Japanese Secret Water : जपानी लोक आपली फिटनेस आणि हेल्दी त्वचेसाठी खूप फेमस आहेत. सगळ्यांनाच त्यांच्या तरूण, चमकदार आणि टवटवीत त्वचेचं सीक्रेट जाणून घ्यायचं असतं. हे लोकही महागडे क्रीम वापरून आपली त्वचा हेल्दी आणि सुंदर ठेवत असतील, असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय. कारण त्यांच्या या हेल्दी त्वचेचं रहस्य एक सीक्रेट वॉटर आहे. हे सीक्रेट वॉटर दुसरं-तिसरं काही नसून आले आणि लिंबाचं पाणी आहे. जे आपल्या औषधी गुणांसाठी फेमस आहे.
आल्यामध्ये जिंजरोल नावाचं एक तत्व असतं. ज्यानं डायजेशन चांगलं होतं, मसल्समधील वेदना कमी होतात आणि इम्यून सिस्टीम मजबूत राहतं. तसेच लिंबामधून व्हिटॅमिन सी भरपूर मिळतं, ज्याच्या मदतीनं इम्यून सिस्टीम आणि डायजेशनसोबतच त्वचा हेल्दी ठेवण्यासही मदत मिळते. त्यासोबतच शरीरही डिटॉक्स होतं. जर लिंबू आणि आले एकत्र केलं तर हे एक पावरफुल मिश्रण बनतं. ज्यामुळे अनेक आजारांचा धोका टळतो. चला जाणून घेऊ याचे इतरही फायदे...
पचन तंत्र मजबूत राहतं
तुमचं पोट नेहमीच खराब होत असेल किंवा पोटात काहीही खाल्लं तरी गॅस होत असेल तर आले आणि लिंबाचं हे खास पाणी बेस्ट ठरेल. दोन्हींमध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात, जे डायजेस्टिव एंझाइम्सचं प्रोडक्शन वाढवतात आणि पचनक्रिया सुरळीत करतात. हे पाणी रोज प्यायल्यास शरीरातील सूजही कमी होते. तसेच बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि अपचन अशा समस्याही दूर राहतात.
वजन होईल कमी
आले आणि लिंबाचं पाणी मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास, डायजेशन वाढवण्यास आणि कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते. आल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, ज्यामुळे भूक कमी लागते. दुसरीकडे लिंबामुळे भूक कमी होते आणि बॉडी फॅट मेटाबॉलाइज करण्याची क्षमताही वाढते.
बेली फॅट कमी होतं
बेली फॅट म्हणजे पोटावरील चरबी कमी करणं काही सोपं काम नसतं. जर तुमच्या पोटावरही चरबी वाढली असेल, तर जपानी सीक्रेट वॉटर तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. लिंबाच्या रसानं फॅटचे मॉलिक्यूल्स तोडण्यास मदत मिळते. दुसरीकडे आल्यानं मेटाबॉलिज्म वाढतं आणि बेली फॅट कमी होतं.
त्वचा होते चमकदार
लिंबात असलेल्या व्हिटॅमिन सी नं त्वचेला हेल्दी आणि ग्लोईंग बनवता येतं. या डिटॉक्स वॉटरमध्ये असलेलं अॅंटी-ऑक्सिडेंट्स नॅचरल डिटॉक्सिफायरच्या रूपात काम करतं. जे तुमच्या शरीरातून विषारी तत्व बाहेर निघतात. ज्यामुळे एजिंग प्रोसेस हळुवार होते.