Join us  

चिमूटभर हळदीचे ३ उपाय, केसांचं पांढरं होणं कमी करतील आणि कोंडाही होईल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2023 3:05 PM

The great benefits of using turmeric in the hair is finally revealed! हळद केसांना लावण्याचा विचार सहसा कुणी करत नाही मात्र हळदीचे हे उपाय केंसांसाठी ठरतात उपयोग

भारतीयांना ‘हळद’ ही एक अत्यंत औषधी गोष्ट लाभलेली आहे. हळदीशिवाय, जेवणातील चव आणि रंगाची बाब अपूर्ण आहे. हळद फक्त जेवणासाठी वापरण्यात येत नसून, आरोग्य आणि त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरते. आपण त्वचेसाठी हळदीचा वापर केलाच असेल, परंतु, कधी केसांसाठी हळदीचा वापर करून पाहिलं आहे का? केसांसाठी हळदीचे फायदे तुम्ही कधी ऐकले आहेत का? आश्चर्य वाटलं ना? होय, हळदीचा वापर केस काळे करण्यासाठी होतो.

हळद केसांसाठी हेअर टॉनिक म्हणून काम करते. त्यातील अँटी-सेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतात. खरं तर, एका संशोधनात असे आढळून आले आहे की, हळदीमध्ये उपस्थित कर्क्युमिन नावाच्या संयुगात अँटीऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या कमी होते. केसांसाठी हळदीचा वापर कसा करावा हे पाहूयात(The great benefits of using turmeric in the hair is finally revealed!).

हळदीचा स्प्रे

हळदीच्या वापरामुळे फक्त केस काळे होत नाही तर, ते चमकदार आणि घनदाट दिसतात. यासाठी एका वाटीत एक कप पाणी घ्या, त्यात एक चमचा हळद, एक चमचा एलोवेरा जेल घालून मिक्स करा. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. व केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत लावा. एक तासानंतर केस धुवा. महिन्यातून ३ वेळा आपण याचा वापर करू शकता.

व्हिटामिन ई केसांना नक्की कसे लावायचे? पाहा २ व्हिटामिन ई कॅप्सुल केसांवर काय कमाल करतात...

हळद आणि खोबरेल तेल

खोबरेल तेल केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. खोबरेल तेलामध्ये लॉरिक अॅसिडसह संतृप्त चरबी असते. ज्यामुळे केसांना पोषण मिळते. यासाठी एका वाटीत खोबरेल तेल घ्या, ते थोडे गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात हळद मिक्स करा, व या तेलाने केसांची चंपी करा. २५ मिनिटानंतर केस धुवा.

पावसाळ्यात चिखलांतून वाट काढताना पाय काळवंडले? ४ घरगुती उपाय- पाय दिसतील स्वच्छ

दूध, मध, हळद हेअर मास्क

या हेअर मास्कमुळे स्काल्पवरील घाण, कोंडा निघून जाते, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते, व केस पांढरे होत नाही. यासाठी एका वाटीत दूध, मध आणि हळद मिक्स करून हेअर मास्क तयार करा. व हा हेअर मास्क केसांवर आणि स्काल्पवर लावा. ३० मिनिटानंतर कोमट पाण्याने केस धुवा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी