Lokmat Sakhi >Beauty > 2 मिनिटात करा कॉफी आइस क्यूब्ज फेशियल! मेकअपची गरजच नाही,चेहेरा होईल फ्रेश!

2 मिनिटात करा कॉफी आइस क्यूब्ज फेशियल! मेकअपची गरजच नाही,चेहेरा होईल फ्रेश!

त्वचा सुधारण्याकामी कॉफी पावडर ही परिणामकारक असते. कॉफी पिल्यानंतर जसा पटकन उत्साह येतो, ताजंतवानं वाटतं अगदी तसाच फायदा कॉफी आइस क्यूब फेशियलने त्वचेला होतो. हे कॉफी आइस क्यूब्ज फेशियल कसं करावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 01:28 PM2021-07-08T13:28:00+5:302021-07-08T13:47:45+5:30

त्वचा सुधारण्याकामी कॉफी पावडर ही परिणामकारक असते. कॉफी पिल्यानंतर जसा पटकन उत्साह येतो, ताजंतवानं वाटतं अगदी तसाच फायदा कॉफी आइस क्यूब फेशियलने त्वचेला होतो. हे कॉफी आइस क्यूब्ज फेशियल कसं करावं?

There is no time to do makeup, then do coffee ice cubes facial for two minutes before you get ready and look fresh. | 2 मिनिटात करा कॉफी आइस क्यूब्ज फेशियल! मेकअपची गरजच नाही,चेहेरा होईल फ्रेश!

2 मिनिटात करा कॉफी आइस क्यूब्ज फेशियल! मेकअपची गरजच नाही,चेहेरा होईल फ्रेश!

Highlightsकॉफी आइस क्यूब्ज बनवण्यासाठी कॉफी, पाणी आणि मध या तीन गोष्टी लागतात.आठवड्यातून तीन ते चार वेळा कॉफी आइस क्यूब्ज फेशियल करता येतं.चेहेर्‍यावरील मुरुम पुटकुळ्या कॉफी आइस क्यूब्ज फेशियलने जातात.


अनेकदा आपल्याला एखाद्या कार्यक्रमाचं ऐनवेळी आमंत्रण मिळतं आणि घाईघाईत तयार व्हावं लागतं. घाईत तयार झालं की तयार व्हायला वेळ मिळाला नाही म्हणून मेकअपच नीट झाला नाही अशी अनेकींची तक्रार असते. घाईत मेकअप करायचा असेल तर तो मनासारखा होत नाही हे खरं. पण कोणत्याही पार्टीसाठी दोन मिनिटात फ्रेश चेहेरा करण्याची एक सोपी युक्ती आहे. या युक्तीमुळे चेहेरा फ्रेश दिसतो आणि जो मेकअप आपण करतो तो चेहेर्‍यावर नीट बसतो. दोन मिनिटात फ्रेश करणारी ही युक्ती म्हणजे कॉफी आइस क्यूब फेशियल. दोन मिनिटात हे फेशियल होत असलं तरी त्याचा परिणाम त्वचेत खोलवर होतो. त्वचा टाइट होते. तसेच त्वचेवर तेल निर्माण करणार्‍या पेशींना शांत करण्याचं कामही हे कोल्ड कॉफी फेशियल करतं.

त्वचा सुधारण्याकामी कॉफी पावडर ही परिणामकारक असते. कॉफी पिल्यानंतर जसा पटकन उत्साह येतो, ताजंतवानं वाटतं अगदी तसाच फायदा कॉफी आइस क्यूब फेशियलने त्वचेला होतो. कॉफी आइस क्यूबचा फायदा वाढण्यासाठी कॉफीच्या पाण्यात काही नैसर्गिक घटक घालून त्याची गुणवत्ता वाढवता येते.

 

 

कॉफी आइस क्यूब्ज कशा तयार करणार?

