Lokmat Sakhi >Beauty > तुमच्याही हाताला वर्षाचे बाराही महिने भेगा असतात? ६ टिप्स, हात होतील बरे-मऊसुत...

तुमच्याही हाताला वर्षाचे बाराही महिने भेगा असतात? ६ टिप्स, हात होतील बरे-मऊसुत...

How To Heal Cracked Skin At Thumb Tip : हातांना भेगा नक्की कशाने पडल्या, काय त्याच्यावर उपाय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2023 01:10 PM2023-04-19T13:10:58+5:302023-04-19T13:16:00+5:30

How To Heal Cracked Skin At Thumb Tip : हातांना भेगा नक्की कशाने पडल्या, काय त्याच्यावर उपाय?

The Causes of Cracked Skin and the Best Ways to Treat It | तुमच्याही हाताला वर्षाचे बाराही महिने भेगा असतात? ६ टिप्स, हात होतील बरे-मऊसुत...

तुमच्याही हाताला वर्षाचे बाराही महिने भेगा असतात? ६ टिप्स, हात होतील बरे-मऊसुत...

आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या हातांवर वर्षाचे बाराही महिने भेगा पडलेल्या दिसतात. या भेगा तुलनेनं अगदीच लहान असतात परंतु त्या दिसताना खूपच वाईट दिसतात. कधी कधी या भेगांचे प्रमाण इतके वाढलेले असते की, यामुळे हाताला वेदना होतात. आपल्या शरीरावरील त्वचेचे अनेक स्तर असतात. अनेकदा आपल्याला त्वचेच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचदा थंडीच्या किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत हातांवर भेगा पडू लागतात. हातांवरील भेगांची समस्या काहीवेळा इतकी गंभीर होऊन जाते की, त्यातून रक्त येऊ लागत. 

आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर भेगा पडण्याची शक्यता असते. आपले पाय, हात आणि ओठ विशेषतः क्रॅक होण्याची शक्यता असते. सुप्रसिद्ध  त्वचारोगतज्ज्ञ, एमडी डॉ. आंचल पंथ या सोशल मीडियावर बर्‍यापैकी सक्रिय असतात. त्यांनी एका पोस्टद्वारे हात फुटण्याची अनेक कारण सांगितली आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ही समस्या जास्त पाण्याची कामे करणाऱ्यांमध्ये अधिक प्रमाणांत दिसून येते. याला क्युम्युलेटिव्ह इरिटंट कॉन्टॅक्ट डर्माटायटिस (Cumulative Irritant Contact Dermatitis) म्हणतात. ज्यामध्ये हात वारंवार ओले केल्यामुळे त्वचेला अनेक त्रासदायक गोष्टींचा त्रास होतो. त्याचा अंगठा, तर्जनी आणि मध्य बोटांवर परिणाम होतो. डॉ. आंचल यांच्याकडून जाणून घेऊ या की, या समस्येपासून मुक्ती कशी मिळवता येईल(The Causes of Cracked Skin and the Best Ways to Treat It).


हाताला व हातांच्या बोटांवर वारंवार पडणाऱ्या भेगा नाहीशा करण्यासाठी नक्की कोणते उपाय आहेत? 

१. डिटर्जंट आणि डिश वॉशिंग साबण वापरणे टाळा :- कपडे धुण्याचे डिटर्जंट आणि डिश वॉशिंग साबणाचा वारंवार वापर करणे टाळावे. डिटर्जंट आणि डिश वॉशिंग साबण यांच्या सततच्या वापरामुळे हातांची खूप जळजळ होते. डिटर्जंट आणि डिश वॉशिंग साबण यांना थेट हात लावणे टाळावे. जर तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये डिटर्जंट ओतत असाल तर चमच्याचा वापर करावा. डिटर्जंटचा फ्रॉथ करण्यासाठी स्पॅटुला किंवा चमच्याचा वापर करावा. त्याचप्रमाणे डिश धुण्याचा डिश वॉशिंग साबण थेट हातावर लावू नये. तसेच डिश वॉशिंग करताना हातात ग्लोव्ह्ज घालून मगच भांडी धुवून घ्यावीत. यामुळे तुमच्या हातांच्या बोटांवर भेगा पडण्याची समस्या दूर होईल. 

उन्हाळ्यात काखेत खूप घाम येतो, दुर्गंधीही येते? त्याची कारणे ५ - पाहा कशी टाळता येतील...

२. पाण्यात काम करण्यापूर्वी हातमोजे घाला :- हातांना पडलेल्या भेगांची समस्या दूर करण्यासाठी रबर किंवा विनाइल सारख्या मटेरियल पासून बनलेल्या हॅन्ड ग्लोव्ह्जचा वापर करावा. भांडीही धुवायची असतील तर त्यासाठी हातमोजे वापरणे गरजेचे आहे. तसेच, ते तुमच्या हातात मापशीर चांगले बसतील हे लक्षात ठेवा, कारण त्यांच्या आत पाणी गेल्यास हातांच्या भेगांची समस्या अधिक वाढू शकते.   

३. कांदा, लसूण आणि आले चिरणे टाळावे :- हाताला भेगा पडल्या असतील तर अनेक गोष्टी करण्यात अडचण येऊ शकते. जर तुमच्या हाताला भेगा पडल्या असतील तर कांदा, लसूण आणि आले चिरणे टाळावे. जर तुमच्या हाताला आधीच भेगा पडल्या असतील आणि त्यात जर तुम्ही कांदा, लसूण, आले चिरले असता हातांना जळजळ होऊ शकते. हातांच्या भेगा संपूर्णपणे ठिक होईपर्यंत थोड्या दिवसांसाठी कांदा, लसूण आणि आले चिरणे टाळावे. 

मेकअपचा ब्रश स्वच्छ आहे का? चेहऱ्याला होईल इन्फेक्शन, टॉयलेट सीटपेक्षा असतात जास्त बॅक्टेरिया...

४. हातांच्या भेगांना तूप लावा :- जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात काम करत असाल तेव्हा तुमच्या बोटांच्या टोकांना थोडे तूप लावा. यामुळे हातांचा कोरडेपणा कमी होईल. दिवसांतून किमान २ वेळा आपण हातांच्या भेगांना तूप लावून मालिश केल्याने हातांच्या भेगा कमी होण्यास मदत होते. तूप लावल्याने हातांना भेगा पडलेली त्वचा मॉइश्चराइज होते. हँड क्रिम लावल्याने स्वयंपाकघरात काम होणार नाही अशी भीती वाटत असेल तर तूप हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. 

५. लिक्विड हँड वॉशऐवजी बार साबण वापरा :- आपल्याकडे असं मानलं जात की, लिक्विड हँड वॉश वापरल्याने हात स्वच्छ होतात. तसेच लिक्विड हँड वॉश हातांसाठी चांगले आहे असे मानून आपण दररोजच्या वापरात हे लिक्विड हँड वॉश वापरतोच. लिक्विड हँड वॉश हातांवर घेण्यासाठी आपण डिस्पेंसरचा वापर करतो. काहीवेळा या डिस्पेंसरमधून जास्तीचे लिक्विड हँड वॉश हातांवर पडते. या लिक्विड हँड वॉशला फेस आणण्यासाठी ते हातांवर रगडून घासावे लागते. लिक्विड हँड वॉश हातांवर जास्त प्रमाणात चोळल्याने त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाते. असे वारंवार केल्यामुळे हातांना भेगा पडू शकतात. त्यामुळे हात धुण्यासाठी लिक्विड हँड वॉशऐवजी सौम्य साबणाचा वापर करावा. 

६. हँन्ड क्रिमचा वापर करावा :- भेगा पडलेल्या हातांना लवकर ठिक करण्यासाठी हँन्ड क्रिमचा जरूर वापर करावा. आपले हात चांगले मॉइश्चरायझ करणे खूप महत्वाचे असते. जर तुम्हाला हातांवरील भेगा पडलेली त्वचा लवकर बरी करायची असल्यास, दिवसातून ३-४ वेळा किंवा हात धुतल्यानंतर हातांना मॉइश्चरायझिंग क्रिम लावणे गरजेचे आहे. हँन्ड क्रिमचा वापर करताना ही हँन्ड क्रिम घट्ट स्वरुपातील आणि त्यातील मॉइश्चरायझर किंवा ओलावा २४ तास टिकवून ठेवणारी हवी.

Web Title: The Causes of Cracked Skin and the Best Ways to Treat It

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.