प्रत्येक समस्येवर काही ना काही घरगुती उपाय असतातच. हे उपाय वर्षानुवर्षे वापरले जात आहेत. त्यामुळे ते योग्यच असतात असे आपल्याला वाटते. घरगुती उपाय नक्कीच चांगले असतात. (These 4 viral beauty remedies are extremely dangerous)मात्र प्रत्येकाच्या त्वचेची ठेवण वेगळी असते. सगळ्यांनाच सगळे उपाय सोसतात असे नाही. काही घरगुती उपाय फायदेशीर असतात, मात्र आपण त्यांचा वापर चुकीचा करतो. (These 4 viral beauty remedies are extremely dangerous)पाहा कोणते उपाय आहेत जे चुकीचे केल्याने हानिकारक ठरु शकतात.
१. चेहर्याला आपण लिंबाचा रस लावतो. मात्र अनेक लोकांच्या त्वचेला लिंबू सहन होत नाही. लिंबातील अॅसिडचा त्वचेला त्रास होतो व रॅश उठते. तसेच नुसता लिंबू कधीच चेहर्याला लाऊ नका. मधात किंवा दुसर्या पदार्थांबरोबर पेस्ट करा आणि मगच लावा. डायरेक्ट लिंबू चेहऱ्याला लावल्यामुळे डार्क स्पॉट्स वाढतात. तसेच चेहरा काळवंडतो.
२. काही जणं पिंपल्सना लसणाच्या पाकळीने मसाज करतात. लसूण चेहऱ्यावर लावणे हा फार चुकीचा उपाय आहे. पिंपल्स जाणार नाहीत उलट वाढतील. लसणामुळे त्वचेची आग होते. असे उपाय न केलेलेच योग्य.
३. चेहऱ्याला बर्फाने मसाज करणे चांगले असले तरी प्रत्येकासाठी ते फायदेशीर ठरतेच असे नाही. जर सतत चेहऱ्याला बर्फ लावत असाल तर मग तो रुमालामध्ये गुंडाळा मगच त्वचेवर लावा. थेट चेहऱ्याला बर्फ लावल्याने त्रास होऊ शकतो. बर्फ चेहऱ्याला लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. त्या पद्धतीनेच मसाज करा.
४. सतत वाफ घेणेही चांगले नाही असे डॉ. आंचल पंथ म्हणतात. व्हाईटहेड्स तसेच ब्लॅकहेड्स काढण्यासाठी आपण चेहऱ्यावर वाफ घेतो. मात्र सतत वाफ घेणे त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते.
घरगुती उपाय करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. इतरही काही उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही फायद्याने ठरते. हे उपाय आपल्या घरात कायम केले जातात त्यामुळे त्यांचा सखोल विचार आपण करत नाही. मात्र शरीरावर कोणताही प्रयोग करण्यापूर्वी विचार करणे गरजेचे असते.