सध्या वातावरणात हलकासा थंडावा जाणवू लागला आहे. थंडीच्या या दिवसांत आपल्याला एकूणच त्वचेची व केसांची भरपूर काळजी घ्यावी लागते. वातावरणातील वाढत्या गारठ्यानुसार याचे परिणाम आपल्या विशेषतः त्वचेवर व केसांवर दिसून येतात. वेळीच केसांची आणि त्वचेची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्यांचे नैसर्गिक सौंदर्य हरवू शकते. थंडीच्या दिवसांत केसांचा विचार केला असता केसांसंबंधित अनेक लहान - मोठ्या समस्या निर्माण होतात. प्रत्येक ऋतूनुसार केसांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घ्यावी लागते. केसांच्या या बारीक - सारीक समस्या सोडवण्यासाठी केसांना तेलाने मालिश करणे हा सर्वात सोपा आणि बेसिक पर्याय मानला जातो(Are you oiling your hair in right way).
आपल्याकडे केसांच्या उत्तम आरोग्यासाठी केसांना खोबरेल तेल लावण्याचा सोपा पर्याय निवडला जातो. त्वचेशिवाय खोबरेल तेल हे केसांसाठीही खूपच फायदेशीर मानले जाते. खोबरेल तेल टाळू व केसांवर लावल्याने केस (Stop Oiling Your Hair The Wrong Way) रेशमी आणि मुलायम राहतात. बहुतेकजणी आपल्या केसांसाठी खोबरेल तेलाचा वापर करतात, परंतु जर हे तेल केसांना लावण्याची योग्य (The best way to oil your hair to get the most out of the soothing ritual) पद्धत जर आपल्याला माहित असेल तर आपल्या केसांना त्यापासून अधिक फायदे मिळू शकतात. खोबरेल तेलाने (How To Oil Your Hair The Right Way) हेअर मसाज तर सगळेच करतात परंतु हा हेअर मसाज योग्य पद्धतीने केल्यास, त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला होऊ शकतो(How to Use Oil to Strengthen and Grow Hair).
खोबरेल तेलाने केसांना मसाज करण्याची योग्य पद्धत :-
१. खोबरेल तेलाने केसांना योग्य पद्धतीने मसाज करण्याआधी आपल्याला योग्य खोबरेल तेल निवडण्याची सर्वात जास्त गरज आहे. यासाठी आपण ऑरगॅनिक खोबरेल तेलाचा वापर करु शकता. ऑरगॅनिक व शुद्ध खोबरेल तेलांत सर्वात जास्त पोषक तत्वे असतात.
२. खोबरेल तेलाची योग्य निवड केल्यानंतर आपल्या केसांचा प्रकार व पोत कोणता आहे, हे जाणून घ्यावे. केसांचा प्रकार व पोत लक्षात घेऊनच मग केसांवर तेल लावावे. आपले केस कोरडे, रुक्ष किंवा ऑयली असल्यास त्यानुसार केसांना तेल लावावे. कोरड्या, खराब, रुक्ष झालेल्या केसांना आपण जास्त प्रमाणात खोबरेल तेल लावू शकतो. याउलट ऑयली केसांना आपण कमी प्रमाणांत खोबरेल तेल लावावे. जर आपले केस सामान्य प्रकारचे असतील तर त्यांना कमी प्रमाणांत खोबरेल तेल लावावे.
नेहमीच्याच खोबरेल तेलात मिसळा आजीबाईच्या बटव्यातील १ सिक्रेट पदार्थ, केसांच्या सौंदर्यात पडेल भर...
मेहेंदी - केळी - लिंबाचा रस; केसांच्या अनेक समस्यांवर १ उपाय, सगळे महागडे उपचार होतील बंद...
३. स्वच्छ आणि कोरड्या असणाऱ्या केसांना खोबरेल तेल लावून घ्यावे. केसांना खोबरेल तेल लावण्याआधी केसांतील गुंता मोठ्या दातांच्या कंगव्याने मोकळा करुन घ्यावा. केसांचा गुंता मोकळा करून घेतल्यानंतरच केसांना खोबरेल तेल लावून मसाज करावा. यामुळे केसांच्या मुळांना तेल व्यवस्थित लागण्यास मदत होते.
४. केसांना खोबरेल तेल लावण्याआधी तेल हलकेच गरम करुन घ्यावे. केसांच्या मुळांना व केसांच्या टोकांना खोबरेल तेल लावल्याने केस अधिक मऊ व मुलायम होण्यास मदत मिळते.
वारंवार केसांना हेअर कलर करूनही केसांचा रंग फिकट होऊ नये म्हणून ७ चुका टाळा...
५. केसांना खोबरेल तेल लावण्यापूर्वी बोटांच्या टोकाला तेल लावून ते केसांच्या मुळांना लावावे आणि हळू हळू मसाज करावा. केसांना लावलेले तेल स्कॅल्पवर हलकेच मसाज करुन ते स्कॅल्पमध्ये मुरवून घ्यावे. कमीतकमी ५ मिनिटे केसांना पूर्णपणे मसाज करावा, यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केस मजबूत होतात.
६. जाड दात असलेल्या कंगव्याच्या मदतीने किंवा बोटांच्या मदतीने केसांना पूर्णपणे तेल लावून मसाज करुन घ्यावा.
७. केसांना खोबरेल तेल लावून किमान ३० मिनिटे तसेच राहू द्यावे, केसांना डिप कंडिशनिंग हवे असेल तर तेल रात्रभर लावून ठेवावे आणि सकाळी शॅम्पूने केस धुवून स्वच्छ करावेत.
अशा पद्धतीने केसांना खोबरेल तेल लावून मसाज केल्याने केस मऊ, गुळगुळीत व मुलायम होण्यास मदत मिळते.