Lokmat Sakhi >Beauty > अफगाण कानातल्यांचा ठसठशीत मोहक ट्रेण्ड; आलिया-दीपिका घालतात त्या कानातल्यांचे सुंदर प्रकार

अफगाण कानातल्यांचा ठसठशीत मोहक ट्रेण्ड; आलिया-दीपिका घालतात त्या कानातल्यांचे सुंदर प्रकार

मोठे कानातले पूर्वी फॉर्मल वेअरवर घातले जात नसत पण आता अनेकजणी तेही घालू लागल्या आहेत. (trend of afghani earrings)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2022 04:20 PM2022-05-08T16:20:48+5:302022-05-08T16:24:14+5:30

मोठे कानातले पूर्वी फॉर्मल वेअरवर घातले जात नसत पण आता अनेकजणी तेही घालू लागल्या आहेत. (trend of afghani earrings)

The glamorous trend of Afghani earrings; Beautiful and smart look | अफगाण कानातल्यांचा ठसठशीत मोहक ट्रेण्ड; आलिया-दीपिका घालतात त्या कानातल्यांचे सुंदर प्रकार

अफगाण कानातल्यांचा ठसठशीत मोहक ट्रेण्ड; आलिया-दीपिका घालतात त्या कानातल्यांचे सुंदर प्रकार

आलिया भट किंवा दीपिका पादुकोण घालतात तसे मोठे अफगाणी झुमके आपल्याकडेही असावे असं वाटणं अगदी साहजिकच आहे, ते असतातच इतके मोहक की भूरळ पडतेच. त्यात आता सोन्यानाण्याच्या दागिन्यांनेपक्षाही कमीत कमी दागिने, कानातले मोठे असं घालण्याची फॅशन आहे.  आपल्या आवडीनिवडीही खूप बदलतात. कानातल्यांच्याही. पूर्वी टॉप्स म्हणजे अगदी लहान कानातले घातले जात. मग आले मोठे लोंबते कानातले, मग मोठेच पण कानाला चिकटलेले. आता अफगाण लूकच्या, खूप रंगीत, मोठ्या गोलाकार कानातल्यांचा ट्रेण्ड आहे. कानातले घातले की बोटात फक्त एक अंगठी, गळ्यात काही नाही असा लूक अनेकींना आवडतो. सिंपल पण स्मार्ट लूक. (trend of afghani earrings)

(Image : Google)


त्यातही ऑक्सडाईज्ड ज्वेलरी - दागिन्यांमधील सध्याचा इन असा हा ट्रेंड. पूर्वी असे दागिने फक्त नवरात्ररतल्या ड्रेसेसवर घालत आता मात्र सर्रार रोज डेलीवेअर म्हणूनही घातले जातात. अग्गंबाई सासूबाई मराठी मालिकेतील शुभ्रा या नायिकेने घातलेले ऑक्सडाईज्ड कानातले तर फेमस झाले होते. काश्मिरी तसेच अफगाण स्टाईल झुमके म्हणजे डबल लेअरचे मोठे, लांब कानातले तसेच तीन पदरी अफगान झुमके हा प्रकार सर्रास हल्ली अभिनेत्रीही घालतात.  अफगाण ज्वेलरीत इअररिंग्ज, नेकलेसेस यांचे प्रकार खूपच हिट आहे.

(Image : Google)

चांदबाली आणि बाहुबली कानातले - दीपिकाने पीकू या चित्रपटात घातलेल्या सोन्याच्या चांदबाली कानातल्यांची क्रेझ आजही कायम आहे. साडीवर बंद गळ्याचे, बोटनेक ब्लाऊज घातले असेल तर फक्त चांदबाली कानातले घातले तरी तुमचा लूक भारी दिसतो. लहानपेक्षा मोठ्या आकारातील तसेच मोती व कुंदनकाम असलेली चांदबाली घातली चांदबाली कानातले अनारकली सुट्स, ट्रेंडी पलाझो सुट्स, साड्यांवर घातले तर फारच छान ! आता ऑक्सडाईज्ड चांदबालीही घालण्याकडे युवतींचा कल आहे.  काहीही दागिने न घालता मोठ्या आकारातील झुमके देखील पारंपरिक लूकसाठी बेस्ट ऑप्शन आहे.
वेगळं काही ट्राय करायचं असेल तर असे कानातले ट्राय करुन पहा.

Web Title: The glamorous trend of Afghani earrings; Beautiful and smart look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fashionफॅशन