Join us  

मी टीनएजर आहे, माझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स काही केल्या कमी होत नाहीत? मी नक्की काय करु?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2023 7:08 PM

The Best Skin Care Routine for a Teenage Girl टीनएजर म्हणजेच वयात येणाऱ्या मुलींसाठी सुंदर दिसणे फार महत्त्वाचे असते, त्याचवेळी नेमके चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि...

मी टीनएजर आहे, चेहऱ्यावर पिंपल्स खूप, माझे स्किन केअर रुटीन नक्की कसे असावे? काय केलं म्हणजे चेहरा नितळ सुंदर दिसेल?

'पी हळद अन हो गोरी' असं प्रत्येक वयात येणाऱ्या मुलीला सांगण्यात येतं. वयानुसार मुलींमध्ये अनेक बदल घडतात. मुख्यतः टीनेजर मुलींमध्ये स्किनच्या निगडीत बदल लवकर दिसून येतात. वेळीच काळजी घेतली नाही तर, या समस्या आणखी वाढतात. निरोगी त्वचेसाठी योग्य आहार आणि त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या त्वचेचे नेमके स्वरूप माहित नसते. ज्यामुळे आपण चुकीचे स्किन केअर रुटीन फॉलो करतो. ज्याचा थेट दुष्परिणाम आपल्या त्वचेला सहन करावा लागतो.

किशोरवयीन मुलींना त्वचेच्या संबंधित माहिती नसते. अशा स्थितीत आपण काही बेसिक स्किन रुटीन फॉलो करून पाहू शकता. यामुळे त्वचेच्या संबंधित समस्या वाढण्यापेक्षा त्याची पूर्व काळजी घेणं गरजेचं आहे(The Best Skin Care Routine for a Teenage Girl).

किशोरवयीन मुलींनी त्वचेची काळजी कशी घ्यावी?

पिंपल्समागे कारण जाणून घ्या

हार्मोन्समधील बदलांमुळे तेल ग्रंथींचा विस्तार होतो, ज्यामुळे किशोरवयीन मुलींची त्वचा अधिक तेलकट होते. त्वचा ऑइली होत असल्यामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स, पुरळ उठतात. त्वचेची वेळीच काळजी घेतली नाही तर, ही समस्या आणखी वाढू शकते. धूळ, प्रदुषणामुळे चेहरा आणखी खराब होऊ शकतो. अशा स्थितीत चेहरा नेहमी क्लिन करत राहा.  मुरुमांच्या समस्या वाढली तर, डॉक्टरांचा सल्ला घ्या.

केसांना मेहेंदी लावताना मेहेंदीत घाला ‘या’ तेलाचे १० थेंब, केस वाढतील-कोंडाही होईल कमी

त्वचा स्वच्छ क्लिन करा

आपण जर त्वचेवर मेकअप लावत असाल तर, तो वेळेवर स्वच्छ क्लिन करा. जर आपण मेकअप वेळेवर काढत नसाल तर, त्वचेच्या संबंधित समस्या वाढू शकतात. मेकअपच्या दुष्परिणामामुळे त्वचा निर्जीव दिसू लागते. किशोरवयात त्वचा खूप नाजूक असते, म्हणून शक्य तितक्या लवकर मेकअप काढा. त्वचा स्वच्छ करण्यासाठी क्लीन्सर किंवा कच्च्या दुधाचा वापर करा.

 त्वचेला मॉइश्चरायज करा

स्किनला मॉइश्चरायज करणे खूप गरजेचं आहे. यासाठी उत्तम दर्जेचा मॉइश्चरायजरचा वापर करा. मॉइश्चरायजरच्या वापरामुळे त्वचा निर्जीव होत नाही. त्वचेचे सौंदर्य टिकून राहते. व त्वचा हायड्रेट राहते.

दोन गोष्टी शाम्पूत मिसळा आणि करा घरच्याघरी हेअरस्पा, केस चमकतील-पार्लरचा खर्चही वाचेल

तेलकट पदार्थ कमी खा

तेलकट पदार्थ खाल्ल्याने वजन तर वाढतेच, यासह त्वचेवर देखील दुष्परिणाम दिसून येते. अधिक तेलकट पदार्थ खाल्ल्याने काहींच्या चेहऱ्यावर मुरूम दिसून येतात. त्यामुळे कमी तेलकट पदार्थ खा.

सनस्क्रीन वापरा

जितक्या लवकर आपण आपल्या दिनचर्येत सनस्क्रीनचा समावेश कराल, तितक्या लवकर तुमच्या वयानुसार कोलेजनची पातळी उत्तम राहण्याची शक्यता जास्त असते. सनस्क्रीन सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. त्यामुळे उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावून बाहेर पडा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी