Lokmat Sakhi >Beauty > डोक्यावरचे पांढरे केस खूपच चमकतात? डाय न लावता करा ५ घरगुती उपाय; काळेभोर दिसतील केस

डोक्यावरचे पांढरे केस खूपच चमकतात? डाय न लावता करा ५ घरगुती उपाय; काळेभोर दिसतील केस

Teenage Home Remedies For White Hairs : टिनएज किंवा एडल्ट लोकांना केस पांढरे होण्याची समस्या  सर्रास उद्भवते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 11:19 AM2024-06-04T11:19:39+5:302024-06-04T15:55:46+5:30

Teenage Home Remedies For White Hairs : टिनएज किंवा एडल्ट लोकांना केस पांढरे होण्याची समस्या  सर्रास उद्भवते.

Teenage Home Remedies For White Hairs : Natural Home Remedies For Grey Hairs | डोक्यावरचे पांढरे केस खूपच चमकतात? डाय न लावता करा ५ घरगुती उपाय; काळेभोर दिसतील केस

डोक्यावरचे पांढरे केस खूपच चमकतात? डाय न लावता करा ५ घरगुती उपाय; काळेभोर दिसतील केस

आजकाल मुलांमध्ये पांढऱ्या केसांची समस्या दिसून येते.  (Grey Hairs Tips) ज्यामुळे पालक खूपच चिंतेत असतात. मुलांना पांढरे केस रोखण्यासाठी लोक वेगवेगळ्या क्लिनिक्सचे चक्कर मारतात. महागडी औषधं आणि तेलही विकत घेतात. तरीसुद्धा केस चांगले राहत नाही. (Natural Home Remedies For Grey Hairs) टिनएज किंवा एडल्ट लोकांना केस पांढरे होण्याची समस्या  सर्रास उद्भवते. काही सोपे घरगुती उपाय तुमचा हा त्रास टाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (How to Get Rid From White Hairs)

केस पांढरे होण्याची कारणं (Causes Of Greying Hairs)

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन्सच्या रिपोर्टनुसार आयर्नच्या कमतरतेमुळे केस वेळेआधीच पांढरे होतात. वेळेआधी केस पांढरे हण्यामागे अनुवांशिक कारणं असू शकतात.  तुमचे केस जर वेगाने पांढरे होत असतील तर त्यात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता असू शकते. यासाठी सगळ्यात आधी थायरॉईडची तपासणी करा. हे केसांच्या समस्यांचे कारण ठरू शकते. ताण-तणाव केस पांढरे होऊ न देण्यात महत्वाची भूमिका बजावतात. अभ्यासात असं दिसून आलं की स्मोकींगच्या सवयीमुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि केस पांढरे होतात.

पांढरे केस रोखण्यासाठी डाएट (Food For Hairs)

आपल्या आहारात प्रोटीन्स, कार्ब्स योग्य प्रमाणात घ्या. आपली त्वचा आणि  केसमध्ये केराटीन नावाच्या प्रोटीनने तयार झालेले असतात. अशा स्थितीत पालक, डेअरी उत्पादनं, प्रोटीन सप्लिमेंट्स यांसारख्या खादयपदार्थांचा आहारात समावेश करून केसांना पुरेपूर पोषण मिळते. ज्यामुळे केसांची नैसर्गिक चमकही कमी होत नाही. 

आवळा आणि लिंबाचा रस

केस पांढरे होण्याची समस्या टाळण्यासाठी बदामाच्या  तेलात  आवळा आणि लिंबाचा रस मिसळून डोक्यावर लावा आणि रात्रभर तसंच ठेवून सकाळी केस स्वच्छ पाण्याने धुवा. 

काळे तीळ

काळ्या तिळामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होते. काळ्या तिळातील एंटीऑक्सिडेंट्स शरीराच्या वाढीसाठी चांगली मदत  करतात. ज्यामुळे केस गळणं कमी होतं, केस अचानक तुटणं कमी होतं, नारळाचं तेल उकळून पांढऱ्या केसावर लावल्यास केस काळेभोर होण्यास मदत होते.

आवळा

सुके आवळे बदामाच्या तेलासोबत उकळून हे गाळून केसांना लावा. ज्यामुळे केस  पांढरे होणं टाळता येतं आणि केसांची वाढ देखिल चांगली होते. आवळ्याच्या सेवनाने केसांची वाढ चांगली होते इतकंच नाही तर केसांना मुळांपासून पोषण मिळते. 

Web Title: Teenage Home Remedies For White Hairs : Natural Home Remedies For Grey Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.