केसांचे चांगले पोषण व्हावे त्यांची वाढ नीट व्हावी यासाठी आपण केसांना तेलाने मसाज करतो. शरीराच्या अवयवांप्रमाणेच केसांचे देखील योग्य पद्धतीने पोषण होणे गरजेच असत. खरंतर, केसांना तेल लावणं किती अत्यावश्यक आहे हे आपण सर्वांनाच माहित आहे. असे असले तरीही सध्याच्या व्यस्त आणि धावपळीच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे आपण केसांच्या आरोग्याकडे नीट लक्ष देत नाही. केसांकडे दुर्लक्ष केल्यामुळे केस खराब होऊन रुक्ष, निस्तेज दिसू लागतात(Are you oiling your hair in right way ?)
केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळणे खूप आवश्यक असते, त्यासाठी केसांना तेल लावणे फारच महत्वाचे असते. सुंदर आणि घनदाट केसांसाठी तेलाचा वापर हा फार वर्षांपासून केलाच जातो. केसांना तेल मसाज न केल्यास केस कमकुवत होऊन तुटण्याची तसेच गळण्याची शक्यता असते. तेलामुळे कोरड्या केसांची, कोंडा तसेच केसांशी संबंधित अन्य समस्या कमी होण्यास मदत मिळते. शक्यतो आपण केसांना तेल लावताना काही चुका (Stop Oiling Your Hair The Wrong Way) करतो. परंतु या चुका सुधारुन तेल लावताना काही टिप्स (How To Oil Your Hair The Right Way) आवर्जून फॉलो केल्या तर त्याचा नक्कीच फायदा होतो. आता केसांना तेल लावणे यात काय समजून घेण्यासारखे आहे असे अनेकांना वाटू शकते. मात्र तेल लावण्याची योग्य पद्धत फॉलो (The best way to oil your hair to get the most out of the soothing ritual) केली तर त्याचा केसांचा पोत सुधारण्यास निश्चतच फायदा होईल. डर्मेटोलॉजिस्ट, अंकुर सरीन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत सांगितली आहे(How to Use Oil to Strengthen and Grow Hair).
केसांना तेल लावण्याच्या बाबतीत डर्मेटोलॉजिस्ट सांगतात...
१. केसांच्या वाढीसाठी आपण बाजारांत विकत मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची तेलं केसांना लावतो. परंतु डर्मेटोलॉजिस्टच्या मते, केसांसाठी खोबरेल तेलापेक्षा उत्तम असे दुसरे कोणतेच तेल नाही. केसांच्या चांगल्या वाढीसोबतच त्यांना योग्य प्रमाणात पोषण मिळवून देण्यासाठी शुद्ध खोबरेल तेलच फायदेशीर ठरते.
२. केसांसाठी खोबरेल तेलाचा वापर करताना ते केसांना लावण्यापूर्वी थोडे कोमट गरम करून घ्यावे. असे गरम केलेले खोबरेल तेलच केसांसाठी वापरावे. कोमट गरम केलेले तेल हे केसांच्या मुळांना अधिक पोषण देऊन मजबूत बनवतात. याचबरोबर कोमट गरम केलेले तेल हे केसांना अधिक मॉइश्चराइज करण्यासाठी फायदेशीर ठरते. तेलाची उष्णता डोक्याचा रक्तप्रवाह वाढण्यास मदत करेल. त्यामुळे केसांची वाढ तर चांगली होईलच पण केसांना आवश्यक ते पोषणही मिळण्यास मदत होईल.
३. डर्मेटोलॉजिस्टच्या मते केसांना तेल लावताना ते स्कॅल्पला न लावता केवळ केसांच्या खालच्या टोकांना लावावे.
केस खूपच गळत आहेत ? 'या' सोप्या पद्धतीने केस विंचारल्यास केस गळणे होईल बंद...
देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...
४. साधारणतः लोकांमध्ये असा समज आहे की, आपल्या केसांना रात्रभर तेल लावल्याने तेल चांगले शोषण्यास मदत होते. परंतु बहुतेक तेलांमध्ये केसांत लगेच मुरण्याची क्षमता असते. ज्यामुळे ते आपल्या फॉलिकल्ससाठी उत्तम ठरतात. केसांना कंडिशनिंग व मॉइश्चरायझिंग करण्यासाठी केसांवर किमान २ तास तेल ठेवणे गरजेचे असते. केसांवर २ तासांपेक्षा अधिक वेळ तेल ठेवल्यास प्रत्यक्षात घाण, धूळ, माती ही केसांवर चिकटून बसते. यामुळे केस अधिकच खराब होऊ लागतात. ज्यांना त्वचा व केसांच्या अनेक समस्या आहेत अशा लोकांनी दीर्घकाळ केसांवर तेल लावून ठेवल्यास त्यांच्या त्वचे व केसांसंबंधित अधिक समस्या वाढू शकतात.
५. केसांवर २ तास तेल ठेवल्यांनंतर एखाद्या चांगल्या नैसर्गिक, सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत व त्यानंतर पुन्हा केसांवर तेल लावण्याची चूक करू नये.
सततच्या केस गळतीने हताश झालात ? करा सोपा ‘पोटली मसाज’, केस गळणं थांबेल लवकर...
६. डर्मेटोलॉजिस्टच्या मते, महिन्यांतून फक्त २ वेळाच केसांवर तेल लावणे पुरेसे आहे (Should we apply hair oil daily?)
७. शॅम्पूचा अती वापर टाळा. शॅम्पूतील काही रासायनिक घटकांमुळे डोक्यावरची त्वचा कोरडी पडू शकते, ज्याचा परिणाम केस गळण्यामध्ये होऊ शकतो. हे केसांच्या वाढीसाठी हानिकारक ठरते. शक्यतो केस धुण्यासाठी सौम्य व मेडिकेटेड शॅम्पूचा वापर करावा.