Lokmat Sakhi >Beauty > १ ग्लास पाणी घेऊन तपासा तुमचे केस किती हेल्दी, बघा घरच्याघरी कशी घ्यायची केसांची परीक्षा 

१ ग्लास पाणी घेऊन तपासा तुमचे केस किती हेल्दी, बघा घरच्याघरी कशी घ्यायची केसांची परीक्षा 

Hair Care Tips: आरोग्य तपासणी हा विषय तुम्ही ऐकलाच असेल. आता केसांचं आरोग्य कसं तपासायचं ते एकदा पाहून घ्या.... (Test the health of your hair at home)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2024 03:42 PM2024-04-10T15:42:40+5:302024-04-10T15:43:48+5:30

Hair Care Tips: आरोग्य तपासणी हा विषय तुम्ही ऐकलाच असेल. आता केसांचं आरोग्य कसं तपासायचं ते एकदा पाहून घ्या.... (Test the health of your hair at home)

Test the health of your hair at home, how to judge the health of hair, how to identify types of hair | १ ग्लास पाणी घेऊन तपासा तुमचे केस किती हेल्दी, बघा घरच्याघरी कशी घ्यायची केसांची परीक्षा 

१ ग्लास पाणी घेऊन तपासा तुमचे केस किती हेल्दी, बघा घरच्याघरी कशी घ्यायची केसांची परीक्षा 

Highlightsघरच्याघरी कशा पद्धतीने केसांचे आरोग्य किंवा आपल्या केसांचे टेक्स्चर तपासायचे ते पाहूया...

आरोग्याची तपासणी आपण अनेकदा केलेली असते. त्यातून आपली तब्येत कशी आहे, आपण कितपत निरोगी आहोत, याचा अंदाज येतो. अशीच एक तपासणी केसांचीही केली जाते. यातून आपले केस कितपत निरोगी आहेत, याचा अंदाज काढता येतो. आता आरोग्य तपासणी जशी डॉक्टरांकडे जाऊन केली जाते, तशी केसांची तपासणी करण्यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही (Test the health of your hair at home). घरच्याघरी कशा पद्धतीने केसांचे आरोग्य किंवा आपल्या केसांचे टेक्स्चर तपासायचे ते पाहूया...(how to judge the health of hair)

केस हेल्दी आहेत की नाही कसे ओळखावे?

 

आपले केस कितपत हेल्दी आहेत, हे जाणून घेण्यासाठी केसांची कशी तपासणी करावी याविषयीचा व्हिडिओ getfitwithmiruna या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हा प्रयोग करण्याआधी तुमचे केस व्यवस्थित शाम्पू करून धुवून घ्या. त्यासाठी एक ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यात तुमचे २ ते ३ केस टाका.

ट्रिपला गेल्यावर रोपांना पाणी कोण घालणार याचं टेन्शन? बघा बागेला ऑटोमॅटिक पाणी देण्याचं जुगाड

जर तुमचे केस पाण्यावर तरंगले तर तुमचे केस Low porosity hair या प्रकारातले आहेत. असे केस थोडे ड्राय प्रकारातले असतात. या केसांना चांगलं मॉईश्चर करण्याची गरज असते. कारण ते लवकर मॉईश्चर पकडून ठेवू शकत नाहीत. अशा पद्धतीचे केस नेहमी कोमट पाण्याने धुवावे. केस धुतल्यानंतर त्यांना वाफ दिल्यास अधिक चांगले. 

 

याउलट जर तुमचे केस पाण्यात बुडाले तर तुमचे केस High porosity hair या प्रकारात येतात. हे केस खूप लवकर माॅईश्चर शोषून घेतात आणि तेवढ्याच लवकर ते सोडूनही देतात.

उन्हाळ्यात सारखं पाणी- पाणी हाेतं, घशाला कोरड पडते? डिहायड्रेशन टाळण्यासाठी 'ही' फळं खा

गरम पाण्याने असे केस धुवू नयेत. या केसांसाठी नेहमी उत्तम मॉईश्चराईज करणारे प्रोडक्ट्स निवडावेत. जे केस फ्रिजी प्रकारचे असतात, ते या प्रकारात मोडतात. अशा केसांवर शक्यतो स्ट्रेटनिंग, कर्ल अशा कोणत्याही क्रिया करू नयेत. कारण त्यांना उष्णता सहन होत नाही. 

 

Web Title: Test the health of your hair at home, how to judge the health of hair, how to identify types of hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.