भारतातील बहुतांश पदार्थांमध्ये कढीपत्ता हा वापरलाच जातो. फोडणीत असो किंवा इतर काही, कढीपत्ता पदार्थात टाकल्याने पदार्थाची चव ही चौपटीने वाढते. कढीपत्ता फोडणीत टाकताच त्याचा घमघमाट संपूर्ण घरामध्ये पसरतो. कढीपत्ता फक्त चव सुधारत नाही तर तुमचे आरोग्य देखील सुधारते. तुमची त्वचा टवटवीत करण्यासोबतच केसांची चमक टिकवून ठेवण्याचेही उत्तम काम करते. फक्त जेवणात नसून, त्याचे इतर अनेक फायदे आहेत. जे लोकांसाठी खूप उपयुक्त ठरले आहेत. कढीपत्ताचे फायदे काय? कढीपत्ता कसा वापरायचा, चला तर मग जाणून घेऊयात.
पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय
पांढर्या केसांवर कढीपत्ता रामबाण उपचारापेक्षा कमी नाही. घरगुती उपायातून पांढरे केस काळे करण्यासाठी कढीपत्ता मदत करेल. यासाठी सर्वप्रथम 12 ते 15 कढीपत्त्याची पाने घ्यावे. कढीपत्ता नीट धुऊन झाल्यावर बाजूला एका सुख्या कापडावर ठेवा. आता दुसरीकडे २ चमचे खोबरेल तेल घेऊन गरम करा.
यानंतर त्यात कढीपत्ता घालून गरम करावे आणि शेवटी गॅस बंद करावे. कढीपत्ता त्या तेलामधून बाजूला काढून घ्यावे. आणि तेल बाजूला काढून घ्यावे. हे तेल 20 मिनिटे थंड होऊ द्यावे आणि केसांना चांगले मसाज करून लावावे, जेणेकरून कढीपत्त्याचे गुणधर्म केसांमध्ये उतरतील. हे तेल 45 मिनिटे ते 2 तासांपर्यंत केसांवर ठेवावे. शेवटी केस शॅम्पूने चांगले धुवा. हे तेल आठवड्यातून दोनदा वापरावे जेणेकरून तुम्हाला फरक जाणवेल.
केस लांब आणि दाट होण्यास करेल मदत
कढीपत्ता बारीक करून तेलासह केसांवर लावल्यास त्यांची वाढ चांगली होते. रात्री केसांना कढीपत्त्याचे तेल लावावे आणि सकाळी चांगल्या शॅम्पूने धुवावे. यामुळे केस लांब आणि दाट होतील. हे तेल केसांमध्ये नियमित लावल्यास फायदा अधिक होईल.
कढीपत्त्यामुळे चेहरा दिसेल तजेलदार
कोरडी कढीपत्ता बारीक करून पावडर बनवा आणि त्यात गुलाबजल आणि मुलतानी माती मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा आणि चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. असे आठवड्यातून एकदा करावे. तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल.