Lokmat Sakhi >Beauty > सतत होणाऱ्या केस गळतीमुळे हैराण ? खोबरेल तेलाचा घरगुती हेअर मास्क वाढवेल केसांचे सौंदर्य...

सतत होणाऱ्या केस गळतीमुळे हैराण ? खोबरेल तेलाचा घरगुती हेअर मास्क वाढवेल केसांचे सौंदर्य...

Homemade Hair Masks for Hair Growth : जर आपल्याला लांब केस हवे असतील तर घरगुती हेअरमास्क हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे कारण त्यात कोणतेही रसायन वापरलेले नाही. ज्यामुळे केसांना कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2023 07:59 PM2023-06-09T19:59:44+5:302023-06-09T20:48:34+5:30

Homemade Hair Masks for Hair Growth : जर आपल्याला लांब केस हवे असतील तर घरगुती हेअरमास्क हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे कारण त्यात कोणतेही रसायन वापरलेले नाही. ज्यामुळे केसांना कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही.

The benefits of a coconut oil hair mask and how to make them at home | सतत होणाऱ्या केस गळतीमुळे हैराण ? खोबरेल तेलाचा घरगुती हेअर मास्क वाढवेल केसांचे सौंदर्य...

सतत होणाऱ्या केस गळतीमुळे हैराण ? खोबरेल तेलाचा घरगुती हेअर मास्क वाढवेल केसांचे सौंदर्य...

लांबसडक, घनदाट आणि सुंदर केसांमुळे महिलांचे सौंदर्य अधिक खुलते. पण बहुतांश जणी केसगळतीच्या समस्येमुळेही त्रस्त असतात. केस गळण्याच्या समस्येमुळे होणारा त्रास हा त्याच व्यक्तीला समजू शकतो. आपले केस सुद्धा लांबसडक व घनदाट असावेत असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. लांबसडक केस हे आपला लुक सुद्धा अजून उठावदार करतात. असे असले तरीही सध्या बरेचजण केस गळतीच्या समस्येने त्रस्त असतात. आत्ताची बदलती जीवनशैली, धूळ, प्रदूषण आणि घामामुळे केसाचं गळणं वाढतं. काहीजणांना केस गळतीमुळे ताण-तणाव येतो. काहीजण हेअर ट्रिटमेंट्स करून घेतात किंवा बाजारातून महागडे प्रॉडक्ट्स विकत घेतात.

सुरूवातीला चांगले वाटत असले तरी या केमिकल्सयुक्त पदार्थांचे अनेक दुष्परीणाम आपल्या केसांवर दिसू लागतात. केस गळती कमी करण्यासाठी आपण असंख्य उपाय आपल्या केसांवर करून बघतो. इतकेच नव्हे तर काहीवेळा आपण पार्लर मध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंट्स घेतो या सगळ्याचा आपल्या केसांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या आपण आपल्या केसांची काळजी घेणेच योग्य ठरेल. नैसर्गिकरित्या आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी आपण घरच्या घरी हेअर मास्क बनवून आपले केस लांबसडक आणि घनदाट करू शकतो(The benefits of a coconut oil hair mask and how to make them at home).

लांबसडक, घनदाट केसांसाठी घरगुती हेअरमास्क नेमका कसा बनवायचा ?

हेअरमास्क बनवण्यासाठी आपल्याला २ चमचे खोबरेल तेल, एक चमचा ग्लिसरीन, दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि २ ते ४ चमचे एलोवेरा जेल आवश्यक आहे. एका मोठ्या बाऊलमध्ये वरील सर्व घटक एकत्रित करून चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे. 

मेहेंदी लावूनही पिकलेल्या केसांना हवा तसा रंग येत नाही ? जावेद हबीब सांगतात मेहेंदी लावण्याचे १ खास सिक्रेट...

मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...

हेअर मास्क केसांना कसा लावावा ? 

सर्वप्रथम केसांचे दोन भागात विभाजन करावे. केसांचे विभाजन करून झाल्यानंतर हा हेअरमास्क बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांपासून ते खालच्या टोकांपर्यंत लावून घ्यावा. हेअर मास्क केसांना लावताना हळुवार हातांनी स्कॅल्पला व केसांना मसाज करावा. त्यानंतर तासभर हा हेअर मास्क केसांवर लावून तसाच ठेवावा. तासभर झाल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत. असे केल्याने केसांना चांगली चमक येईल, केस तुटतील, केस गळणे कमी होईल आणि केसांची वाढ देखील होईल.      

ड्राय शाम्पू खरेच केसांसाठी चांगला असतो? तज्ज्ञ सांगतात फायदे तोटे...

उन्हाळ्यात कुरळ्या केसांचा ड्रायनेस वाढतो? ५ सोपे उपाय, कुरळे केसही होतील मऊ आणि चमकदार...

घरगुती हेअरमास्क लावण्याचे फायदे :- 

१. खोबरेल तेलातील मॉईश्चरायझिंग गुणधर्म आपल्या स्कॅल्पच्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात आणि कोरडेपणा कमी करतात.

२. खोबरेल तेलातील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म हे केसांना येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीशी लढण्यास मदत करतात. 

३. खोबरेल तेलामध्ये असलेले लॉरिक अ‍ॅसिड केसांच्या इतर समस्या दूर ठेवण्यास मदत करतात. 

४. यातील अ‍ॅंटी-इनफ्लेमेट्री गुणधर्म आपल्या डोक्याच्या त्वचेवरील जखमेवर आणि जखम भरण्यासाठी मदत करतात.

Web Title: The benefits of a coconut oil hair mask and how to make them at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.