Join us  

केस झटपट वाळवायचे म्हणून हेअर ड्रायर वापरत? थांबा, केसांच्या समस्यांनी इतक्या वाढतील की कंटाळाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2024 3:10 PM

Can daily use of hair dryer cause hair damage : हेअर ड्रायरचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्याने केसांचे नैसर्गिक सौंदर्य हरवते, असे होऊ नये यासाठी नेमके काय करावे ?

सध्याचे तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की आजकाल प्रत्येक गोष्टींसाठी मशीनचा वापर केला जातो. डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत वेगवेगळ्या ब्यूटी ट्रिटमेंट्स घेण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. परंतु जर या मशीनचा अति वापर केला तर आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात होते. ओले केस सुकवण्यासाठी बऱ्याचजणी हेअर ड्रायरचा वापर करतात(The Startling Side Effects of Using Hair Dryer).

काहीवेळा हेअर ड्रायरचा वापर करणे हे सामान्य आहे. परंतु जर आपण प्रत्येक हेअर वॉशनंतर जर हेअर ड्रायर वापरत असाल तर त्याचे केसांवर अनेक दुष्परिणाम झालेले दिसून येतात. हेअर ड्रायरचा अति वापर केल्याने त्याचा थेट परिणाम हा केसांवर होतो. हेअर ड्रायरचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्याने स्कॅल्पमधील ओलावा तर कमी होतोच, ड्रायनेस वाढतो. यासोबतच केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात(Can daily use of hair dryer cause hair damage).

तुम्हीसुद्धा हेअर ड्रायरचा वापर रोज करता ? 

१. जर तुम्ही रोज हेअर ड्रायर वापरत असाल तर केसांवर याचे दुष्परिणाम लगेच दिसून येतील. कारण असे केल्याने केसांना अनेक प्रकारे हानी पोहोचू शकते. त्यामुळे केस निस्तेज आणि कोरडे होतात. हेअर ड्रायरमधून येणाऱ्या गरम हवेमुळे केसांचा मऊपणा कमी होऊ शकतो. यामुळे केस तुटून केसांचे नैसर्गिक सौंदर्य कमी होऊ शकते. 

२. ज्या स्त्रिया नियमित केसांसाठी हेअर ड्रायर वापरतात त्यांच्या केसांचे अधिक नुकसान होऊ शकते. यातून निघणाऱ्या गरम उष्णतेमुळे केसांच्या क्युटिकल्सचे नुकसान होऊ शकते आणि ते निस्तेज व कोरडे होऊ शकतात. यामुळे तुमचे केस दुभंगले जाऊन कमजोर होण्याची शक्यता अधिक असते. 

कितीही मॉइश्चरायझर चोपडलं तरी स्किन ड्राय दिसते? पाहा ‘ही’ योग्य पद्धत, मिळेल मऊ त्वचा...

३. हेअर ड्रायरचा रोज वापर केल्याने स्कॅल्प कोरडी होऊ शकते. टाळूच्या त्वचेची जळजळ होऊन त्वचेला खाज येऊ शकते. आपण नियमितपणे हेअर ड्रायर वापरल्यास केसांमध्ये असणारे नैसर्गिक तेलाचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते. अशा स्थितीत केस निर्जीव दिसतात, यामुळेच केस गळण्याची समस्या देखील फार मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. 

४. हेअर ड्रायरचा अति वापर केल्याने तुमच्या केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात. केसांची मुळेच खराब झाल्यामुळे केसांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. 

केसांची देखभाल करायलाच वेळ नाही, घ्या हे ६ सुपर हॅक्स- एका मिनिट वेळ दिला तरी केस होतील सुंदर...

५. जर तुमचे केस ओले असतील आणि तुम्हाला ते लवकर सुकवायचे असतील, तर हेअर ड्रायर सतत चालू ठेवून केस सुकवू नका, हेअर ड्रायर काही सेकंद केसांसाठी वापरल्यानंतर तो बंद करा. त्यानंतर काही सेकंदांनी पुन्हा सुरु करा. असे केल्याने ओले केस थोडे कोरडे होतात. हेअर ड्रायरने आपले सर्व केस कोरडे करू नका. नैसर्गिक हवेने केस कोरडे होऊ देणे हाच उत्तम उपाय आहे. 

६. हेअर ड्रायर मधून निघणारी हवा तुमच्या डोळ्यांना इजा पोहचवू शकते. यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा, जळजळ होणे, खाज येणे व लालसरपणा जाणवणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हेअर ड्रायरचा वापर जरी करत असाल तरी ही मशीन डोळ्यांपासून लांब ठेवावी. 

केस सुकवण्यासाठी शक्य तितका नैसर्गिक हवेचा वापर करावा, हेअर ड्रायरचा वापर कमी करावा. जेणेकरून केसांच्या मुळांना व केसांना हानी पोहोचणार नाही. यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होणार नाहीत.

फेस वॅक्सिंग केल्यावर त्वचेची आग होते? ४ सोपे उपाय, जळजळ-रॅश हा त्रास होणार नाही...

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी