केस गळण्याचा त्रास एकदा सुरू झाली की महिनोंमहिने केस तुटत राहतात. केस गळणं रोखण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं आहेत पण याचा परिणाम तात्पुरता दिसून येतो. विशिष्ट तेलं, शॅम्पू लावणं सोडलं की केसांची गळती पुन्हा सुरू होते. (Benefits of Hibiscus Oil for Your Hair) पार्लर ट्रिटमेंट्सने केस मऊ चांगले होतात पण नवीन केस उगवत नाहीत. फक्त तुम्ही केसांवर कोणती उत्पादनं वापरता याबरोबरच तुम्ही केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खाता हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. (The Benefits Of Using Hibiscus Oil For Hair Growth)
नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेली उत्पादनं केसाचं गळणं पूर्णपणे थांबवू शकतात. पूर्वापार या उत्पादनांचा वापर केसांवर केला जात आहे. केसांच्या वाढीसाठी हर्बल तेल कसं बनवायचे ते पाहूया. सगळ्यात आधी एका पातेल्यात नारळाचं तेल गरम करण्यासाठी ठेवा. मग यात फ्रेश जास्वंदाची फुलं धुवून घाला. कढीपत्याची पानं, मेथीचे दाणे, जास्वंदाची पानं, तुळशीची पानं, एलोवेरा चिरून घाला. तेल व्यवस्थित उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल गाळून घ्या. हे तेल तुम्ही ६ महिने केसांसाठी वापरू शकता. (How to make hibiscus hair oil at home)
जास्वंदाचे केसांना फायदे
जास्वंदाच्या फुलात मॉईश्चराजिंग गुणधर्म असतात ज्यामुळे केस हायड्रेट राहतात. केसांना फाटे फुटणं, कोरडे केस यांसारख्या समस्यांपासूनही सुटका होते. जास्वदांच्या फुलाचा वापर हेअर कलरच्या स्वरूपातही केला जातो. यामुळे केसांवर एक वेगळीच चमक येते. केस सॉफ्ट आणि शायनी राहतात. जास्वंद कोंड्यापासून आराम देतो. यामुळे स्काल्पसुद्धा निरोगी राहते. स्काल्पमध्ये खाज आणि कोंड्याची समस्या दूर करता येते.
मेथी आणि जास्वंदात कोंडा दूर करणारे गुणधर्म असतात. याची पेस्ट स्काल्पवर लावल्यानं कोंडा दूर होण्यास मदत होते. टक्कल पडू नये यासाठी जास्वंदाच्या फुलाच्या अर्काचा वापर केला जातो. जास्वंदाचे फुल केस उगवण्यासाठी फायदेशीर ठरते. नवीन केस उगवण्यासाठी असलेल्या अनेक औषधांमध्ये जास्वंदाच्या फुलाचा अर्क वापरला जातो. पांढरे केस लपवण्यसाठी पूर्वापार जास्वंदाच्या फुलाचा वापर केला जात आहे. जास्वंदातील एंटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन मेलेनिन प्रोडक्शनात मदत करतात. मेलेनिन असा पिंगमेंट आहे जो नैसर्गिकरित्या केस काळे करण्यास फायदेशीर ठरतो.