आपण सगळेच चेहऱ्याच्या त्वचेचे खूप काळजी घेतो. चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तसेच त्वचा अधिक सुंदर, आकर्षक, चमकदार दिसण्यासाठी अनेक उपाय करतो. चेहरा सुंदर दिसावा यासाठी आपण फेशियल, क्लिनअप, स्क्रबिंग यांसारख्या अनेक लहान - मोठ्या ट्रिटमेंट करतो. जेव्हा त्वचेच्या मृत पेशी एका जागी जमा होतात तेव्हा त्या काढण्यासाठी आपल्याला एक्सफोलिएशन किंवा स्क्रबिंगची आवश्यकता असते. आपल्यापैकी बहुतेकजणी दर महिन्याला (These 4 Body Parts Need Scrubbing Too to Prevent Premature Aging) चेहऱ्याच्या त्वचेचे स्क्रबिंग अवश्य करतात. यामुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकल्या जातात आणि त्वचा चमकते(4 Body Parts You Must Exfoliate to Stay Youthful).
परंतु फक्त चेहराच नाही तर शरीराचे काही भाग असे आहेत ज्यांना देखील स्क्रबिंगची आवश्यकता असते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. शक्यतो आपण फक्त चेहऱ्याच्याच त्वचेचे स्क्रबिंग करणे महत्त्वाचेच समजतो. खरंतर, चेहरा हा आपल्या शरीराचा मुख्य भाग असतो यामुळे आपण त्याकडे विशेष लक्ष देतो परंतु असे न करता चेहऱ्यासोबतच शरीराच्या इतर कोणकोणत्या भागांचे स्क्रबिंग करणे गरजेचे आहे ते पाहूयात.
चेहऱ्यासोबतच शरीराच्या कोणत्या भागांचे स्क्रबिंग करणे आहे आवश्यक...
१. ओठ :- अनेकदा आपल्या ओठांची त्वचा ही फाटली जाते. या फाटलेल्या ओठांकडे आपण बरेचदा दुर्लक्ष करतो. परंतु चेहऱ्याप्रमाणेच ओठांना देखील नियमितपणे स्क्रबिंगची आवश्यकता असते. फाटलेल्या ओठांमुळे, ओठांचे नैसर्गिक सौंदर्य कमी होते. यासाठीच वेळच्यावेळी ओठांना स्क्रबिंग करणे आवश्यक असते. ओठांची त्वचा खूप पातळ असल्याने जास्त जोर लावून स्क्रबिंग करू नये. स्क्रबिंग केल्यानंतर, हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग लिप बाम अवश्य लावा.
२. हात :- जर आपल्या हातांवर लहान पुरळ, मुरुम किंवा त्वचा लालसर होणे यांसारखी लक्षण दिसत असतील तर आपल्याला हातांचे स्क्रबिंग करणे गरजेचे आहे. हातांना स्क्रबिंग केल्याने त्वचा अधिकच मऊमुलायम, चमकदार आणि एकसमान स्किन टोन होण्यास मदत मिळते. हातांच्या त्वचेसाठी सौम्य बॉडी स्क्रबचा वापर करावा. दर आठवड्यातून किमान एकदा तरी हातांचे स्क्रबिंग करणे आवश्यक असते. स्क्रबिंग केल्यानंतर, कोमट पाण्याने हात धुवा.
३. पाय :- पायांवरील केस काढण्यासाठी आपण वॅक्सिंग तर करतोच. वॅक्सिंग केल्यानंतर स्क्रबिंग करणे देखील तितकेच गरजेचे असते. वॅक्सिंग केल्यामुळे काहीवेळा त्वचा गरम वॅक्समुळे भाजते, इतकेच नव्हे तर स्किनची जळजळ देखील होते. कधी कधी तर वॅक्सिंगमुळे त्वचेवर पुरळ किंवा रेझर बंप येतात, ते घालवण्यासाठी स्क्रबिंग करणे आवश्यक असते. स्क्रबिंग केल्याने पायांची त्वचा मऊमुलायम, गुळगुळीत होण्यास अधिक मदत मिळते.
४. पायांच्या टाचा :- पायांच्या टाचा हा आपल्या शरीरातील सर्वात दुर्लक्षित अवयव आहे. अनेकदा आपण पायांच्या टाचांची योग्य ती काळजी घेत नाही. चेहऱ्याप्रमाणेच पायांच्या टाचांना देखील स्क्रबिंग करणे गरजेचे असते. टाचांना स्क्रबिंग केल्याने टाचांच्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास अधिक मदत होते. यामुळे टाचांची त्वचा रिपेअर होऊन अधिक सुंदर दिसते. स्क्रबिंग केल्यानंतर, मॉइश्चरायझरचा जाड थर पायांच्या टाचांवर लावा आणि मग मोजे घाला. हा उपाय केल्याने टाचांना भेगा पडणार नाहीत तसेच त्वचा अधिक मऊमुलायम होईल.