कॉफी आइस क्यूब्ज बनवण्यासाठी कॉफी, पाणी आणि मध या तीन गोष्टी लागतात. सर्वात आधी दोन तीन चमचे कॉफी पावडर एका भांड्यात काढून घ्यावी. त्यात एक ग्लास पाणी घालावं. एक चमचा मध टाकावं. हे सर्व चांगलं एकत्र करावं. हे पाणी बर्फाच्या ट्रेमधे भरावं. बर्फ होण्यासाठी ट्रे फ्रिजरमधे ठेवावा.

फेशिअल करताना

कॉफी आइस क्यूब्ज तयार झाल्या की त्यातली एक क्यूब घेऊन ती सुती कापडात गुंडाळावी आणि ती क्यूब चेहेर्‍यावर गोलाकार मसाज करत फिरवावी. आठवड्यातून तीन ते चार वेळा कॉफी आइस क्यूब फेशियल करता येतं. त्वचा जर कोरडी असेल तर फेशियल नंतर चेहेर्‍याला लगेच मॉश्चरायझर लावावं.

 

 

फ्रेश दिसा आणि फ्रेश व्हा

फेशियलसाठी ज्या कॉफी आइस क्यूब्ज तयार केलेल्या असतात त्याचा उपयोग फक्त फेशियल करण्यासाठीच होतो असं नाही तर या आइस क्यूब्जची आपण चवही चाखू शकतो. कोल्ड कॉफी किंवा थंड दुधात कॉफी आइस क्यूब्ज टाकून ते पिता येतं. कॉफी आइस क्यूब्जने फेशियल करताना एकीकडे कोल्ड कॉफी तयार करुन ठेवावी. आणि त्यात या आइस क्यूब्ज टाकाव्यात. एकीकडे कॉफी आइस क्यूब्जने फेशियल करावं आणि सोबत कॉफी आइस क्यूब्ज टाकलेल्या कोल्ड कॉफीचा आस्वाद घ्यावा. चेहेरा आणि मूड दोन्हीही फ्रेश होतं.

कॉफी आइस क्यूब्ज फेशियलचे फायदे
तेलकट त्वचा आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या समस्यांनी ज्या कंटाळल्या असतील त्यांनी हे फेशियल अवश्य करावं. पाणी, मध आणि कॉफी पावडर याद्वारे तयार होणार्‍या या क्यूब्जमुळे त्वचेच्या अनेक तक्रारी दूर होतात. कॉफी आइस क्यूब्ज फेशियल हे त्वचेवरील रंध्र घट्ट ठेवतं, त्वचेवर निर्माण होणारं तेल नियंत्रित करतं. चेहेर्‍याच्या त्वचेची ताकद वाढते. चेहेर्‍यावरील मुरुम पुटकुळ्या या फेशियलने जातात. या फेशियलच्या थंड दाबानं खराब त्वचा लवकर दुरुस्त होते.

 

 

फक्त दोन मिनिटांचा मसाजही पुरेसा

फेशियल करताना एक कॉफी आइस क्यूब घ्यावी. ती रुमालात गुंडाळून मसाज करत असल्याप्रमाणे चेहेर्‍यावर फिरवावी. हा मसाज हातात थोडा जास्त वेळ असला तर पाच ते 7 मिनिटंही करता येतो. आणि जर वेळ अगदीच बेताचा असेल तर दोन तीन मिनिट मसाज केला तरी चेहेर्‍यावर चांगला परिणाम होतो. पण जितक्या जास्त वेळ मसाज कराला तितका त्वचेला फायदा होतो.
कॉफी आइस क्यूब्जने फेशियल अर्थात मसाज झाला की चेहेरा स्वच्छ धुवावा. चेहेरा पुसून आपण जेव्हा चेहेर्‍यावर क्रीम किंवा मेकप बेस लावतो तेव्हा तो चेहेर्‍यावर व्यवस्थित पसरतो.

Web Title: There is no time to do makeup, then do coffee ice cubes facial for two minutes before you get ready and look fresh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.