Join us  

उन्हाळ्याच्या ४ महिन्यात चेहरा खूपच टॅन होतो? ३ घरगुती फेस पॅक लावा; वर्षभर ग्लोईंग दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 9:40 AM

Tanning Removal Face pack : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही आंब्याचा वापर करू शकता. आंबा त्वचा फ्रेश ठेवण्यास मदत करतो. फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला आंब्याचा गर काढावा लागेल

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा काळी पडण्याची समस्या हमखास उद्भवते.  चेहरा काळा पडू नये म्हणून  वेगवेगळ्या प्रकारच्या सनस्क्रीन , लोशन बाजारात उपलब्ध आहेत. (Tanning Removal Tips) पण अनेकदा यामुळे हे त्वचेचं पूर्ण संरक्षण होत नाही. अशावेळी चेहरा चांगला ठेवण्यासााठी काही घरगुती फेसपॅक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (Homemade Face Pack)

कलिंगड आणि दह्याचा फेसपॅक

उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी लोक कलिंगडाचे सेवन करतात.पण यापासून आपण फेस मास्क देखील तयार करू शकता. यामुळे त्वचा तजेलदार राहील. यासाठी एका वाटीत कलिंगडाचा गर काढून त्यात दही मिसळावे लागेल. मिश्रण चांगले तयार झाल्यावर चेहऱ्यावर लावा आणि 20 ते 25 मिनिटे राहू द्या. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. तुमच्या त्वचेतील ओलावा टिकून राहील आणि त्वचा चमकेल.

काकडी आणि  दही

काकडीत यात जास्त प्रमाणात पाणी असते जे तुम्हाला हायड्रेट ठेवते. काकडी खाल्ल्याने त्वचेवर परिणाम तर होतोच पण त्यापासून बनवलेला फेस पॅकही तुमच्या त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवतो. काकडीचा फेस पॅक बनवण्यासाठी काकडीची पेस्ट तयार करा. त्यात एक चमचा पिठीसाखर आणि एक चमचा दही मिसळा. आता हे साहित्य चांगले मिसळा. मिश्रण तयार झाल्यावर चेहऱ्याला लावा. साधारण अर्धा तास ठेवा, त्यानंतर चेहरा धुवा.

सतत केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? दाट, लांब केसांसाठी जावेद हबीबच्या ७ टिप्स

आंब्याचा फेस पॅक

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही आंब्याचा वापर करू शकता. आंबा त्वचा फ्रेश ठेवण्यास मदत करतो. फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला आंब्याचा गर काढावा लागेल. त्यात थंड दूध घाला. ते चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण 15 मिनिटे ठेवा. कोरडे झाल्यानंतर साध्या पाण्यानं चेहरा धुवा.  हे फेसपॅक उन्हाळ्यात तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी