Lokmat Sakhi >Beauty > एक चमचा रेड वाइन; प्यायची नाही चेहर्‍याला लावायची! रेड वाइन फेसपॅकचा अनोखा प्रयोग!

एक चमचा रेड वाइन; प्यायची नाही चेहर्‍याला लावायची! रेड वाइन फेसपॅकचा अनोखा प्रयोग!

त्वचा सुंदर करण्यासाठी रेड वाइनचा उपयोग विविध पध्दतीने केला जातो. रेड वाइनमुळे त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या सहज सुटतात. मद्य न घेणार्‍यांनाही रेड वाइनचा लळा असतो. पण ज्यांना नाही तेही आता त्वचेसाठी म्हणून औषधासारखा तिचा उपयोग करत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 01:14 PM2021-11-07T13:14:17+5:302021-11-07T13:15:01+5:30

त्वचा सुंदर करण्यासाठी रेड वाइनचा उपयोग विविध पध्दतीने केला जातो. रेड वाइनमुळे त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या सहज सुटतात. मद्य न घेणार्‍यांनाही रेड वाइनचा लळा असतो. पण ज्यांना नाही तेही आता त्वचेसाठी म्हणून औषधासारखा तिचा उपयोग करत आहेत.

A teaspoon of red wine great work on skin! Try this unique experiment of Red Wine Facepack! | एक चमचा रेड वाइन; प्यायची नाही चेहर्‍याला लावायची! रेड वाइन फेसपॅकचा अनोखा प्रयोग!

एक चमचा रेड वाइन; प्यायची नाही चेहर्‍याला लावायची! रेड वाइन फेसपॅकचा अनोखा प्रयोग!

Highlights वाढत्या वयानुसार त्वचा सैल होणे, सुरकुत्या पडणं हे परिणाम रेड वाइनच्या उपयोगानं रोखले जातात आणि त्वचा तरुण राहाते.रेड वाइन वापरल्यानं तणाव प्रदूषण यामुळे निस्तेज आणि कोमेजलेला चेहेरा चमकतो.रेड वाइन चेहेर्‍याला लावल्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते.

रेड वाइनमधे अल्कोहोल असलं तरी ती आरोग्यासाठी चांगली असते असं म्हटलं जातं. वजन कमी करण्यास, हदयाचं आरोग्य चांगलं राखण्यास रेड वाइनची मदत होते असं म्हटलं जातं . अर्थात या मुद्यावर वाद, मतभेद बरेच आहेतच. पण रेड वाइनमुळे त्वचा छान होते हे मात्र खरं आहे. नुसतीच फायदेशीर नसून रेड वाइनच्या उपयोगानं त्वचा चमत्कारिकरित्या सुंदर होते असं सौंदर्यतज्ज्ञ म्हणतात. लिपस्टिक, हेअर मास्क आणि साबण या सौंदर्य उत्पादनांमधे रेड वाइनचा उपयोग केला जातो. त्वचा सुंदर करण्यासाठी रेड वाइनचा उपयोग विविध पध्दतीने केला जातो. रेड वाइनमुळे त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या सहज सुटतात. इतर प्रकारचे मद्य न घेणार्‍यांनाही रेड वाइनचा लळा असतो. पण ज्यांना नाही तेही आता त्वचेसाठी म्हणून औषधासारखा तिचा उपयोग करत आहेत.

Image: Google

रेड वाइनमुळे काय घडतं?

1. रेड वाइन स्किन एजिंग विरुध्द प्रभावी काम करते. कारण रेड वाइनमधे फ्लेवोनोइड, रेस्वेराट्रोल आणि टॅनिन सारखे महत्त्वाचे अँण्टिऑक्सिडण्टस असतात. यामुळे त्वचेस उपयुक्त कोलॅजन आणि फायबरचं प्रमाण वाढून त्वचेवर वयाच्या खुणा दिसत नाहीत. वाढत्या वयानुसार त्वचा सैल होणे, सुरकुत्या पडणं हे परिणाम रेड वाइनच्या उपयोगानं रोखले जातात आणि त्वचा तरुण राहाते.

2. त्वचेचा रंग उजळण्यासोबतच त्वचेवर इव्हन टोन ठेवायला मदत करते. रेड वाइन वापरल्यानं तणाव प्रदूषण यामुळे निस्तेज आणि कोमेजलेला चेहेरा चमकतो. रेड वाइनमुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. त्वचा स्वच्छ, ताजी तवानी आणि तरुण दिसते.

Image: Google

3. रेड वाइनमधे अँण्टिसेप्टिक आणि जिवाणू विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे चेहेर्‍यावर असलेले मुरुम पुटकुळ्या दूर करण्यास रेड वाइनचा उपयोग होतो. तसेच रेड वाइन चेहेर्‍याला लावल्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते. त्वचेवरील रंध्र स्वच्छ होतात. यामुळे मुरुम पुटकुळ्या येण्यासही अटकाव होतो.

चेहेर्‍यासाठी रेड वाइन वापरण्याची पध्दत

1. चेहेरा स्वच्छ करण्यासाठी म्हणजेच क्लिन्जिंग करण्यासाठी रेड वाइनचा उपयोग होतो. यासठी आधी रुमाल ओला करुन घ्यावा एक चमा लिंबाच्या रसात तीन ते चार मोठे चमचे रेड वाइन घालावी. हे मिश्रण कापसाच्या बोळ्यानं संपूर्ण चेहेर्‍याला लावावं. त्यानंतर क्लीन्जिंग लोशनद्वारे चेहेर्‍याचा हलका मसाज करावा. काही वेळानं चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

2. रेड वाइनचा उपयोग चेहेर्‍याची त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठीही होतो. नैसर्गिक एक्सफोलिएटर तयार करण्यासाठी रेड वाइनचा उपयोग होतो. यासाठी तांदूळ, कॉफी पावडर, साखर घालून हलवावं. हे मिश्रण थोडं घट्ट होवू द्यावं. हे मिश्रण तयार करण्यासाठी तांदूळ, कॉफी,साखर एकत्र करावे. मिक्सरवर हे गरमरीत दळून घ्यावं. त्वचेवरील घाण , मृत पेशी आणि मृत त्वचा काढण्यासाठी या वाटलेल्या मिश्रणाचा उपयोग एक्स्फोलिएटर म्हणून होतो. या मिश्रणात रेड वाइन घालून पेस्ट करावी. ही पेस्ट चेहेर्‍यावर बोटांनी गोलाकार मसाज करत लावावी. मसाज झाल्यानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Web Title: A teaspoon of red wine great work on skin! Try this unique experiment of Red Wine Facepack!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.