पुरूषांपेक्षा महिला आपल्या त्वचेबाबत जास्त चिंतेत असतात. यासाठी ते कायम उपाय करत असतात. सतत उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेचा ग्लो निघून जातो आणि चेहरा डल दिसू लागतो. (Tanning Removal Tips) तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तर ४ सोपे उपाय करून तुम्ही त्वचेचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवू शकता. या उपायामुळे तुमच्या त्वचेचं सौंदर्य वाढण्यास मदत होईल. समजून घेऊया याचा वापर कसा करावा. (How to remove tanning from face using home remedies)
हळदीची पेस्ट
चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी हळद आणि संत्र्याची पेस्ट असरदार मानली जाते. जास्तवेळ उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे ग्लो कमी होऊ लागतो. याशिवाय त्वचेचं नुकसानही होऊ शकतं. त्वचा डॅमेज होते. म्हणून त्वचा उजळवण्यासाठी संत्री किंवा हळदीच्या पेस्टचा वापर करा.
मान खूप काळी पडली? फक्त ३ मिनिटांत करा बनाना फेशियल; १० रुपये खर्च- मान दिसेल स्वच्छ
मुल्तानी माती
त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मुल्तानी माती हा फायदेशीर उपाय ठरतो. जर तुम्ही चंदनासह मुल्तानी माती लावली तर चेहरा सॉफ्ट आणि चमकदार दिसून येईल. उन्हाळ्याच्या दिवसात या पदार्थांचा वापर उपयुक्त मानला जातो. यासाठी चंदन आणि मुल्तानी माती समान प्रमाणात घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून पेस्ट बनवा. हा लेप तुम्ही सकाळ, संध्याकाळ चेहऱ्यावर लावू शकता. जवळपास १५ ते २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.
केस सतत पांढरे होतात? जावेद हबीबच्या खास टिप्स; कायम काळेभोर, शायनी राहतील केस
पपई
पपई आणि दूध त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. यामुळे डिहायड्रेशनची समस्याही कमी होते. हा उपाय करण्यासाठी पपई मॅश करून त्यात थोडं दूध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट नियमित आपल्या त्वचेवर लावा. ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या मॉईश्चराईज दिसेल. याव्यतिरिक्त तुम्ही सकाळ-संध्याकाळ ही पेस्ट चेहऱ्यावर लावू शकता.
लिंबू आणि मध
लिंबू आणि मधाचे कॉम्बिनेशन त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी उत्तम मानलं जातं. यात तुम्ही तांदळाचे पीठ घालू शकता. लिंबू, तांदळाचे पीठ आणि मध या मिश्रणाने चेहऱ्याची मसाज केल्यास त्वचेच्या मृतपेशी निघून जाण्यास मदत होईल आणि त्वचा ग्लोईंग दिसेल.