहऱ्यावर जिथे डाग आहेत तिथे हा टमाटा जास्त घासावा. 10-12 मिनिटं टमाटा घासून स्क्रब केल्यावर चेहरा थंडं पाण्यानं धुवावा.
Image: Google
स्टेप 3 टमाट्याचा लेप
टमाटा आणि तांदळाच्या पिठानं स्क्रब केल्यानंतर चेहऱ्याला टमाट्याचा लेप अर्थातच टमाट्याचा फेसपॅक लावावा. टमाट्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी टमाटा किसणीने किसावा. टमाट्याचा रस गाळून घ्यावा. टमाट्याच्या रसात एक चमचा तांदळाचं पीठ घालून ते चांगलं मिसळून घ्यावं. हा लेप चेहऱ्यास लावावा. 15-20मिनिटं चेहऱ्यावर लेप वाळू द्यावा. नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
Image: Google
स्टेप 4 टमाट्याचं टोनर
स्क्रब झाल्यावर चेहऱ्याला टमाट्याचं टोनर लावावं. टमाट्याचं टोनर करण्यासाठी 1 ताज्या लाल टमाटयाचा रस आणि 1 ताज्या काकडीचा रस घ्यावा. दोन्ही गाळून एका स्प्रे बाॅटलमध्ये भरावा. फ्रीजमध्ये न ठेवताही हे टोनर बाहेर 4 दिवस चांगलं राहातं. केवळ फेसपॅक लावून झाल्यावरच नाही तर एरवी उन्हातून घरी आल्यावर चेहरा धुतल्यावर हे टोनर लावावं. यामुळे उन्हानं चेहेरा काळवंडत नाही.
स्टेप 5 टमाट्याचं जेल
टमाट्याचं टोनर लावल्यानंतर चेहऱ्यास ओलसरपणा आणि आर्द्रता मिळण्यासाठी टमाट्याचं जेल वापरावं. टमाटा जेल तयार करण्यासाठी टमाट्यच्या रसात एक छोटा चमचा कोरफडीचा गर, खोबऱ्याचं तेल घालावं. हे चांगलं नीट एकत्र करावं हे मिश्रण चेहऱ्यास लावावं. 10-15 मिनिटांनी चेहरा पाण्यानं धुवावा.
टमाट्याचं फेशियल आठवड्यातून दोनदा केल्यास चेहऱ्याचा काळवंडलेपणा निघून जातो.