Lokmat Sakhi >Beauty > नखं वाढतच नाहीत, वारंवार तुटतात? हे घ्या होममेड सुपर हेल्दी ऑईल-नखं चमकतील...

नखं वाढतच नाहीत, वारंवार तुटतात? हे घ्या होममेड सुपर हेल्दी ऑईल-नखं चमकतील...

The Best Homemade Oil For Healthy & Strong Nails : Best Oil For Strengthening Natural Nails : नखं वारंवार तुटतात, ग्लो हरवला वापरा फक्त १ टेबलस्पून नेलं ग्रोथ ऑईल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 06:11 PM2024-09-25T18:11:35+5:302024-09-25T18:18:13+5:30

The Best Homemade Oil For Healthy & Strong Nails : Best Oil For Strengthening Natural Nails : नखं वारंवार तुटतात, ग्लो हरवला वापरा फक्त १ टेबलस्पून नेलं ग्रोथ ऑईल...

The Best Homemade Oil For Healthy & Strong Nails Best Oil For Strengthening Natural Nails | नखं वाढतच नाहीत, वारंवार तुटतात? हे घ्या होममेड सुपर हेल्दी ऑईल-नखं चमकतील...

नखं वाढतच नाहीत, वारंवार तुटतात? हे घ्या होममेड सुपर हेल्दी ऑईल-नखं चमकतील...

लांबसडक, निमुळती पण स्ट्रॉंग नखं असावीत असे बहुतेक सगळ्याचजणींना वाटते. नखं दिसायला सुंदर, नाजूक असतील तर ती छान दिसतात पण ती आतून तितकीच मजबूत असणे खूप गरजेचे असते. आपली नखं आपल्या हातांचे सौंदर्य वाढवतात. नखं सुंदर दिसावीत म्हणून आपण त्यांना मेनिक्युअर करतो, नेलपॉलीश लावून ती आणखीन सुंदर करतो. अशाप्रकारे नखांच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून आपण अनेक प्रकारे त्यांची काळजी घेतो. काहीवेळा नखांची इतकी काळजी घेऊनही नखांच्या अनेक समस्या निर्माण होतात(Best Oil For Strengthening Natural Nails).

बऱ्याचजणींची नख नीट वाढत नाहीत. ज्यांची नख लांब वाढतात, त्यांना ती पटकन तुटायची भीती असते. यासोबतच काहींची नखं कमकुवत असतात, नखांना ग्लो नसतो, तसेच त्यांच्या नखांची वाढही मंद असते. अशावेळी आपण काही घरगुती उपायांचा वापर करुन देखील नखांची वाढ सुधारू शकतो. चांगली त्वचा आणि केसांप्रमाणेच चांगली, मजबूत आणि लांब नखे मिळविण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठीच नखांच्या उत्तम आरोग्यासाठी घरच्याघरीच नखांना आवश्यक पोषण देणारे तेल तयार करण्याची कृती पाहूयात(The Best Homemade Oil For Healthy & Strong Nails).

नखांसाठी तेल तयार करण्याचे साहित्य :- 

१. बदामाचे तेल - २ टेबलस्पून 
२. ऑलिव्ह ऑईल - १ टेबलस्पून 
३. खोबरेल तेल - २ टेबलस्पून 

अभिनेत्री रोशनी चोप्रा सांगते, चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी सिक्रेट ड्रिंकची रेसिपी, स्किनवर गुलाबी ग्लो कायम...

नखांसाठी तेल तयार करण्याची कृती :-

एक स्प्रे बॉटल घेऊन त्यात सगळ्यात आधी २ टेबलस्पून बदामाचे तेल घ्यावे त्यानंतर त्यात १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल आणि २ टेबलस्पून खोबरेल तेल घालावे. आता या बाटलीतील सगळी तेलं एकजीव होण्यासाठी बाटलीचे झाकण लावून ती थोडी हलवून घ्यावी जेणेकरुन त्यातील तेलं एकजीव होण्यास अधिक मदत होईल. 

बाटलीतील आयलायनर सुकले? ही घ्या तेच लायनर लावण्याची एक भन्नाट ट्रिक, झटपट सोल्यूशन... 


पापण्यांवर आर्टिफिशियल आयलॅशेज लावताना होते गडबड, सोप्या ६ स्टेप्स- डोळेही राहतील सुखरुप...

या तेलाचा वापर नखांवर कसा करायचा ? 

१. या तेलाचा वापर आपल्या नखांवर करण्याआधी क्लिंजर कापसाच्या बोळ्यावर घेऊन त्याने आपली नखं स्वच्छ करुन घ्यावीत. 
२. आता या तयार तेलाचे काही थेंब आपल्या नखांवर घालून हलक्या हाताने नखांना मालिश करुन घ्यावे. 
३. रात्री झोपताना या तेलाने नखांना मालिश करुन रात्रभर तेल तसेच नखांवर ठेवून दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून घ्यावे.
४. या तेलाने नखांवर किमान आठवडाभर मालिश केल्यास नखांच्या अनेक समस्या दूर होऊन नखं मजबूत होऊन ग्लो करतील.

Web Title: The Best Homemade Oil For Healthy & Strong Nails Best Oil For Strengthening Natural Nails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.